Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; 82 व्या वर्षी पत्नी मेघना कीर्तीकर यांचे निधन

शिवसेनेचे नेते व माजी खासदार गजानन किर्तीकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पत्नी मेघना गजानन किर्तीकर यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 05, 2025 | 09:52 AM
Shivsena Gajanan Kirtikar wife Meghna Kirtikar passed away in Mumbai

Shivsena Gajanan Kirtikar wife Meghna Kirtikar passed away in Mumbai

Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. मेघना गजानन कीर्तिकर यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारपणानंतर मेघना कीर्तिकर यांचे निधन झाले आहे.

आज रविवारी 05 जानेवारी 2025 रोजी पहाटे 3.30 वाजता मेघना गजानन कीर्तिकर त्यांची प्राणज्योत मालवली. मागील अनेक दिवसांपासून मेघना गजानन कीर्तिकर या आजारी होत्या. त्यांच्यावर वांद्र्यातील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मेघना कीर्तिकर यांच्या जाण्याने गजानन किर्तीकर आणि त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मेघना किर्तीकर त्यांच्यावर गोरेगाव पूर्व मधील शिवधाम स्‍मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. मेघना कीर्तिकर यांचे पार्थिव संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यान अंत्यदर्शनसाठी त्यांच्या गोरेगाव पूर्वमधील स्नेहदीप, पहाडी रोड नं. २ या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. यानंतर शिवधाम स्‍मशानभूमी, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व) या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्‍यसंस्‍कार होतील.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर

एकाच घरात दोन गट

काही वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये बंड करुन एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली. यामध्ये उद्धव ठाकरे गट व शिंदे गट असे दोन गट पडले. यामध्ये कीर्तीकर कुटुंबामध्ये देखील दोन राजकीय गट पडल्याचे दिसून आले होते. गजानन किर्तीकर हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. पण गजानन कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दिला आणि ते शिंदे गटामध्ये सामील झाले. तर गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली. त्यामुळे कीर्तीकर कुटुंबामध्ये राजकीय दोन गट पडल्याचे दिसून आले होते. अमोल कीर्तीकर यांना उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवले होते. अमोल कीर्तिकर हे उद्धव गटाच्या शिवसेनेचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा जागेचे उमेदवार होते. त्यांच्याविरोधात शिंदे गटाचे (शिवसेना) उमेदवार रवींद्र वायकर यांनी चुरशीची लढत दिली. यामध्ये अमोल किर्तीकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. शिंदे गटाचे शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर ४८ मतांनी विजयी झाले. यामुळे अमोल कीर्तीकर यांनी प्रश्न देखील उपस्थित केले होते. अमोल कीर्तीकर यांना मातृशोक झाला असून त्यांच्या आई मेघना कीर्तीकर यांनी अमोल कीर्तीकर यांच्या उद्धव ठाकरेंसोबत जाण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता.

 

Web Title: Shivsena gajanan kirtikar wife meghna kirtikar passed away in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 09:40 AM

Topics:  

  • Gajanan Kirtikar
  • political news
  • Shivena

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.