Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वसंत मोरेंनी गोठ्यावर संतापामध्ये चालवला ‘हातोडा’; नेमकं कारण तरी काय?

उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे हे आपल्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात. बेकायदेशीर कामांवर स्वतः हाती हातोडा घेत ते कारवाई करतात. कात्रजमध्ये आता पुन्हा एकदा वसंत मोरे यांनी हाती हातोडा घेतला आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांचे कौतुक समर्थक करत आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 22, 2024 | 01:14 PM
vasant more in pune

vasant more in pune

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे हे आपल्या आक्रमक पद्धतीच्या कामांसाठी ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेमध्ये केलेल्या पक्षप्रवेशामुळे वसंत मोरे यांची राज्यभर चर्चा झाली होती. वसंत मोरे हे त्यांच्या धडक हातोडा कारवाईसाठी ओळखले जातात. अनधिकृत बांधकामांवर त्यांचा हा हातोडा नेहमी चालताना दिसतो. आता पुन्हा एकदा वसंत मोरे यांनी कात्रजमध्ये हातोडा घेत एका गाईच्या गोठ्यावर हातोडा चालवला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

कात्रज भागामध्ये बेकायदेशीर कामांवर हातोडा चालण्यासाठी वसंत मोरे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. कात्रजमधील एका गाईची हत्या करण्यात आली. यावरुन वसंत मोरे यांनी संताप व्यक्त करत हातोडा कारवाई केली आहे. कात्रज भागामध्ये गो हत्येचा गंभीर प्रकार घडला. त्यामुळे संतापलेल्या वसंत मोरे यांनी स्वत: त्या व्यक्तीच्या गोठ्यातील काही अनिधिकृत बांधकाम तोडले आहे. याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे.

गोवंश हत्या आणि गोहत्या याच्या विरोधात आमचा हातोडा चालणारच… pic.twitter.com/Hw8eEjLkja — Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) September 21, 2024

कात्रजमधील मांगडेवाडी परिसरातील एका गोठ्यात शनिवारी गाईची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच ठाकरेसेनेचे नेचे वसंत मोरे आणि त्यांचे काही कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी त्या गोठ्यावर हातोडा चालवला. तसेच या व्यक्तीच्या मागे आणखी कोण, कोण आहेत? त्याचा शोध घेत पोलिसांनी सखोल आणि कठोर कारवाई करावी. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वसंत मोरे यांनी केली. सोशल मीडिया पोस्टवर वसंत मोरे म्हणाले की, गोठ्याचे बांधकाम अवैध आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्याने रिपोर्ट द्यावा, असे वसंत मोरे यांनी पोलिसांना दूरध्वनीवरुन सांगितले. हा व्यक्ती दुसऱ्यांदा असाच गुन्हा करताना सापडला आहे. त्याचे हे प्रकार वाढत आहेत. बऱ्याच वर्षांपासून त्याचा हा उद्योग सुरु आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या गाई तो येथे आणून त्याची हत्या करतो. माझ्या परिसरात असे विषय चालू देणार नाही. यापुढे असे प्रकार झाल्यास काय होईल? ते मी आता सांगू शकत नाही. तसेच त्या व्यक्तीच्या मागे कोण, कोण आहेत? त्याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी स्पष्ट भूमिका वसंत मोरे यांनी घेतली आहे.

Web Title: Shiv sena thackeray group leader vasant more hammered a cowshed in katraj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 01:14 PM

Topics:  

  • Pune
  • shivsena
  • Vasant more

संबंधित बातम्या

Bhaskar Jadhav: “बाळासाहेबांनी जातीचं राजकारण नाकारलं अन्….”, भास्कर जाधवांनी सांगितला ९५ सालचा तो ऐतिहासिक किस्सा
1

Bhaskar Jadhav: “बाळासाहेबांनी जातीचं राजकारण नाकारलं अन्….”, भास्कर जाधवांनी सांगितला ९५ सालचा तो ऐतिहासिक किस्सा

Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज
2

Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

BMC Election 2026:  सत्तावाटपाचे नवे समीकरण; मुंबईच्या बदल्यात नाशिक, एकनाथ शिंदे तडजोड करण्यास तयार
3

BMC Election 2026:  सत्तावाटपाचे नवे समीकरण; मुंबईच्या बदल्यात नाशिक, एकनाथ शिंदे तडजोड करण्यास तयार

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील निर्णय लांबणीवर; ‘या’ दिवशी पुन्हा सुनावणी
4

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील निर्णय लांबणीवर; ‘या’ दिवशी पुन्हा सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.