Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा,’ संजय राऊतांची मोठी मागणी; पूर्णेकर हत्या अन् टायगर श्रॉफ गोळीबारावरून फडणवीसांना घेरलं

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण आणि मुंबईतील टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबारामुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या घटनांवरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Oct 19, 2026 | 04:59 PM
Sanjay Raut

Sanjay Raut

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर संजय राऊतांचा सवाल
  • राऊतांची सोशल मीडिया पोस्टमधून सरकारवर टीका
  • फडणवीसांवर साधला निशाणा
 

अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे आता पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईसारख्या शहरांत बॉलिवूड स्टार्सवर असे हल्ले होत असतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अश्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरूनच राज्य सरकारला घेरलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत राऊतांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

संजय राऊत यांनी सोशल मीडिया पोस्टमधून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. ठाण्यात पूर्णेकर यांची हत्या आणि मुंबईत टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली.

राज्यात गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे, असं म्हणत राऊत यांनी फडणवीस यांच्या गृहखात्यावर निशाणा साधला. राऊतांच्या मते, या घटनांमुळे राज्यातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

टायगर श्रॉफसाठी एकनाथ शिंदेंची तातडीची धाव, पण पूर्णेकरांना न्याय कधी? राम पूर्णेकरांचा उपोषणाचा इशारा!

टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार; जुहूमध्ये खळबळ

रविवारी, 18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. फुटबॉल खेळून परतत असताना ही घटना घडली. टायगर श्रॉफ मोठ्या दुखापतीतून बचावला; मात्र त्याचा चालक आणि जवळ असलेला एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती समोर आली.

या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तपासासाठी पथकं तैनात केली. यातील आरोपी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे. पोलिसांच्या पथकांनी शोध घेतला असता आरोपींना राजस्थानमधील कोटा येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

पूर्णेकर कुटुंबीयांचा न्यायासाठी आक्रोश

दुसरीकडे, प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनीही आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. राम पूर्णेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदेनी टायगर श्रॉफ यांची भेट घेतली मात्र त्यांच्या घराच्या अवघ्या 20 मिनिटे दूर असलेल्या पूर्णेकर कुटुंबियांना भेट दिली नसल्याची तक्रार केली आहे. तसेच, लवकरच प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळावा यासाठी एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर उपोषण करणार असल्याचे राम पूर्णेकर यांनी सांगितलं आहे.

या दोन्ही घटनांमुळे राज्यातील सुरक्षेचा प्रश्न राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. पोलीस याबाबत तपास करत असून आता तपासातून काय निष्पन्न होतं तसंच या प्रकरणांत दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

‘आधी जित्याला गोळ्या घालेन, मग तुलाही…’ जितेंद्र आव्हाडांना धमकीचा फोन; कार्यकर्त्यालाही जीवे मारण्याची धमकी

Web Title: Sanjay raut slams cm devendra fadnavis over tiger shroff firing vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pradeep Purnekar
  • sanjay raut
  • tiger shroff

संबंधित बातम्या

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामुळे खळबळ; सलमान खानसोबत काम केलेल्या आणखी कोणत्या कलाकारांना धोका?
1

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामुळे खळबळ; सलमान खानसोबत काम केलेल्या आणखी कोणत्या कलाकारांना धोका?

Pradeep Purnekar Case : टायगर श्रॉफसाठी एकनाथ शिंदेंची तातडीची धाव, पण पूर्णेकरांना न्याय कधी? राम पूर्णेकरांचा उपोषणाचा इशारा!
2

Pradeep Purnekar Case : टायगर श्रॉफसाठी एकनाथ शिंदेंची तातडीची धाव, पण पूर्णेकरांना न्याय कधी? राम पूर्णेकरांचा उपोषणाचा इशारा!

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर आरोपींचा होता आणखी मोठा कट? पुढचं टार्गेट कोण होतं? राजस्थान पोलिसांचा खळबळजनक खुलासा!
3

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर आरोपींचा होता आणखी मोठा कट? पुढचं टार्गेट कोण होतं? राजस्थान पोलिसांचा खळबळजनक खुलासा!

जुन्या वादातून थेट गोळीबार! नाशिकच्या आडगावमध्ये भरदिवसा दोन राऊंड फायर; संशयित फरार
4

जुन्या वादातून थेट गोळीबार! नाशिकच्या आडगावमध्ये भरदिवसा दोन राऊंड फायर; संशयित फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.