गुजरात: गुजरातमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या पुर्वजांना मोक्ष मिळवून देण्यासाठी पोटच्या दोन मुलांचा खून केला. एव्हडेच नाही तर मुलांच्या हत्येनंतर आरोपी महिलेने तिच्या सासऱ्यांची देखील हत्या करण्याचा प्रयत्न केला. कसं आपला जीव त्यांनी वाचवला. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
नेमकं काय प्रकरण?
पोलिसांनी सांगितले की, संबंधित घटना गुरुवारी रात्री नवसारी जिल्ह्याच्या बिलिमोरा कस्बे येथील देसरा परिसरात असलेल्या एका फ्लॅटमध्ये झाली. प्रकरणातील आरोपी महिलेचं नाव सुनीता शर्मा असून ती तिच्या पती शिवकांत, त्यांची मुले आणि सासू- सासऱ्यांसोबत इथे राहत होती. शिवकांतला टायफॉइड या मोठा आजार झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुनीताचे सासू-सासरे शिवकांतसाठी जेवण घेऊन रुग्णालयात गेले होते आणि तिथून परत घरी आल्यानंतर ते झोपून गेले.
Andhra Pradesh Crime: धक्कादायक! आईनेच 6 लाखांची सुपारी देऊन मुलाची हत्या रचली; कारण काय?
त्यावेळी, सुनीता तिच्या बेडरूममध्येच होती. कारण ती बऱ्याच दिवसांपासून अस्वस्थ होती. त्या दिवशी, अचानक रात्री ती देवाकडे प्रार्थना करू लागली आणि आपल्या पुर्वजांना मोक्ष मिळवून देण्यासाठी तिने तिच्या दोन्ही मुलांचा गळा दाबून त्यांची हत्या केली. त्यांच्या हत्येनंतर, सुनीता तिच्या सासू-सासऱ्यांच्या खोलीत गेली आणि तिने तिच्या सासऱ्यांचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी तिचे सासरे कसंबसं घरातून बाहेर पडले आणि त्यांना आजूबाजूला राहणाऱ्या लोकांकडून मदत मागितली.
सुनीताने तिच्या घराचा दरवाजा बंद केला होता. शेजाऱ्यांनी वारंवार दरवाजा ठोठावल्यानंतर सुद्धा तिने दरवाजा उघडला नाही. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि घराचा दरवाजा तोडून सुनीताला ताब्यात घेतलं. त्यावेळी, सुनीता आपल्या मुलांच्या मृतदेहाजवळ बसली होती. पोलिसांनी आरोपी सुनीताला अटक केली असून ती उत्तरप्रदेशची मूळ रहिवासी असल्याची सांगितले जात आहे.
Ans: गुजरात
Ans: हत्या
Ans: अटक






