
पुण्यात बड्या नेत्याने सोडली ठाकरेंची साथ
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला आला वेग
राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
Pune Election: राज्यात निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीची घोषणा केली आहे. मुंबई आणि नाशिक महापालिका निवडणुकीसाठी राज्यात नव्या युतीची घोषणा झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ही एकत्रित आले आहेत. 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. मात्र ठाकरे बंधु यांची युती होताच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या पक्षाला पुणे शहरात मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे उपप्रमुख सूरज लोखंडे यांनी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिल्याचे समजते आहे. सूरज लोखंडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठी गळती लागली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती ठरवावी की पक्ष सोडून जाणाऱ्यांना थांबवावे असा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभा ठाकला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
Maharashtra Politics: निवडणूक होताच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता साथ सोडणार
निवडणूक होताच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षातील एक महत्वाचा नेता राजू वैद्य त्यांची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर होताच ठाकरेंच्या पक्षाला धक्का बसण्याचा अंदाज आहे. उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समोर येत आहे.
“काँग्रेसमुक्त नगरपालिका तयार…”; भाजपच्या अभूतपूर्व यशावर Devendra Fadnavis यांनी विरोधकांना डिवचलं
महाविकास आघाडीचा सुपडा साफ
लाडकी बहीण नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीतही भावाच्या मदतीला धावली अशी चर्चा रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. जिल्ह्यातील चार नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायत यांच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी झाली आणि त्यानंतर जे निकाल बाहे आले त्यावरून रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीची राजकीय पकड मजबूत असल्याचे स्पष् झाले आहे. या निवडणुकीत रत्नागिरी, चिपळूण, खेड नगरपरिषदा तसेच लांजा नगरपंचायतीवर शिंदे शिवसेनेचा भगवा फडकला आहे. या ठिकाणी शिंदे शिवसेनेचे नगराध्यक्ष विजयी आहेत त देवरुख आणि गुहागर नगरपंचायतीव भाजपने विजयाच्या रूपाने झेड फडकवला आहे.