
अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप
एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्याला ‘बिकाऊ मालाचा मेळावा’ म्हणत खिल्ली उडवली. राज्यात दोन शिवसेनेचे मेळावे होत असल्याच्या प्रश्नावर राऊत भडकले. ते म्हणाले, दोन मेळावे होतायत असे विचारणाऱ्या पत्रकाराला मी शटअप (चूप बसा) सांगितले. शिवसेना एकच आहे, ती बाळासाहेब ठाकरेंची. शिवतीर्थावर समोर बसलेला हा ‘टिकाऊ माल’ आहे आणि तिकडे गेलेला ‘बिकाऊ माल’ आहे. तिकडे कसला मेळावा ? ते दांडिया खेळत बसले असतील. त्यांच्याकडे कोणताही विचार किंवा संघर्ष नाही.
Supreme Court : संजय राऊत आणि निखिल वागळेंच्या अडचणीत वाढ; कोर्टाकडून अवमानना नोटीस जारी
शिंदे गटाला उद्देशून राऊत यांनी थेट इशारा दिला. इथे प्रत्येकाच्या हातात बांबू आहे, गद्दारांना तो कुठे जाईल हे कळणारही नाही. या शिवसेनेशी पंगा घेण्याचे प्रयत्न गेल्या ६० वर्षांत अनेकांनी केले, भले-भले आले आणि गेले, पण या गर्दीला कधी ओहोटी लागली नाही.
106 हुतात्म्यांच्या बलिदानाचे केले स्मरण
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला ६० वर्षे पूर्ण होत असल्याचा संदर्भ देत, मुंबईसाठी १०६ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण राऊत यांनी करून दिली आणि प्रत्येक पिढी बाळासाहेबांच्या विचारांनी धगधगत असल्याचे सांगितले. शिवतीर्थावरील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. त्याला संबोधित करताना ते बोलत होते.
एप्रिल महिन्यात मोदी सरकार जाणार
इटली, फ्रान्सप्रमाणे आता भारतातही जनता रस्त्यावर उतरली आहे. मोदी-शहांना कोणी घाबरत नाही. आता हेच दोघे जनतेला घाबरतात. पुढच्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोदी सरकार जाणार असे भाकित शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.
मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडेंनी मोडले होते अंडरवर्ल्डचे कंबरडे
एकेकाळी १९९३-९५ च्या काळात मनोहर जोशी आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या युती सरकारने ‘बुलेट फॉर बुलेट’चे धोरण स्वीकारून मुंबईतील अंडरवर्ल्डचे कंबरडे मोडले होते. मात्र, आज सत्तेसाठी लाचार झालेली भाजप गुन्हेगारांपुढे हतबल झाली आहे. भर रस्त्यात बाबा सिद्दिकींची हत्या होते, पूर्णेकरांचा खून होतो, सलमान खान, रोहित शेट्टी आणि टायगर श्रॉफच्या घरावर गोळीबार करून बिश्नोई गँग उघडपणे जबाबदारी स्वीकारते आणि गृहमंत्रालयाची लायकी काढते. देवेंद्रजी, कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलणे ही तुमच्या बसची बात नाही.
– सुषमा अंधारे, उपनेत्या, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
FAQ :
संजय राऊत नेमकं काय म्हणाले? खळबळजनक आरोप काय?
– शिवसेना (UBT) चे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात खळबळजनक आरोप केला.
उद्धव ठाकरे आणि इतर नेते काय म्हणाले?
– उद्धव ठाकरे (दसरा मेळाव्यात) “माझं चॅलेंज आहे मुख्यमंत्री फडणवीसांना – जर हिंमत असेल तर लॉरेन्स बिश्नोईला गुजरातच्या जेलमधून खाली ओढून मुंबईत आणा आणि धडा शिकवा. मोठ्या वल्गना करू नका, कृती करा.”