Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्या आमच्या लाडक्या भावजय, पण कधी-कधी…; सुषमा अंधारेंनी अमृता फडणवीसांना फटकारले

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राजकीय टीका केली होती. त्यांच्यावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यासुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 29, 2024 | 05:52 PM
sushma anadhare target amruta fadnavis

sushma anadhare target amruta fadnavis

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील महाविकास आघाडीवर निशाणा साधला. नागपूरमध्ये एका कार्यक्रमामध्ये सामील झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे नाव न घेता खडेबोल सुनावले. त्यानंतर आता विरोधकांनी देखील पलटवार केला आहे. ठाकरेसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीस यांचा लाडकी भावजय असा उल्लेख करत टीका केली आहे.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

नागपूरमधील कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या अमृता फडणवीस यांनी राजकीय टीका केली. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचे कौतुक करत महायुती सरकारला पुन्हा एकदा निवडून द्या, असे आवाहन अमृता फडणवीस यांनी केले. पुढे त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, “काही लोक असं म्हणतात की स्त्रियांच्या प्राथमिकता काय? तर ती असते माझं कुटुंब माझी जबाबदारी. आपण स्त्रिया हे म्हणू शकतो कारण कुटुंबाचा आपण भाग आहोत. पण जेव्हा एखादा मोठा नेता म्हणतो की माझं कुटुंबच माझी जबाबदारी तर तो आपल्यासाठी प्रॉब्लेम आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी व्हिजन असलेली माणसं सत्तेत आली पाहिजेत. आपल्या सगळ्यांची प्रगती त्यात आहे. असं झालं तर मग असे नेते येणार नाहीत ज्यांना आपली घरं भरायची आहेत किंवा आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे. ज्यांना लोकांची काळजी आहे असे लोक पुढे आले पाहिजे,” असे म्हणत अमृता फडणवीस यांनी निशाणा साधला होता. शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

हे देखील वाचा : स्टेजवर भाषण करताना मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रकृती खालावली; म्हणाले, “मी इतक्या लवकर मरणार नाही”

यावरुन आता विरोधातील महिला नेत्यांनी देखील टीका केली. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाले की, “अमृता वहिनी या आमच्या लाडक्या भावजय आहेत. त्या कधी-कधी खरं बोलतात. खरं तर एकनाथ शिंदे यांना त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे याला महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून पुढे आणायचं आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांनी फोडली आणि अजित पवार यांच्यापेक्षा जास्तीचा लाभ स्वत:च्या पदरात पाडून घेतला, त्या सुनील तटकरेंना त्यांची मुलगी आदिती तटकरे यांना राज्याचं मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळे अमृता फडणवीस जे काही बोलल्या, ते एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यासंदर्भात आहे”, असा खोच टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

हे देखील वाचा : शाळेच्या भिंतीवर अदानींचा फोटो लावण्याची तयारी…; राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयावरुन विरोधी पक्षनेते आक्रमक

पुढे महायुतीवर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “महायुती काहीही करायला गेली, की त्याचं उटलं होतं आहे. महायुतीच्या सरकारने रक्षाबंधनाच्या दिवशी मोठा गाजावाजा लाडकी बहीण योजनेचा प्रचार केला, पण दुसऱ्या दिवशी बदलापूरची घटना घडली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाजारांचा पुतळा कोसळला. अशा एक ना अनेक घटना घडत आहेत. कारण त्यांची काम करण्याची नियत चांगली नाही. ते लोकाभिमूख काम करत नाही, तर मताभिमूक काम करतात. त्यामुळे जे लोक मतांसाठी अशा तिकडमबाजी करतात,” अशी लोक अडचणीत येणं स्वाभाविक आहे”, अशी जोरदार टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Web Title: Shivsena leader sushma aandhare target devendra fadnavis wife amruta fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 05:52 PM

Topics:  

  • Amruta Fadnavis
  • BJP Devendra Fadnavis
  • Vidhansabha Election 2024

संबंधित बातम्या

अमृता फडणवीस बदनामीप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
1

अमृता फडणवीस बदनामीप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला

Padalkar-Awhad Clashes: पडळकर-आव्हाड वादाचा परिणाम? नताशा आव्हाडांवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट
2

Padalkar-Awhad Clashes: पडळकर-आव्हाड वादाचा परिणाम? नताशा आव्हाडांवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट

Mahapooja by Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांकडून विठूरायाची सपत्नीक शासकीय महापूजा, पहा खास फोटो
3

Mahapooja by Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांकडून विठूरायाची सपत्नीक शासकीय महापूजा, पहा खास फोटो

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! जूनच्या हप्त्याविषयी आदिती तटकरे म्हणाल्या, “पात्र लाभार्थ्यांच्या आधार…”
4

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! जूनच्या हप्त्याविषयी आदिती तटकरे म्हणाल्या, “पात्र लाभार्थ्यांच्या आधार…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.