Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NALSAR University Controversy: नालसार विद्यापीठ वाद तापणार! बार कौन्सिलला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

हा वाद नालसारच्या दीक्षांत समारंभात सुरू झाला. विद्यार्थ्यांच्या एका गटाने सरन्यायाधीश सूर्यकांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला. २३ जुलै रोजी, ७० विधी पदवीधरांनी कुलगुरू, कुलसचिव आणि प्राध्यापकांना एक पत्र पाठवले.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 14, 2026 | 01:43 PM
Supreme Court, CJI Surya Kant, BCI, Legal News,NALSAR University Controversy News

Supreme Court, CJI Surya Kant, BCI, Legal News,NALSAR University Controversy News

Follow Us
Follow Us:
  • नालसार विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यातील सरन्यायाधीशांच्या निमंत्रणावरून वाद.
  • बार कौन्सिलने २०२६ च्या संपूर्ण बॅचची वकील म्हणून नोंदणी निलंबित करण्याची दिली होती धमकी.
  • सर्वस्तरातून टीका झाल्यानंतर बीसीआयने अवघ्या काही तासांत आपले परिपत्रक घेतले मागे.
 

NALSAR University Controversy:  हैदराबाद येथील प्रतिष्ठित नालसार विधी विद्यापीठातील विद्यार्थी आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यात एक नवा वाद उफाळून आला आहे. नालसार विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या एका गटाने सरन्यायाधीश सुर्यकांत यांच्या हस्ते पदवी प्रदान सोहळ्यास आमंत्रित करण्याच्या प्रस्तावाला विरोध केल्या प्रकरणी बार कौन्सिलने २०२६ मध्ये नालसारमधून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण तुकडीची वकील म्हणून नोंदणी निलंबित करण्याची घोषणा केली होती. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांविरुद्ध चौकशीची घोषणाही करण्यात आली होती. पण हा वाद उफाळून आल्याने अवघ्या काही तासांतच बार कौन्सिलचा हा आदेश मागे घेतला.

बार कौन्सिल ऑफ इंडियाने (BCI) काल जारी केलेल्या दोन परिपत्रकांविरोधात नालसारने (NALSAR) दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने बीसीआयला नोटीस बजावली आहे. बीसीआय’चे ज्येष्ठ वकील के. परमेश्वर यांनी सादर केलेल्या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयानेच नोटीस बजावत या उत्तर मागितले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने, जर विद्यार्थ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करायचे असेल, तर त्यात हस्तक्षेप करण्याचा बीसीआयला कोणताही अधिकार नाही, असे म्हटले आहे. तसेच न्यायालयाने याचिका ऐकून घेण्यास सहमती दर्शवली आहे.

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद

सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “या प्रकरणाशी बीसीआयचा काहीही संबंध नाही. आम्ही तुमच्यासोबत आहोत. विद्यार्थ्यांनी मला पत्र लिहिले आहे. हा विद्यार्थी आणि माझ्यातील संवाद आहे. विनाकारण परिपत्रके जारी करणारे ते कोण? मी महाविद्यालयात असताना विद्यार्थी उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होतो. कधीकधी, जरी ते चुकीच्या गोष्टी बोलत असले, तरी कायद्याच्या चौकटीत राहून आवाज उठवत असतील, तर त्यांना तसे करण्याची परवानगी दिली पाहिजे.”

वाद नेमका काय आहे?

हा वाद नालसारच्या दीक्षांत समारंभात सुरू झाला. विद्यार्थ्यांच्या एका गटाने सरन्यायाधीश सूर्यकांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला. २३ जुलै रोजी, ७० विधी पदवीधरांनी कुलगुरू, कुलसचिव आणि प्राध्यापकांना एक पत्र पाठवले. विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांना दीक्षांत समारंभासाठी आमंत्रित करण्याच्या प्रस्तावाला आक्षेप घेतला होता. तर इतर तुकड्यांमधील विद्यार्थ्यांनीही याला पाठिंबा दिला होता. जंतर मंतर आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस अत्याचारांच्या प्रकरणाची सुनावणी घेण्यात सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कोणतीही रुची दाखवली नाही. सुनावणीदरम्यान त्यांच्या खंडपीठाने घटनेचे व्हिडिओ पाहण्यात अनास्था दर्शवली. जे अत्यंत असंवेदनशील होते. नालसारमध्ये त्यांना संविधान, नागरी स्वातंत्र्य आणि मतभेदांचा आदर करायला शिकवले होते. त्यामुळे, ज्या व्यक्तीचे अलीकडील सार्वजनिक वर्तन या मूल्यांच्या विरुद्ध आहे, त्यामुळे अशा व्यक्तीकडून पदवी स्वीकारू शकत नाही. असा दावा विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता.

Shiv Sena Symbol Case : निकालानंतर रडण्यासाठी वातावरण निर्मिती ;शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची उबाठा गटावर खरमरीत टीका

बार कौन्सिलने वादात उडी का घेतली ?

नालसार विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांच्या या भूमिकेला बार कौन्सिल ऑफ इंडियाने सरन्यायाधीशांविरुद्ध असल्याचे म्हटले. बार कौन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी सुरुवातीला एक आदेश जारी करून सर्व राज्य बार कौन्सिलना, पुढील सूचना मिळेपर्यंत २०२६ मध्ये NALSAR मधून पदवीधर होणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याची वकील म्हणून नोंदणी रोखून ठेवण्याचे निर्देश दिले.

बार कौन्सिलने या प्रकरणी NALSAR कडून एक सविस्तर आणि प्रमाणित अहवालही मागवला. सरन्यायाधीशांच्या दीक्षांत समारंभातील सहभागाविरोधात मोहीम सुरू करणाऱ्यांची नावे त्यांनी मागितली. या मोहिमेत शिक्षक, संशोधक, माजी विद्यार्थी, विद्यार्थी संघटना किंवा बाहेरील व्यक्तींचा सहभाग होता का, हे देखील बीसीआयला जाणून घ्यायचे होते.

कौन्सिलच्या सुरुवातीच्या आदेशात असा युक्तिवाद करण्यात आला होता की, तपास सुरू असताना विद्यार्थ्यांची नोंदणी केल्यास तपासाला बाधा येऊ शकते. या आदेशात असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता की, ज्यांनी देशातील सर्वोच्च न्यायिक पदाच्या प्रतिष्ठेचा कथितपणे अनादर केला, ते कायदेशीर व्यवसायासाठी आवश्यक असलेली शिस्त आणि नैतिक मानके पाळत होते का. येथूनच या संपूर्ण प्रकरणातील सर्वात वादग्रस्त पैलू समोर आला.

 

Web Title: Supreme court issues notice to bci over nalsar university students controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

Justice Vikram Nath Next CJI: कोर्टाचे लाइव्ह-स्ट्रीमिंग सुरू करणारे पहिले न्यायाधीश! न्यायमूर्ती विक्रम नाथ होणार नवे CJI
1

Justice Vikram Nath Next CJI: कोर्टाचे लाइव्ह-स्ट्रीमिंग सुरू करणारे पहिले न्यायाधीश! न्यायमूर्ती विक्रम नाथ होणार नवे CJI

Supreme Court News: सत्र न्यायालयांच्या अधिकारांना सर्वोच्च न्यायालयाची कात्री! जन्मठेपेच्या शिक्षेबाबत दिला ऐतिहासिक निकाल
2

Supreme Court News: सत्र न्यायालयांच्या अधिकारांना सर्वोच्च न्यायालयाची कात्री! जन्मठेपेच्या शिक्षेबाबत दिला ऐतिहासिक निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.