Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shevgaon Tree Cutting Case: शेवगावात हजारो झाडांच्या कत्तलीचे प्रकरण तापले; जप्त लाकडाच्या साठ्याची पळवापळवी!

Shevgaon Tree Cutting Case: अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे हजारो झाडांची कत्तल केल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या लाकडाच्या साठ्याची पळवापळवी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत स्वाभिमानी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 10, 2026 | 02:46 PM
शेवगावात हजारो झाडांच्या कत्तलीचे प्रकरण तापले; जप्त लाकडाच्या साठ्याची पळवापळवी!

शेवगावात हजारो झाडांच्या कत्तलीचे प्रकरण तापले; जप्त लाकडाच्या साठ्याची पळवापळवी!

Follow Us
Follow Us:
  • शेवगावात हजारो झाडांच्या कत्तलीचे प्रकरण तापले
  • जप्त साठ्याची पळवापळवी
  • दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची स्वाभिमानीची मागणी!
पोपट पिटेकर, अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात निसर्गाची निर्दयपणे चिरफाड करत हजारो झाडांची बेसुमार कत्तल केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार नवराष्ट्रने उघडकीस आणल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या वृत्ताची दखल घेत वनविभागाने तात्काळ कारवाईचा बडगा उगारला खरा, परंतु ही कारवाई केवळ आई जेवू घालेना आणि बाजी भिक मागू देईना या म्हणीप्रमाणे अत्यंत तकलादू आणि दिखाऊ ठरली आहे. विशेष म्हणजे, कारवाई करून जप्त केलेला लाकडांचा महाकाय साठा जागेवरच परस्पर दुसरीकडे हलवून गायब केल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार आता उजेडात आला आहे.(Shevgaon Tree Cutting Case)

वनविभाग आणि लाकूड माफियांचे संगनमत,स्वाभिमानीचा घणाघात

या संपूर्ण भ्रष्ट कारभारात स्थानिक वनविभागाचे अधिकारी आणि लाकूड वखारींचे मालक पूर्णपणे मॅनेज असल्याचा सणसणीत आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. एकीकडे बेकायदा वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून मानवी जीवनावर आणि आरोग्यावर गंभीर संकट ओढवत आहे, तर दुसरीकडे वनविभागाचे अधिकारी लाच घेऊन गुन्हेगारांना अभय देत आहेत.

Torrent Power: टोरंटसाठी सरकारच्या पायघड्या? सायडोंगरात जमीन सर्वेक्षण सुरू होताच ठाकरे गट आक्रमक!

जर अशा प्रकारे शासकीय अधिकारीच तस्करांना पाठीशी घालून केवळ दिखाऊ कारवाईचा फार्स रचत असतील, तर हा थेट निसर्गाचा आणि जनतेच्या जीवाशी चाललेला खेळ आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी आक्रमक आणि उग्र मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

उद्या थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारात धडकणार

वनविभागाच्या या भ्रष्ट आणि लहरी कारभाराविरोधात आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एल्गार पुकारला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि लाकूड माफिया-अधिकारी युतीच्या म्होरक्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, यासाठी उद्या थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन निवेदन दिले जाणार असल्याचे संघटनेचे प्रमुख नेते दत्तात्रय फुंदे यांनी स्पष्ट केले आहे.

जप्त लाकूड गायब कुणाच्या आशीर्वादाने?–वनविभागाच्या जप्त केलेल्या मालाची चोरी कशी झाली? यामागे मोठा आर्थिक घोटाळा असल्याची शक्यता. जिल्हाधिकारी या प्रकरणात कोणती कठोर भूमिका घेणार आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? शेवगावमधील या अवैध धंद्यांची पाळेमुळे नेमकी कुठे रुजली आहेत, याचा पर्दाफाश होणार का?

पर्यावरणाचा विनाश करणाऱ्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या या यंत्रणेविरुद्ध आता शेतकरी आणि नागरिक आक्रमक झाले असून, या संपूर्ण प्रकरणावरून शेवगाव तालुक्यात कमालीचा तणाव व संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Best Bus Accident News: “अनियंत्रित बसने सिग्नलवर आणला प्रलय!” मुंबईतील लोढा जंक्शनवर बेस्ट बसचा भीषण अपघात, अनेक वाहने उद्ध्वस्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: शेवगावमध्ये कोणते प्रकरण समोर आले आहे?

    Ans: शेवगाव येथे हजारो झाडांची कत्तल झाल्याचे प्रकरण समोर आले असून, त्यावरून वाद निर्माण झाला आहे.

  • Que: जप्त केलेल्या लाकडाच्या साठ्याबाबत काय आरोप करण्यात आला आहे?

    Ans: जप्त करण्यात आलेल्या लाकडाच्या साठ्याची पळवापळवी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

  • Que: स्वाभिमानी संघटनेने कोणती मागणी केली आहे?

    Ans: या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी संघटनेने केली आहे.

Web Title: Shevgaon thousands of trees felling case seized wood stock controversy sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • ahmednagar
  • maharashtra
  • Shevgaon

संबंधित बातम्या

PM Modi’s Diwali In Bastar : नक्षलमुक्त बस्तरमध्ये जवानांसोबत पीएम मोदींची खास दिवाळी
1

PM Modi’s Diwali In Bastar : नक्षलमुक्त बस्तरमध्ये जवानांसोबत पीएम मोदींची खास दिवाळी

नागपुरात भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावरच हल्ला, लोखंडी कडा अन् दगडाने मारहाण; नेमकं काय घडलं?
2

नागपुरात भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावरच हल्ला, लोखंडी कडा अन् दगडाने मारहाण; नेमकं काय घडलं?

Kalyan Burial Dispute: मृतदेह घरात, पण दफनसाठी जागाच नाही! कल्याणमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना
3

Kalyan Burial Dispute: मृतदेह घरात, पण दफनसाठी जागाच नाही! कल्याणमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेसाठी नवी SOP लागू; नागरिक, पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध!
4

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेसाठी नवी SOP लागू; नागरिक, पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.