Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sujay Vikhe Patil : ‘छेड काढणारा हिंदू असो वा मुस्लिम, तिथेच चोप दिला पाहिजे’; सुजय विखेंनी थेट आमदार संग्राम जगतापांचेच कान टोचले

शिर्डीतील हिंदू जनआक्रोश मोर्चात बोलताना माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत आमदार संग्राम जगताप यांना थेट टोला लगावला. मुलींची छेड काढणाऱ्यांना धर्म न पाहता तिथेच धडा शिकवण्याची भूमिका त्यांनी मांडली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 23, 2026 | 12:43 PM
'छेड काढणारा हिंदू असो वा मुस्लिम, तिथेच चोप दिला पाहिजे'; सुजय विखेंनी थेट आमदार संग्राम जगतापांचेच कान टोचले!

'छेड काढणारा हिंदू असो वा मुस्लिम, तिथेच चोप दिला पाहिजे'; सुजय विखेंनी थेट आमदार संग्राम जगतापांचेच कान टोचले!

Follow Us
Follow Us:
  • ‘केवळ विशिष्ट धर्माच्या लोकांना मारणे म्हणजे हिंदुत्व नाही’
  • शिर्डीत सुजय विखेंचे रोखठोक वक्तव्य
  • सुजय विखेंनी थेट आमदार संग्राम जगतापांचेच कान टोचले!
पोपट पिटेकर, शिर्डी : “आपण स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे म्हणवतो. त्यामुळे आपली भूमिका केवळ एकाच बाजूने असून चालणार नाही. केवळ विशिष्ट धर्माचे लोक शोधून त्यांना मारणे म्हणजे हिंदुत्व नाही, तर माता-भगिनींची छेड काढणारा समोरचा व्यक्ती कोणत्याही धर्माचा असला, तरी त्याला तिथेच चोप दिला पाहिजे,” असे रोखठोक प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. शिर्डी येथे आयोजित ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’त बोलताना सुजय विखे यांनी आपल्या भाषणातून थेट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे आमदार संग्राम जगताप यांचे जाहीरपणे कान टोचले.

आमदार संग्राम जगतापांना थेट टोला

शिर्डीतील या जनआक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरून सुजय विखे पाटील यांनी महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत थेट आमदार संग्राम जगताप यांना लक्ष्य केले. विखे पाटील म्हणाले, “संग्राम भैय्या तुम्ही नगरमध्ये पाहत असाल आणि मी राहुरी, शिर्डी, श्रीरामपूर भागात पाहतोय की, कॉलेज सुटलं की काही ठराविक पोरं डोळ्यावर गॉगल लावून आणि बाईक घेऊन तिथे फिरत असतात. मुलींची छेड काढणे, शिट्ट्या वाजवणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. अशा टवाळखोरांना आधी तिथेच चोप दिला पाहिजे.” विखे पाटील यांच्या या थेट विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

Mira Bhayandar News : महिला व अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांवर महिला आयोग गंभीर; मीरा-भाईंदर पोलिसांना नोटीससदृश निर्देश

‘लव्ह जिहाद’ सोबतच ‘टवाळखोरांचा’ बंदोबस्त करा- आपल्या आक्रमक भाषणात सुजय विखे यांनी कार्यकर्त्यांना थेट निर्देश दिले. “आपली भूमिका केवळ ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात बोलण्यापुरती मर्यादित नसावी. कॉलेजच्या बाहेर उभे राहून महिलांची छेड काढणाऱ्या प्रत्येक टवाळखोराला ठोकून काढा, तरच तुम्ही खरे हिंदू आहात. जो कोणी आपल्या आई-बहिणीची छेड काढेल, मग तो हिंदू असला तरी त्याचा बंदोबस्त करण्याचे काम सकल हिंदू समाजाने केले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

“तुम्ही पुढे व्हा, सुजय विखे पाठीशी खंबीरपणे उभा आहे”

धर्माच्या रक्षणासोबतच महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन विखे पाटील यांनी केले. “धर्माच्या संरक्षणासाठी नक्कीच लढा, पण तितक्याच तत्परतेने आपल्या महिला भगिनींना सुरक्षित ठेवण्यासाठीही पुढे या. जो कोणी मुलींची छेड काढेल, मग तो हिंदू असो वा मुसलमान, त्याला आधी ठोकून काढा आणि मग माझ्याकडे या… तुमच्या पाठीशी सुजय विखे खंबीरपणे उभा आहे,” अशी जाहीर हमी देखील त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली.

शिर्डीतील या मोर्चात सुजय विखे यांनी घेतलेल्या या आक्रमक आणि सर्वसमावेशक भूमिकेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यांनी आमदार संग्राम जगताप यांचे कान टोचल्यामुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात मोठं जलसंकट; बीडला सर्वाधिक फटका, 173 लहान-मोठ्या जलाशयांपैकी 81 पूर्णपणे कोरडेच

Web Title: Sujay vikhe patil slams rowdies and targets sangram jagtap at shirdi morcha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • ahmednagar
  • Sujay Vikhe-Patil

संबंधित बातम्या

Shani Shingnapur : पावणेदोन कोटींच्या सुविधांवर धूळ; शनिशिंगणापूर महाप्रसादालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
1

Shani Shingnapur : पावणेदोन कोटींच्या सुविधांवर धूळ; शनिशिंगणापूर महाप्रसादालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.