Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत भाजपचा गटनेता कोण? ‘या’ सदस्यांची नावे चर्चेत

पुणे जिल्हा परिषदेत भाजपकडून गटनेत्याची निवड होणार आहे. स्थानिक पातळीवरून तीन नावे पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवण्यात आली असून, पुढील काही दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 05, 2026 | 11:56 AM
Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत भाजपचा गटनेता कोण? ‘या’ सदस्यांची नावे चर्चेत
Follow Us
Close
Follow Us:
  • पुणे जिल्हा परिषदेत भाजपचा गटनेता कोण?
  • पक्षांतर्गत हालचालींना वेग
  • ‘या’ सदस्यांची नावे चर्चेत
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या १८ मार्च रोजी अध्यक्षाची निवड होणार आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून, इच्छुकांकडून लॉबिंग सुरू झाले आहे.

 

दरम्यान, जिल्हा परिषदेत भाजपकडून गटनेत्याची निवड होणार आहे. स्थानिक पातळीवरून तीन नावे पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवण्यात आली असून, पुढील काही दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत भाजपचा गटनेता हा विरोधी पक्षनेता असेल, असे मानले जात आहे.

जिल्हा परिषदेत भाजपचे एकूण १० सदस्य निवडून आले आहेत. त्यापैकी शिरूर तालुक्यातून सर्वाधिक तीन सदस्य विजयी झाले आहेत. भोर आणि पुरंदर तालुक्यातून प्रत्येकी दोन सदस्य निवडून आले असून मुळशी, दौंड आणि हवेली या तालुक्यांतून प्रत्येकी एक सदस्य भाजपकडून निवडून आला आहे. त्यामुळे गटनेतेपदासाठी शिरूर, भोर आणि पुरंदर या तालुक्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

शिरूर तालुक्यातून राजेंद्र गावडे, कांचन सांडभोर आणि सुनिता कड विजयी झाले आहेत. यापैकी राजेंद्र गावडे यांचे नाव गटनेतेपदासाठी पुढे असल्याची चर्चा आहे. पुरंदरमधून अजय कैलास इंगळे आणि हरिभाऊ लोळे विजयी झाले असून त्यापैकी एका नावाचाही विचार सुरू असल्याचे सांगितले जाते. भोर तालुक्यातून पोपट सुके आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे विजयी झाल्या आहेत. स्वरूपा थोपटे यांचेही नाव गटनेतेपदासाठी पुढे आले असल्याची माहिती आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी सांगितले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीतील युती, सभापतीपदाची निवड आणि गटनेतेपदाबाबतचा अहवाल तयार करून वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. गटनेतेपदासाठी तीन नावे पाठवली असून, पुढील दोन दिवसांत वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय घेतला जाईल.

हे सुद्धा वाचा : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून राजकारण रंगले; काय आहे सध्याची परिस्थिती?

Web Title: Everyones attention is on who will be the bjp group leader in the pune zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • pune news

संबंधित बातम्या

राजकीय वर्तुळात शोककळा! चारधाम यात्रेदरम्यान भाजप नेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन
1

राजकीय वर्तुळात शोककळा! चारधाम यात्रेदरम्यान भाजप नेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन

प्रताप सरनाईकांनी केली वल्लभनगर बसस्थानकाची पाहणी; ST प्रशासनाला दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
2

प्रताप सरनाईकांनी केली वल्लभनगर बसस्थानकाची पाहणी; ST प्रशासनाला दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

हिंजवडी पुन्हा तुंबली तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार; PMRDA आयुक्तांचा कारवाईचा इशारा
3

हिंजवडी पुन्हा तुंबली तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार; PMRDA आयुक्तांचा कारवाईचा इशारा

5 राज्यांच्या Exit Poll मध्ये BJP ला काय मिळाले? बंगालमध्ये टक्कर, दक्षिणेत आव्हान, तर उत्तर भारतात….; वाचा सविस्तर बातमी
4

5 राज्यांच्या Exit Poll मध्ये BJP ला काय मिळाले? बंगालमध्ये टक्कर, दक्षिणेत आव्हान, तर उत्तर भारतात….; वाचा सविस्तर बातमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.