Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Budget 2026 : गुलाबी जॅकेटचा जलवा कायम! अजित पवारांच्या आठवणीत CM देवेंद्र फडणवीसांचा खास लूक

Ajit Pawar Pink Jacket : अजित पवारांच्या पश्यात्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अजित पवारांप्रमाणे गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले होते.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 06, 2026 | 04:46 PM
Maharashtra Budget 2026 Live CM Devendra Fadnavis wears pink jacket like Ajit Pawar

Maharashtra Budget 2026 Live CM Devendra Fadnavis wears pink jacket like Ajit Pawar

Follow Us
Close
Follow Us:
  • देवेंद्र फडणवीसांनी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2026-27
  • फडणवीसांनी अजित पवारांप्रमाणे गुलाबी जॅकेट घातले
  • अजित पवारांना वाहिली आदरांजली
Maharashtra Budget 2026 : मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी अर्थसंकल्प सादर केला. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अजित पवारांना यंदाचा अर्थसंकल्प समर्पित करत असल्याचे जाहीर केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोशाख लक्षवेधी ठरला. फडणवीसांनी अजित पवारांप्रमाणे (Ajit Pawar) गुलाबी रंगाचे जॅकेट घातले होते. यामुळे विधीमंडळामध्ये आजही गुलाबी जॅकेटचा जलवा कायम असल्याचे दिसून आले.

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यामध्ये आगामी 2026-27 वर्षासाठी महायुती सरकार काय घोषणा करणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. तसेच लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी अशा अनेक मुद्द्यांवर काय घोषणा होणार याची प्रतिक्षा होती. मात्र वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्याची अर्थिक घडी विस्कटणार का याची काळजी लागली होती. मात्र ही जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळली असून त्यांनी आगामी वर्षातील जमाखर्च मांडला आहे. यावेळी अजित पवारांप्रमाणे गुलाबी जॅकेट परिधान केले होते.

हे देखील वाचा :महाराष्ट्र बजेट २०२६ मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा; जाणून घ्या सविस्तर

महायुती सरकारने घोषित केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही ट्रीपल इंजिन सरकारसाठी गेमचेंजर ठरली आहे, तेव्हापासून अजित पवार हे गुलाबी रंगामध्ये प्रचार करत असल्याचे दिसून आले. अजित पवारांनी गुलाबी रंगाच्या थीममध्ये जोरदार प्रसार आणि प्रचार केला. तसेच लाडक्या बहिणींचा सरकारवरील विश्वास देखील संपादन करुन घेतला होता. तेव्हापासून अजित पवार हे विधीमंडळामध्ये आणि अर्थसंकल्प सादर करताना गुलाबी रंगाचे जॅकेट घालत असतं. त्याच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हिच स्टाईल सुरु केली होती.

अजित पवारांच्या निधनानंतर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. आज विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करताना देवेंद्र फडणवीसांनी गुलाबी रंगाचे जॅकेट घातले होते. त्यांचा हा लूक अजित पवारांच्या स्मृती गाजवत होता. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना अजित पवारांना श्रद्धांजली देखील अर्पण केली.

हे देखील वाचा : ही दोस्ती तुटायची नाही..! दिवंगत नेते अजित पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्र्यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आज हे भाषण करताना माझे मन अत्यंत जड झाले आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद आणि दीर्घ काळ वित्तमंत्री राहिलेले आपले अजितदादा आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक आणि प्रशासकीय जीवनात कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी एकूण 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. त्यांचे आणि अर्थसंकल्पाचे नाते अतिशय दृढ होते. त्यांनी विक्रमी ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. कामाचा माणूस हीच त्यांची खरी ओळख होती.” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केल्या.

जित पवारांमुळे महाराष्ट्राची कठीण काळातही अर्थिक स्थिती भक्कम राहिली. त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून सर्वांशी चर्चा करुन अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे, जित पवारांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल असे मी जाहीर करतो. दिवंगत नेते अजित पवारांच्या स्मृतींना मी आजचा अर्थसंकल्प मी समर्पित करतो,” असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Web Title: Maharashtra budget 2026 live cm devendra fadnavis wears pink jacket like ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • ajit pawar
  • budget 2026
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Baramati Assembly bypoll Elections 2026: बारामतीत ३५ वर्षांनंतर पुन्हा पोटनिवडणूक! १९९१ मध्ये अजित पवारांनी रचला होता इतिहास
1

Baramati Assembly bypoll Elections 2026: बारामतीत ३५ वर्षांनंतर पुन्हा पोटनिवडणूक! १९९१ मध्ये अजित पवारांनी रचला होता इतिहास

Maharashtra Cabinet decisions: शिक्षकांच्या वेतनपासून ते साताऱ्यात IT पार्कपर्यंत..; फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय
2

Maharashtra Cabinet decisions: शिक्षकांच्या वेतनपासून ते साताऱ्यात IT पार्कपर्यंत..; फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय

‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने स्टार्टअपसारखे काम करावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
3

‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने स्टार्टअपसारखे काम करावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Baramati By-Poll: बारामतीत पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांचा रुग्णालयातून ‘मास्टरस्ट्रोक’
4

Baramati By-Poll: बारामतीत पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांचा रुग्णालयातून ‘मास्टरस्ट्रोक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.