Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पंकजा मुंडेंनी भाजपचं काम केलंच नाही’; भाजप नेत्यांचीच नाराजी उघड

बीडमध्ये सध्या वातावरण तापले आहे. सरपंच हत्या प्रकरणाबरोबरच राजकीय वर्तुळामध्ये देखील अनेक गौप्यस्फोट होत आहे. भाजपच्या आमदाराने पंकजा मुंडे विरोधात आवाज उठवला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 19, 2024 | 12:14 PM
Suresh Dhas in Beed BJP alleges that Pankaja Munde has not done the party's work

Suresh Dhas in Beed BJP alleges that Pankaja Munde has not done the party's work

Follow Us
Close
Follow Us:

बीड : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. आता हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून निवडणुकीनंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. यामुळे विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांविरोधात जोरदार टीका करत आहेत. यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारामुळे महायुतीमध्ये नाराजीचा महापूर आला आहे. अनेक जेष्ठ नेते नाराज आहेत. आता भाजप पक्षातील आणखी एक नाराजी उघड झाली आहे. पंकजा मुंडे यांच्याविरोधात भाजप पक्षामध्येच नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महायुतीमधून भाजप व अजित पवार गट हे एकत्र आले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी एकत्रितपणे काम केले आहे. बीडमध्ये मुंडे भावंडे एकत्रितपणे लढताना दिसली. यामुळे अनेक मुंडे समर्थकांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र आता पंकजा मुंडे यांच्या विरोधात भाजपमधील विद्यमान आमदाराची नाराजी असल्याचे दिसले आहे. बीडमधील आष्टी मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांनी भाजपचे काम केले नसल्याचा गंभीर आरोप केला आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांची निवड देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये केली असली तरी पक्षामध्ये त्यांच्याबाबत नाराजी आहे. बीडमधील भाजपमध्ये अंतर्गत कलह असून विधानसभा निवडणुकीनंतर नवा वाद उफाळून आला आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी काम केले नसल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.

आमदार सुरेश धस यांनी विधीमंडळामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत विधान केले. यामुळे सर्वांनी आश्चर्य वक्तव्य केले आहे. सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांनी निवडणुकीत माझ्या मतदारसंघात भाजपचे काम केले नसल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे थेट तक्रार केली आहे. विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. कर नाहीतर डर कशाला असा थेट पवित्रा घेतला आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरच आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाला आहे.

राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राजकीय वर्तुळामध्ये सध्या आहे. बीडमधील आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस हे चर्चेमध्ये आले आङे. बीडमध्ये सध्या सरपंच संजय देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये त्यांनी आवाज उठवला आहे. बीडमध्ये या प्रकरणामुळे आधीच वातावरण तापलेले आहे.  विरोधक या प्रकरणात धनंजय मुंडेवर आरोप करीत आहे. या प्रकरणात सुरेश धस यांनीही कणखर भूमिका घेतली असून, या हत्ये प्रकरणात विष्णू चाटे व त्याच्या टोळीचा मोरक्या कोण आहे याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाईची मागणी धस यांनी केली आहे. तसेच धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देखील घेतली आहे. सुरेश धस यांनी आता पंकजा मुंडे यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे.

Web Title: Suresh dhas in beed bjp alleges that pankaja munde has not done the partys work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 12:14 PM

Topics:  

  • BJP
  • Winter Session

संबंधित बातम्या

‘तुझं माझं पटेना अन्…; गुहागरमध्ये भाजपा-शिवसेनेत प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल
1

‘तुझं माझं पटेना अन्…; गुहागरमध्ये भाजपा-शिवसेनेत प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल

Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं
2

Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
3

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत
4

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.