Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Shirsat-Sanjay Raut: शिरसाट-राऊत वाद चिघळला; अब्रुनुकसानीची नोटीस कोर्टापर्यंत जाणार

एकीकडे आधी आयकर विभागाची नोटीस आणि आता पैशांच्या बॅगेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संजय शिरसाट चांगलेच अडचणीत सापडले आहेत. शिरसाट यांच्याघरातील बेडरुममधील व्हिडीओमध्ये दोन बॅगा दिसत आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 12, 2025 | 04:16 PM
Sanjay Shirsat-Sanjay Raut: शिरसाट-राऊत वाद चिघळला; अब्रुनुकसानीची नोटीस कोर्टापर्यंत जाणार
Follow Us
Close
Follow Us:

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचा घरातील रुममधील पैशांच्या बॅगेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या आरोप- प्रत्यारोपांवर संजय राऊत आणि संजय शिरसाट यांच्यातील वाद चांगलाच चिघळला होता. संजय राऊतांच्या आरोपांनंतर संजय शिरसाट चांगलेच संतापले असून आता संजय राऊत आणि संजय शिरसाट यांच्यातील वाद वाद थेट कोर्टात जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

“माझा व्हिडिओ मॉर्फ करून बनवण्यात आला आहे,” असा गंभीर आरोप शिरसाट यांनी केला आहे. तसेच, आजच मी संजय राऊत यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार आहे. जर त्यांनी या नोटीसला उत्तर दिलं नाही, तर मी थेट फौजदारी तक्रार दाखल करेन.” तसेच, “बदनामीसाठी इतक्या नीच पातळीवर कोणी जाईल, हे मी प्रथमच पाहतो आहे.”असेही त्यांनी म्हटले आहे.

संजय शिरसाट संजय राऊतांविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहेत. यासाठी ते वकिलांचा सल्लाही घेत असल्याची माहिती आहे. संजय राऊत यांनी शिरसाट यांचा घराच्या रूममधील एक व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यावरून कालपासून एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. राऊत यांनी शेअर केलेला व्हिडीओ आपला असल्याचे शिरसाट यांनी मान्य केले असले तरी त्या बॅगमध्ये पैसे नसून कपडे असल्याचा दावा शिरसाट यांनी केला. इतकेच नव्हे तर संजय शिरसाट आरोप फेटाळत असतील तर त्यांचे आणखी व्हिडीओ बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, एकीकडे आधी आयकर विभागाची नोटीस आणि आता पैशांच्या बॅगेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संजय शिरसाट चांगलेच अडचणीत सापडले आहेत. शिरसाट यांच्याघरातील बेडरुममधील व्हिडीओमध्ये दोन बॅगा दिसत आहेत. त्यापैकी एका बॅगेत नोटांचे बंडल दिसत आहेत. ही बॅग पैशांची असून त्यात नोटांचे बंडल अशल्याचा दावा संजय राऊतांनी केला. विशेष म्हणजे संजय राऊतांनी तो व्हिडीओ ट्विटर हँडलवरून ट्विट केला आहे.

Web Title: Shirsat raut dispute escalates defamation notice will go to court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 04:07 PM

Topics:  

  • sanjay raut
  • Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये शंभर ‘पे अ‍ॅण्ड यूज’ शौचालये उभारण्याचे नियोजन; संजय शिरसाट
1

छत्रपती संभाजीनगरमध्ये शंभर ‘पे अ‍ॅण्ड यूज’ शौचालये उभारण्याचे नियोजन; संजय शिरसाट

Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही; शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक
2

Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही; शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक

Sanjay Raut on Bihar Election: ‘१० हजारात लोकशाही विकली जाते…’; बिहारच्या निकालावर संजय राऊतांनी तोफ डागली
3

Sanjay Raut on Bihar Election: ‘१० हजारात लोकशाही विकली जाते…’; बिहारच्या निकालावर संजय राऊतांनी तोफ डागली

Sanjay Raut On Bihar Elections : “हा तर ‘एकदम महाराष्ट्र पॅटर्न! बिहार निवडणुकीच्या निकालावर खासदार संजय राऊतांची टीका
4

Sanjay Raut On Bihar Elections : “हा तर ‘एकदम महाराष्ट्र पॅटर्न! बिहार निवडणुकीच्या निकालावर खासदार संजय राऊतांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.