Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जरांगेच्या ऑडिओ बॉम्बवरून महायुतीत पळापळ! भाजप – शिंदेसेनेमध्ये चांगलीच जुंपली, रामदास कदमांच्या आरोपांवरून Pravin Darekar भडकले

Pravin Darekar : मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून महायुतीतील राजकीय वातावरण तापलं आहे. रामदास कदम यांच्या भाजपवरील टीकेला प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

  • By विवेक
Updated On: Oct 23, 2026 | 07:42 PM
Pravin Darekar on Ramdas Kadam

Pravin Darekar on Ramdas Kadam

Follow Us
Follow Us:
  • रामदास कदमांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर
  • 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून महायुतीत वाद
  • ‘चौकशीत सगळं समोर येईल’, दरेकरांची भूमिका
 

राज्यातील राजकारण आता एका वेगळ्याच वळणावर आल्याचं दिसत आहे. आधीच वेगवेगळ्या कारणांनी महायुतीतील नेत्यांमध्ये आपापसांमध्ये टीकाटिपण्या होताना दिसत होत्या. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे त्यात आणखीनच भर पडताना दिसत आहे. जरांगेंनी फोडलेल्या ऑडिओ बॉम्बच्या आवाजामुळे आता महायुतीमध्येच पळापळ झाल्याचं दिसून येत असून भाजप आणि शिवसेना शिंदेगटात चांगलीच जुंपली असल्याचं दिसत आहे.

शिवसेना नेते रामदास कदम यांनी या ऑडिओ क्लिपनंतर भाजपवर सडकून टीका केली. त्यावरच आता भाजपनेहू पलटवार केला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी रामदास कदमांना जोरदार प्रत्युत्तर दिलं असून ‘भाजपवर आरोप करायचे आणि त्याचवेळी महायुतीत राहायचं, हे चालणार नाही,’ अशा शब्दांत दरेकरांनी आपली नाराजी व्यक्त केली. (Pravin Darekar)

रामदास कदमांवर दरेकर भडकले

रामदास कदम यांच्या टीकेला उत्तर देताना प्रवीण दरेकर म्हणाले की, भाजपवर खालच्या पातळीवर आरोप केले जात असतील तर पक्ष गप्प बसणार नाही. ‘भाजपसोबत राहायचं आणि शिव्या घालायच्या, हे आम्ही खपवून घेणार नाही,’ असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

Raj Thackeray : ‘हा लोकशाहीवरचा बलात्कारच!’ 500 कोटींच्या क्लिपवरून राज ठाकरे संतापले, ‘फ्रेंडशिप फाईल’वरून सरकारला घेरलं

प्रसाद लाड आणि काळकुटे यांच्या फोटोंचा उल्लेख करत त्यांनी राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर प्रश्न उपस्थित केले. कोणी कोणाच्या सुपाऱ्या घेतल्या, याबाबतही दरेकरांनी कदमांवर टीका केली.

500 कोटींच्या क्लिपवर काय म्हणाले?

कथित ऑडिओ क्लिपमधील 500 कोटींच्या व्यवहाराबाबत बोलताना दरेकर यांनी चौकशी पूर्ण होऊ द्यावी, असं म्हटलं. एकनाथ शिंदे यांनी पैसे दिलेही नाहीत आणि घेतलेही नाहीत, अशी भूमिका मांडल्याचं त्यांनी नमूद केलं. क्लिपमधील संभाषणावरून लगेच निष्कर्ष काढणं योग्य नाही. तपास यंत्रणांच्या चौकशीत सत्य समोर येईल, असं दरेकर म्हणाले. महायुतीत तणाव निर्माण होईल, अशी विधानं चौकशीपूर्वी करणं टाळायला हवं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

‘मला वाटलं म्हणून मुख्यमंत्री होत नसतो’

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा असू शकते. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार, हे केवळ इच्छेवर नाही तर राजकीय आकडेवारीवरही अवलंबून असतं, असं दरेकर यांनी सांगितलं.

महायुतीतील प्रश्न माध्यमांसमोर मांडण्याऐवजी वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून सोडवावेत, असं आवाहनही त्यांनी केलं. युतीतील समन्वयासाठी व्यवस्था असताना सार्वजनिक आरोप-प्रत्यारोप करणं योग्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

महायुतीतील तणाव वाढणार?

शिंदे साहेब हे विरोधी पक्षात नाहीत, मग त्यांना घाबरण्याचं कारण काय, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. युतीतील नेत्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून वागायला हवं, असंही ते म्हणाले.

आता रामदास कदम या प्रत्युत्तराला काय उत्तर देतात आणि कथित ऑडिओ क्लिपच्या चौकशीत काय निष्पन्न होतं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Manoj Jarange Audio Clip Controversy : जरांगेंचं आंदोलन संपवण्यासाठी पैशांचा खेळ? संजय राऊतांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रवीण दरेकर यांनी रामदास कदम यांना काय इशारा दिला?

    Ans: भाजपवर खालच्या पातळीवर टीका केली जात असेल तर गप्प बसणार नाही, असं दरेकर म्हणाले. भाजपसोबत राहून त्याच पक्षावर टीका करणं खपवून घेतलं जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

  • Que: 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपबाबत दरेकर काय म्हणाले?

    Ans: कथित क्लिपची चौकशी होऊ द्यावी आणि त्यानंतरच निष्कर्ष काढावेत, असं दरेकर म्हणाले.

  • Que: एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत प्रवीण दरेकर काय म्हणाले?

    Ans: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा असू शकते. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार हे केवळ इच्छेवर ठरत नाही; त्यासाठी राजकीय आकडेवारीही महत्त्वाची असते, असं दरेकर यांनी सांगितलं.

Web Title: Pravin darekar ramdas kadam bjp shinde group audio clip row vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 07:34 PM

Topics:  

  • BJP
  • Manoj Jarange Patil
  • MLA Pravin Darekar
  • Ramdas Kadam
  • shivsena

संबंधित बातम्या

Sushilkumar Shinde : ‘मी काँग्रेसमध्येच राहणार’; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सुशीलकुमार शिंदेंचं उत्तर
1

Sushilkumar Shinde : ‘मी काँग्रेसमध्येच राहणार’; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सुशीलकुमार शिंदेंचं उत्तर

Manoj Jarange Audio Clip Controversy : जरांगेंचं आंदोलन संपवण्यासाठी पैशांचा खेळ? संजय राऊतांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
2

Manoj Jarange Audio Clip Controversy : जरांगेंचं आंदोलन संपवण्यासाठी पैशांचा खेळ? संजय राऊतांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

Manoj Jarange React on Ramdas Kadam: क्लिप कशी व्हायरल झाली हे फडणवीसांना विचारा!; रामदास कदमांवर मनोज जरांगे पाटलांचा पलटवार
3

Manoj Jarange React on Ramdas Kadam: क्लिप कशी व्हायरल झाली हे फडणवीसांना विचारा!; रामदास कदमांवर मनोज जरांगे पाटलांचा पलटवार

Ramdas Kadam Targets BJP: एकनाथ शिंदेंविरोधात भाजपकडून षडयंत्र, रामदास कदमांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप
4

Ramdas Kadam Targets BJP: एकनाथ शिंदेंविरोधात भाजपकडून षडयंत्र, रामदास कदमांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.