File Photo : Ram-Shinde
नागपूर : नागपूरमध्ये महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याच अधिवेशनात विधानपरिषदेच्या सभापतिपदाची धुरा भाजप नेते प्रा. राम शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. विधानपरिषदेचे सभापतिपद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त होते. त्यामुळे विधानपरिषदेचा कार्यभार उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे होता. मात्र, आता विधानपरिषदेला नवा सभापती मिळाला आहे.
हेदेखील वाचा : Winter Session : यांना उचलून बाहेर फेका! विधानसभा अध्यक्षांनी आमदाराला काढलं बाहेर, Video एकदा पाहाच
भाजप नेते राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतिपदी बिनविरोध निवड निश्चित झाली होती. महाविकास आघाडीकडून कोणताही उमेदवार देण्यात आलेला नाही. दरम्यान, महायुतीकडून राम शिंदे यांचे नाव निश्चित झाल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राम शिंदे म्हणाले, “आमचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधानपरिषदेचा सभापती म्हणून माझी निवड केली. विधानपरिषदेचा सभापती बिनविरोध निवडून यावा”, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.
दरम्यान, विरोधकांनी उमेदवार न देता माझ्या निवडीला पाठिंबा दिला आहे. याबद्दल महायुती आणि महाविकास आघाडीचे आभार मानतो. पक्षाला माझ्यावर विश्वास असल्याने त्यांनी मला ही जबाबदारी द्यायचं ठरवले आहे. या संधीचे मी नक्की सोने करेन, असेही त्यांनी म्हटले आहे.
राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष
महायुती सरकारच्या सत्तास्थापनेनंतर राहुल नार्वेकर यांची पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता भाजपकडून विधानपरिषदेच्या सभापतिपदी कोणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. महायुती सरकारच्या सत्तास्थापनेनंतर राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतिपदी निवड करण्यात आली आहे.