Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंजाबमध्ये राजकारण तापलं; शिख मंत्र्यांचा थेट मुख्यमंत्र्यांविरोधात मोर्चा, भगवंत मान आता…

अकाल तख्ताच्या या निर्णयामागे मुख्यमंत्री मान यांच्याशी संबंधित एक कथित वादग्रस्त व्हिडिओ कारणीभूत ठरला आहे. या व्हिडिओमध्ये ते शीख गुरूंच्या पवित्र चित्रांबाबत आक्षेपार्ह वर्तन करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 17, 2026 | 01:16 PM
पंजाबमध्ये राजकारण तापलं; शिख मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांविरोधात थेट मोर्चा, भगवंत मान आता...

पंजाबमध्ये राजकारण तापलं; शिख मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांविरोधात थेट मोर्चा, भगवंत मान आता...

Follow Us
Follow Us:

अमृतसर : शीख धर्मातील सर्वोच्च धार्मिक संस्था असलेल्या श्री अकाल तख्त साहिबने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याविरोधात कठोर भूमिका घेत त्यांना ‘गुरु-द्रोही’ आणि ‘खालसा पंथविरोधी’ घोषित केले आहे. तसेच जगभरातील शीख समाजाने त्यांच्याशी सामाजिक व धार्मिक संबंध ठेवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

अकाल तख्ताच्या या निर्णयामागे मुख्यमंत्री मान यांच्याशी संबंधित एक कथित वादग्रस्त व्हिडिओ कारणीभूत ठरला आहे. या व्हिडिओमध्ये ते शीख गुरूंच्या पवित्र चित्रांबाबत आक्षेपार्ह वर्तन करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, मान यांनी हा व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट तयार करण्यात आल्याचा आरोप केला होता. अकाल तख्तने त्यांच्या दाव्याचे पुरावे मागितले होते, परंतु सहा महिन्यांनंतरही कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आला नाही. यानंतर अकाल तख्तने दोन मान्यताप्राप्त फॉरेन्सिक प्रयोगशाळांकडून व्हिडिओची तपासणी करून घेतली.

दरम्यान, या तपासणीत व्हिडिओमध्ये कोणतीही छेडछाड किंवा एआयचा वापर झाल्याचे आढळून आले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री मान यांनी धार्मिक पीठासमोर खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला. पंजाब सरकारने नुकताच संमत केलेल्या ‘जगत जोत श्री गुरु ग्रंथ साहिब सत्कार (सुधारणा) कायदा, २०२६ ‘वरूनही वाद निर्माण झाला आहे.

२९ जूनला हजर राहण्याचे आदेश

अकाल तख्तने या प्रकरणात पंजाब मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना आणि राज्यातील शीख आमदारांना २९ जून रोजी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या राजीनाम्याची मागणी करत, त्यांनी नैतिक अधिकार गमावल्याचा दावा केला आहे.

व्हिडिओही झाला होता व्हायरल

दुसरीकडे, अरविंद केजरीवाल यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, भगवंत मान असा दावा करतात की, काही काळापूर्वी एका व्हिडिओमुळे अकाळ तख्तने त्यांच्या विरोधात आदेश जारी केले होते. तो व्हिडिओ खरा नसून, एआयने (AI) तयार केलेला आहे. अकाळ तख्तसमोर हजर राहून मी सांगितले की, व्हिडिओमधील व्यक्ती मी नाही. व्हिडिओमधील व्यक्ती माझ्यासारखी दिसतही नाही. मात्र, मला धक्का बसला आहे की, उच्च धार्मिक पदांवरील लोक त्यांच्या राजकीय अजेंड्याला पुढे नेण्यासाठी खोटा प्रचार करत आहेत आणि माझी बदनामी करत आहेत.

Sanjeev Arora Arrested : पंजाबमध्ये ‘आप’ला मोठा धक्का! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मंत्री संजीव अरोरा यांना ईडीकडून अटक

Web Title: Sikh ministers hold direct protest against the chief minister bhagwant mann

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • Bhagwant Mann
  • political news
  • Punjab government

संबंधित बातम्या

ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार? सहा खासदार एकनाथ शिंदेंसोबत दिल्लीत, आज निर्णय…
1

ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार? सहा खासदार एकनाथ शिंदेंसोबत दिल्लीत, आज निर्णय…

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वपूर्ण रणनीती; निवडणुकीपर्यंत मतदारांना ठेवणार एकत्र
2

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वपूर्ण रणनीती; निवडणुकीपर्यंत मतदारांना ठेवणार एकत्र

‘मोदी सरकार दबाव आणि भीतीचं राजकारण करतंय’; नाना पटोलेंचे टीकास्त्र
3

‘मोदी सरकार दबाव आणि भीतीचं राजकारण करतंय’; नाना पटोलेंचे टीकास्त्र

मोठी बातमी ! ठाकरे गटाच्या खासदारांची ‘मातोश्री’वर आज महत्त्वपूर्ण बैठक; ‘या’ मुद्यांवर होणार चर्चा
4

मोठी बातमी ! ठाकरे गटाच्या खासदारांची ‘मातोश्री’वर आज महत्त्वपूर्ण बैठक; ‘या’ मुद्यांवर होणार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.