Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambadas Danve : पार्टनरला अटक का नाही? पुणे जमीन घोटाळा प्रकरणी अंबादास दानवे यांचे सरकारला चार प्रश्न

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आली आहे. यानंतर पार्थ पवारांवर कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 04, 2025 | 01:02 PM
Shivsena Aambadas Danve asks Mahayuti four questions on Parth Pawar arrest in social media post

Shivsena Aambadas Danve asks Mahayuti four questions on Parth Pawar arrest in social media post

Follow Us
Close
Follow Us:
  • पुणे जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांवर कारवाईची मागणी
  • शिवसेना अंबादास दानवे यांची सोशल मीडिया पोस्ट
  • अंबादास दानवे यांचे सरकारला चार प्रश्न
Ambadas Danve : मुंबई : मुंढवा आणि कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. सरकारी जमीन हडपल्याचा आरोपाखाली तिला अटक करण्यात आली. मात्र या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांचे देखील नाव आले होते. मात्र पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये न आल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे.

अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर महायुती सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहे. यासंबंधित त्यांनी एक्स यावर पोस्ट करुन पार्थ पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अंबादास दानवे यांनी लिहिले आहे की, पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला ‘अखेर’ अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे, असे म्हणत अंबादास दानवे यांनी चार प्रश्न उपस्थित केले आहेत.

हे देखील वाचा : अजित पवारांच्या घरी लगीनगाई! परदेशात पार पडणार विवाहसोहळा, राष्ट्रवादीच्या केवळ दोन नेत्यांनाच आमंत्रण

अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
१. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही?
२. पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस ‘मुदतवाढ-मुदतवाढ’ खेळणार आहात?
३. अमेडिया कंपनीत केवळ १ टक्का भागधारक दिग्विजय हा ९९ टक्के भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी झाला का?
४. मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सरकार कधी जाहीर करणार?

ही शुल्क माफी राजकीय दबावाशिवाय होणे शक्य नाही महोदय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची कल्पना नाही असे सांगणे, हे जनतेला शुद्ध वेडे बनवणे आहे. ते ही बहुमताच्या जोरावर! असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला ‘अखेर’ अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे.. १. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही?
२. पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर…
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 4, 2025

हे देखील वाचा : सरकारी जमीन खाऊनही FIR मध्ये नाव नाही; पार्थ पवारांवर अंजली दमानियांचा चढला पारा

याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील पार्थ पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुणे जमीन घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आली आहे. मात्र पार्थ पवार यांचे नाव एफआरआयमध्ये नाव नसल्यामुळे टीका केली जात आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, पुण्यातील जमीन प्रकरणातील कारवाई संपूर्ण फार्स असून त्याची सुरुवात पाच नोव्हेंबरपासून झाली. इतका संघर्ष करूनही या प्रकरणांमध्ये काहीच होत नाही. अजित पवारांच्या मुलाला कायदा लागू होत नाही, राजकारणी असाल तर तुम्हाला काहीच होत नसल्याचे त्या म्हणाल्या. अधिवेशनामध्ये गदारोळ होऊ शकतो म्हणूनच काहीतरी दाखवायचं म्हणून शीतल तेजवानीला अटक करण्यात आली, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.

Web Title: Shivsena aambadas danve asks mahayuti four questions on parth pawar arrest in social media post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 01:02 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • parth pawar
  • political news

संबंधित बातम्या

Digital 7/12 ला कायदेशीर मान्यता; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय
1

Digital 7/12 ला कायदेशीर मान्यता; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय

Anjali Damania : सरकारी जमीन खाऊनही FIR मध्ये नाव नाही; पार्थ पवारांवर अंजली दमानियांचा चढला पारा
2

Anjali Damania : सरकारी जमीन खाऊनही FIR मध्ये नाव नाही; पार्थ पवारांवर अंजली दमानियांचा चढला पारा

Local Body Elections : परभणी जिल्ह्यात ७५ टक्के मतदान; पूर्णा येथे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने गोंधळ
3

Local Body Elections : परभणी जिल्ह्यात ७५ टक्के मतदान; पूर्णा येथे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने गोंधळ

Sheetal Tejwani arrested : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट; अखेर शीतल तेजवानीला अटक
4

Sheetal Tejwani arrested : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट; अखेर शीतल तेजवानीला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.