Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“जसे मोदींचे एपस्टीनशी संबंध तसेच महाराष्ट्र भाजपचे खरातशी संबंध,” सुजात आंबेडकरांची जहरी टीका

नाशिकमधील जेलरोड परिसरात जनसंवाद मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्यात उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. सुजात आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून यावरून आता चर्चा रंगू लागल्या आहेत.

  • By विवेक
Updated On: May 16, 2026 | 03:04 PM
Sujat Ambedkar slams PM Narendra Modi over Epstin Files, Sujat Ambedkar on Narendra Modi, Epstin Files,

Sujat Ambedkar slams PM Narendra Modi over Epstin Files, Sujat Ambedkar on Narendra Modi, Epstin Files,

Follow Us
Follow Us:
  • सुजात आंबेडकर यांनी नाशिकमधील भोंदू अशोक खरातप्रकरणी भाजपवर जोरदार टीका
  • एप्सटिन फाईलची कॉपी बाळासाहेब आंबेडकरांकडे – सुजात आंबेडकर
  • “स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी देश विकतो, हा पंतप्रधान कॉम्प्रोमाइज्ड आहे, विकला गेला आहे,” प्रधानमंत्री मोदी यांच्यावर टीका
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी नाशिकमधील भोंदू अशोक खरातप्रकरणी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरदेखील आगपाखड करत “जसे नरेंद्र मोदींनी एपस्टीन, ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्याशी संबंध ठेवले. तसेच महाराष्ट्र भाजपाने नाशिक मध्ये एपस्टीन सारखा खरात पाळण्याचे काम केले,” अश्या शब्दात टीका केली. नाशिकमधील जेलरोड परिसरात जनसंवाद मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्यात उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. सुजात आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून यावरून आता चर्चा रंगू लागल्या आहेत.

नाशिकमधील सभेत बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले, “जसे नरेंद्र मोदींनी एपस्टीन, ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्याशी संबंध ठेवले. तसेच महाराष्ट्र भाजपाने नाशिकमध्ये एपस्टीनसारखा खरात पाळण्याचे काम केले. अमेरिकेत ट्रम्पने जेफ्री एपस्टीनला वाचवण्याचे काम केले आणि महाराष्ट्रातल्या भाजपाने खरातला वाचवण्याचे काम केले. नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदापासून हटवणे आणि एपस्टीन केस मधील सगळ्यांना अमेरिकेत आणि इजरायल मध्ये आपल्या हातात नसले तरी, खरात प्रकरणात जे पक्ष, जे नेते लिप्त होते ज्यांनी त्यांना वाचवण्याचे काम केले. त्यांना नाशिकमध्ये मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही अशी खुणगाठ बांधली पाहिजे,” असे ते यावेळी म्हणाले.

“माझ्याबाबत अनेक चुकीच्या बातम्या पसरवल्या,” ED चौकशीनंतर रुपाली चाकणकरांचे मोठे वक्तव्य

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत ते पुढले म्हणाले, “या देशाला बदल हवा होता म्हणून नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री केले. तेव्हापासून आतापर्यंत मोदींनी फक्त फेकण्याचे काम केले. आज स्कॉलरशिप्स धोक्यात आहे, आज रुपयाचा दर पडताना दिसतोय, डिझेल पेट्रोल महाग होत चाललंय, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव नाहीये. आणि आपले पंतप्रधान आपल्याला बसून सांगतात कि सोनं नका घेऊ, इंधन नका वापरू, जास्त प्रवास नका करू… पण यांच्या मित्राचा फोन आला कि हे विमान काढून इस्राएलला जातात. दुसऱ्या मित्राचा फोन आला कि विमान काढून अमेरिकेला जातात. नरेंद्र मोदी असे पंतप्रधान आहेत जे कॉम्प्रोमाइज्ड झाले आहेत. नरेंद्र मोदींची जी फाईल आहे त्याची कॉपी एप्सटिन फाईलमध्ये आहे. आणि त्या एप्सटिन फाईलची कॉपी बाळासाहेब आंबेडकरांकडे आहे.”

“नरेंद्र मोदी यांचे एपस्टीनशी संबंध आहेत. ज्या फाईलमध्ये एप्सटिनच्या सगळ्या काळ्या करतुती लिहून ठेवल्या आहेत त्याच एप्सटिन फाईलमध्ये मोदींच नाव आहे. ज्या माणसाचे संबंध एका बलात्काऱ्याशी आहेत त्या माणसाला आपण एक चांगला पंतप्रधान मानणार का? जर एप्सटिन फाईल अमेरीकेकडे आहे तर डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या हातात मोदींचा नाडा नाही आहे का? आणि असं असेल तर अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प मोदींना हवं तसं नाचवू नाही शकत का? म्हणूनच आता जो भारत आणि अमेरिकेत करार झाला त्या करारात मोदींनी भारत देश अमेरिकेला विकलेला आहे. आणि म्हणून जो माणूस अमेरिका आणि ट्रम्प आपली पोलखोल करेल म्हणून स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी देश विकतो हा पंतप्रधान कॉम्प्रोमाइज्ड आहे, विकला गेला आहे. कोणत्याही परिस्थितीत या पंतप्रधानाला बदलायची गरज आहे,” अश्या शब्दात त्यांनी सडकून टीका केली.

“देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळं केलं,” मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील पुन्हा भडकले!

Web Title: Sujat ambedkar slams pm narendra modi over epstin files

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • narendra modi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Phone Tapping Allegation: माझा फोन टॅपिंग केला जातोय, त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे..; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप
1

Rahul Gandhi Phone Tapping Allegation: माझा फोन टॅपिंग केला जातोय, त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे..; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप

Namo Bharat Train : नमो भारत ट्रेनचा ऐतिहासिक विक्रम! 5 कोटी प्रवासांचा टप्पा पार; अवघ्या 93 दिवसांत 1 कोटींची भर
2

Namo Bharat Train : नमो भारत ट्रेनचा ऐतिहासिक विक्रम! 5 कोटी प्रवासांचा टप्पा पार; अवघ्या 93 दिवसांत 1 कोटींची भर

Cabinet Decisions 2026 : मोदी सरकारचे ५ मोठे निर्णय! संग्रहालय, मेट्रोसह शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींचे अनुदान
3

Cabinet Decisions 2026 : मोदी सरकारचे ५ मोठे निर्णय! संग्रहालय, मेट्रोसह शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींचे अनुदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.