Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Gaikwad : महायुतीत पुन्हा ठिणगी! संजय गायकवाडांचा भाजपवर हल्लाबोल! ‘शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपचे आमदार घरी बसले असते’

Sanjay Gaikwad : महाराष्ट्रात महायुतीमधील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. रामदास कदमांच्या वक्तव्यानंतर संजय गायकवाड यांनी भाजपला सुनावत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला.

  • By विवेक
Updated On: Oct 24, 2026 | 06:51 PM
sanjay gaikwad

sanjay gaikwad

Follow Us
Follow Us:
  • संजय गायकवाडांचा भाजपवर निशाणा
  • रामदास कदमांच्या वक्तव्यावरून महायुतीत वाद
  • महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत
 

राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणात धुसफूस पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी फोडलेल्या ऑडिओ बॉम्बनंतर महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील नेते एकमेकांवर राजकीय कुरघोड्या करत असून आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झाडात आहेत. अश्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा भाजपवर सडकून टीका केली आहे. (Sanjay Gaikwad)

संजय गायकवाड यांनी भाजप नेत्यांना सुनावत ‘एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता तर भाजपचे 106 आमदार घरी बसले असते,’ असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने महायुतीमधील वादात अजून ठिणगी पडली आहे. आधीच शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपवर केलेल्या आरोपांमुळे आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे महायुतीत गरमागरमीचे वातावरण आहे. त्यातच आता संजय गायकवाडांच्या विधानानेदेखील मोठा वाद निर्माण व्हायची शक्यता आहे.

संजय गायकवाडांचा भाजपला थेट सवाल

भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड यांनी शिंदेंच्या नेतृत्वाची बाजू मांडली. महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या यशामागे एकनाथ शिंदे यांचा चेहरा महत्त्वाचा होता, असा दावा त्यांनी केला. भाजपकडे 106 आमदार असतानाही शिंदेंच्या बंडामुळेच सत्तेचं राजकीय समीकरण बदललं, असं गायकवाड म्हणाले.

‘माझ्यापर्यंत पैसे आलेच नाहीत!’ 500 कोटींच्या दाव्यावर Shrikant Shinde यांचा मिश्किल टोला

त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी बोलताना आधी विचार करावा आणि वरिष्ठांशी चर्चा करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. शिवसेनेचा आवाज कोणीही दाबू शकत नाही, असं सांगत त्यांनी पक्षाची भूमिका ठामपणे मांडली.

रामदास कदमांच्या वक्तव्याचं समर्थन

रामदास कदम यांनी नेमकं काय चुकीचं बोललं, असा सवालही संजय गायकवाड यांनी उपस्थित केला. संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या आमदारांचा आणि कार्यकर्त्यांचा आवाज असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणात इतरांवर आरोप करण्याआधी संबंधितांनी आत्मपरीक्षण करावं, असंही ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांना एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय गायकवाड यांनी व्यक्त केला. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयात एकनाथ शिंदेंची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगत त्यांनी त्यांच्या नेतृत्वाचं समर्थन केलं.

महायुतीत पुढे काय होणार?

एकनाथ शिंदे शांत आणि संयमी असले, तरी शिवसेनेच्या बाजूने आम्ही उत्तर देऊ, अशी भूमिका गायकवाड यांनी मांडली. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेतील मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. आता या आरोपांवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते आणि महायुतीचे वरिष्ठ नेते या वादात हस्तक्षेप करतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत…; जरांगे पाटलांचा आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: संजय गायकवाड यांनी भाजपवर टीका का केली?

    Ans: रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिंदेसेनेत सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांवर प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड यांनी भाजपवर टीका केली.

  • Que: संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदेंबाबत काय विधान केलं?

    Ans: एकनाथ शिंदेंनी उठाव केला नसता, तर भाजपचे 106 आमदार असूनही ते घरी बसले असते, असं विधान संजय गायकवाड यांनी केलं.

  • Que: महायुतीमध्ये कोणत्या मुद्द्यांवरून वाद सुरू आहे?

    Ans: रामदास कदम यांच्या वक्तव्यावरून भाजप आणि शिंदेसेनेमध्ये मतभेद समोर आले आहेत. एकनाथ शिंदेंचं नेतृत्व, मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित राजकीय आरोप आणि मराठा आरक्षणासारखे मुद्देही या चर्चेत आले आहेत.

Web Title: Sanjay gaikwad slams bjp eknath shinde mahayuti politics vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • BJP
  • Manoj Jarange Patil
  • Sanjay Gaikwad
  • shivsena

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: भाजप-शिंदे गटात मतभेद? बिलो टेंडरच्या मुद्द्यावर नंदकिशोर परब यांचं स्पष्टीकरण
1

Maharashtra Politics: भाजप-शिंदे गटात मतभेद? बिलो टेंडरच्या मुद्द्यावर नंदकिशोर परब यांचं स्पष्टीकरण

Manoj Jarange Audio Clip Row : ‘फडणवीस, शिंदे आणि जरांगे… बाकी सगळे एक्स्ट्रा!’ म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल
2

Manoj Jarange Audio Clip Row : ‘फडणवीस, शिंदे आणि जरांगे… बाकी सगळे एक्स्ट्रा!’ म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल

Manoj Jarange Patil threat attack: मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत…; जरांगे पाटलांचा आरोप
3

Manoj Jarange Patil threat attack: मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत…; जरांगे पाटलांचा आरोप

Mira Bhayandar News: भाजप नगरसेवकांच्या प्रभागात शिवसेनेचे जनआंदोलन; सोमवारपर्यंत कारवाई करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा
4

Mira Bhayandar News: भाजप नगरसेवकांच्या प्रभागात शिवसेनेचे जनआंदोलन; सोमवारपर्यंत कारवाई करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.