
Shivsena candidate from Padmavati-Sahakarnagar ward number 36 eat AB form local body election
महापालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 30 डिसेंबर ही शेवटची तारीख होती. राजकीय पक्षांकडून उमेदवारी आणि एबी फॉर्म मिळवण्य़ासाठी अनेकांनी अर्ज दाखल उशीरा केले. तसेच अर्ज दाखल करण्यासाठी अवघा काहीच काळ शिल्लक राहिल्यामुळे गोंधळ देखील निर्माण झाला. शिंदे गट आणि भाजपमधील जागावाटपाचा मुद्दा शेवटपर्यंत मार्गी न लागल्यामुळे इच्छुकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे पुण्यामध्ये शिंदे गटाकडून एकाच मतदारसंघासाठी दोन जणांना एबी फॉर्म चुकून देण्यात आले. यामुळे एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज फाडून खाऊन टाकला.
हे देखील वाचा : अहिल्यानगर मनपा निवडणुकीत महायुतीत फूट; नाराज उमेदवारांचे पक्षांतर
पुण्यातील पद्मावती-सहकारनगर प्रभाग क्रमांक 36 मध्ये हा गोंधळ निर्माण झाला. शिवसेना शिंदे गटाकडून पहिल्यांदा मच्छिंद्र ढवळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांना एबी फॉर्म देखील देण्यात आला. यानंतर शिवसेनेने चुकून आणखी एका उमेदवाराला एबी फॉर्म दिल्याने गोंधळ निर्माण झाला. शिवसेना शिंदे गटाने त्यानंतर उद्धव कांबळे यांना देखील एबी फॉर्म दिला. यामुळे एकाच पक्षातील दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने वांदग निर्माण झाला.
हे देखील वाचा: भाजपने 42 नगरसेवकांना दाखविला घरचा रस्ता; अनेकांची बंडखोरी
दोन्ही उमेदवारांमधील एकाच उमेदवाराचा अर्ज वैध धरल्यामुळे दुसऱ्याचा फॉर्म फाडला. उद्धव कांबळे यांना एबी फॉर्म दिल्यानंतर ते अधिकृत उमेदवार असल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र ढवळे यांची उमेदवारी कायम राहिल्यामुळे अर्ज छाननी वेळी कांबळे यांनी ढवळे यांना दिलेला एबी फॉर्म फाडला आणि त्यानंतर तो एबी फॉर्म खाल्ला सुद्धा. एबी फॉर्म खाऊन गिळल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. पुण्यातील या प्रकारावरुन जोरदार टीका केली जात आहे. सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून फॉर्म खालेल्या उद्धव कांबळे यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.