Shiv Sena sushma andhare target mahayuti on deenanath mangeshkar hospital pregnant lady death
पुणे : पुण्यातील नामांकित अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. एका गर्भवती महिलेचा उपचारासाठी दिरंगाई केल्यामुळे मृत्यू झाला आहे. जुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या तनिशा भिसे यांचा मृत्यू झाला. 10 लाख रुपयांच्या पैशांची मागणी केल्यामुळे राज्यभरातून यावरुन रोष व्यक्त केला जात आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठे आंदोलन देखील केले. आता या रुग्णालयाची जमीन केवळ 1 रुपया भाडेतत्त्वावर दिले असल्याचा शासन निर्णय सुषमा अंधारे यांनी पोस्ट केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यूबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ला वार्षिक एक रुपया नाममात्र भाड्याने जमीन देण्याचा निर्णय… ! असे पोस्टमध्ये लिहिले आहे. त्याचबरोबर 18 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या शासन बैठकीतील निर्णयाचे पोस्टर शेअर केले आहेत. यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासाठी भाडे आणि सुविधा देण्याबाबत घेण्यात आलेले शासन निर्णय दिसून येत आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन
■ पुण्यातील दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशन हॉस्पिटल, मेडिकल रिसर्च सेंटरला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन नाममात्र दराने वार्षिक भाडेपट्ट्याने देण्यास मंजुरी
■ या ट्रस्टला हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसाठी मौ. एरंडवणा येथे जमीन देण्यात आली आहे. याशिवाय ट्रस्टने मौजे कर्वेनगर येथील जमीन खरेदी केली आहे. या दोन्ही मिळकतीच्या दरम्यान हा नाला आहे.
■ या नाल्यावर पूल बांधण्यासाठी ७९५ चौ. मीटर जमिनीची आवश्यकता असल्याची ट्रस्टची मागणी
त्यानुसार ही जमीन वार्षिक १ रुपया या नाममात्र दराने भाडेपट्टयाने देण्यास मंजुरी
■ नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचा खर्च हा संबंधित ट्रस्ट करणार आहे. या पुलामुळे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, रुग्णवाहिका, रुग्णांच्या नातेवाईकांचे वाहने व ट्रस्टचे संबंधित वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांना ये-जा करणे सुकर होईल.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ला वार्षिक एक रुपया नाममात्र भाड्याने जमीन देण्याचा निर्णय… ! pic.twitter.com/cCnYmuHIcc
— SushmaTai Andhare (@andharesushama) April 4, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यातील या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पुण्याच्या मंगेशकर रूग्णालयात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. असंवेदनशीलतेचा परिचय आपल्याला पहायल मिळत आहे. ज्या प्रकारे तेथील डॉक्टर्सनी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलतेने प्रसुतीला आलेल्या महिलेला अॅडमिट करून घेण्यास नकार दिला. अधिकचे पैसे मागितले असा हा संपूर्ण विषय आहे. धर्मादाय रूग्णालयांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे निभावली पाहिजे अशी अपेक्षा आहे. म्हणूनच मी या संदर्भात उच्च स्तरीय कमिटी तयार केली आहे. जी या घटनेचा तपास करेलच. पैशांची चिंता न करता रूग्णालयाने त्यांना अॅडमिट करून घेणे गरजेचे होते. मुख्यमंत्री कक्षाने देखील लक्ष घातले मात्र रूग्णालाय प्रशासनाने योग्य प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पुन्हा असे प्रकार घडू नये म्हणून कडक कारवाई करण्याचा आमचा मानस आहे.” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.