Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Zp : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ‘शब्द’ मिळालेल्यांचाच पराभव; ‘या’ उमेदवारांना मतदारांनी नाकारलं

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ज्यांना ज्यांना शब्द देण्यात आला, त्या उमेदवारांचाच पराभव झाल्याची नोंद गेल्या दोन निवडणुकांत झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 15, 2026 | 04:47 PM
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ‘शब्द’ मिळालेल्यांचाच पराभव; 'या' उमेदवारांना मतदारांनी नाकारलं

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ‘शब्द’ मिळालेल्यांचाच पराभव; 'या' उमेदवारांना मतदारांनी नाकारलं

Follow Us
Follow Us:

पुणे/आकाश ढुमेपाटील : जिल्हा परिषद निवडणुकांच्या राजकारणात एक विलक्षण साम्य पुन्हा चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ज्यांना ज्यांना शब्द देण्यात आला, त्या उमेदवारांचाच पराभव झाल्याची नोंद गेल्या दोन निवडणुकांत झाली आहे. हा केवळ योगायोग म्हणायचा की स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि बदलती राजकीय गणिते याचा परिणाम, यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

 

२०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत पुरंदर तालुक्यातील ज्येष्ठ नेते सुदाम आप्पा इंगळे यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे आले होते. पक्षांतर्गत चर्चांमध्ये त्यांना अध्यक्षपदासाठी शब्द दिल्याचे स्पष्टपणे बोलले जात होते. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र बेलसर–माळशिरस गटात त्यांचा अनपेक्षित पराभव झाला. आमदार विजय शिवतारे, तत्कालीन काँग्रेसचे नेते संजय जगताप आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळी या सर्व घटकांनी निवडणुकीचे चित्र बदलले. काँग्रेसचे दत्ता झुरंगे विजयी झाले आणि संभाव्य अध्यक्षपदाचा दावेदार मतदारांच्या कौलातून बाद झाला.

तसाच अनुभव २०२६ च्या निवडणुकीत भोर तालुक्यात आला. राष्ट्रवादीचे रणजीत शिवतरे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शब्द दिल्याची चर्चा प्रचारकाळात रंगली होती. कार्यकर्त्यांमध्ये त्यांची प्रतिमा संभाव्य अध्यक्ष अशीच उभी राहिली होती. मात्र प्रत्यक्ष मतदानात त्यांना पराभवाचा धक्का बसला. भाजपचे नेते संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे यांनी त्यांना पराभूत केले. स्थानिक नाराजी, गटांतील मतभेद आणि विरोधकांची प्रभावी रणनीती यामुळे शिवतरे यांचे समीकरण कोसळले. या दोन्ही घटनांमुळे राष्ट्रवादीने अध्यक्षपदासाठी ज्यांना शब्द दिला त्यानंतर त्यांचाच पराभव मतदारांनी केला आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते निवडणुकांमध्ये अंतिम निर्णायक घटक हा मतदारांचा विश्वास असतो. वरिष्ठ पातळीवरील आश्वासन कार्यकर्त्यांना उर्जा देऊ शकते; परंतु स्थानिक असंतोष, नाराजी किंवा बंडाळी यावर नियंत्रण नसेल, तर त्याचे परिणाम थेट मतदानपेटीतून दिसून येतात. पुणे जिल्ह्यातील या अनुभवातून एक धडा स्पष्ट होतो की, जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दिलेला शब्द हा विजयाची हमी ठरत नाही. उलट तोच उमेदवार अधिक लक्ष्य बनतो. त्यामुळे संघटनात्मक एकजूट, स्थानिक पातळीवरील समन्वय आणि मतदारांशी सातत्यपूर्ण संवाद यावरच यशाची खरी पायाभरणी अवलंबून आहे.

Web Title: Leaders in the fray for the post of zilla parishad president have been defeated in the election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • pune news
  • ZP Politics

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.