Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Krishna karkhana Election:’कृष्णा’ कारखान्याच्या निवडणुकीचे राजकारण तापले; नव्या चेहऱ्यांची एन्ट्री; काय आहेत आगामी राजकीय समीकरण

निवडणूक जाहीर होण्याआधीच कार्यक्षेत्रातील राजकीय तापमान उच्चांक गाठू लागले आहे. पुढील काही आठवड्यांत आघाड्या, उमेदवार आणि प्रचाराचे मुद्दे अधिक स्पष्ट होतील

  • By anuradha sagar
Updated On: Apr 23, 2026 | 06:15 PM
Krishna Sahakari Sakhar Karkhana Election 2026, Satara Politics News

Krishna Sahakari Sakhar Karkhana Election 2026, Satara Politics News

Follow Us
Follow Us:

Krishna Sahakari Sakhar Karkhana Election 2026 :  साखर पश्चिम महाराष्ट्रातील बहुचर्चित यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या आगामी निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची असली, तरी कार्यक्षेत्रात राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. सत्ताधारी सहकार पॅनेल आणि संस्थापक पॅनेल यांच्यात थेट सामना होणार! की रयत पॅनेलच्या संभाव्य एंट्रीमुळे लढत तिरंगी रंग घेणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘कामगिरी विरुद्ध विश्वास’ आणि ‘सत्ता विरुद्ध परंपरा’ या चौकटीत रंगणारी ही निवडणूक पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्रस्थानी येऊ लागली आहे. रेठरे बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर होण्याआधीच वातावरण तापले आहे.

 

नवीन चेहरे आणि बदलते राजकारण

यंदाच्या निवडणुकीत काही जागावर नवीन चेहरे संधी मिळवू शकतात, अशी चिन्हे आहेत. दोन्ही गटांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असून, स्थानिक प्रभाव, सामाजिक समीकरण आणि मतदारसंघनिहाय गणिते यांचा सखोल अभ्यास केला जात आहे. यामुळे काही ठिकाणी पारंपरिक समीकरणांना धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Purandar IT Park: पुण्यातील कंपन्यांचे स्थलांतर थांबणार! पुरंदरमध्ये १५०० एकरवर भव्य आयटी पार्कचा मार्ग मोकळा

आतापासूनच राजकीय तापमानाचा उच्चांक

निवडणूक जाहीर होण्याआधीच कार्यक्षेत्रातील राजकीय तापमान उच्चांक गाठू लागले आहे. पुढील काही आठवड्यांत आघाड्या, उमेदवार आणि प्रचाराचे मुद्दे अधिक स्पष्ट होतील, निवडणुकीच्या रणसंग्रामात होणारी ही लढत ‘दुरंगी की तिरंगी ! नेमकी कोणत्या स्वरूपात रंगते, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

गाठीभेटी, संपर्क दौऱ्यांमधून अप्रत्यक्ष प्रचार सुरू

जून महिन्यात निवडणूक कार्यक्रम अपेक्षित असला, तरी गेल्या काही आठवड्यांपासूनच विविध गटांनी आपापल्या पातळीवर ‘पूर्वतयारी मोहीम सुरू केली आहे. सामाजिक कार्यक्रमांतील वाढलेली उपस्थिती, बैठका, गाठीभेटी आणि संपर्क दौरे यांमधून आप्रत्यक्ष प्रचाराचा जोर वाढताना दिसतो. ६५ वर्षांची परंपरा आणि तब्बल ४७ हजार सभासद असलेला हा कारखाना सातारा आणि सागली जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये विस्तारलेला असल्याने या निवडणुकीकडे केवळ स्थानिक नव्हे, तर प्रादेशिक पातळीवरही लक्ष लागले आहे.

Kokan News: महामार्गाचे काम अपूर्ण, मग टोल वसुली कशासाठी? ओसरगाव टोल नाक्याविरोधात सिंधुदुर्गात संतापाची लाट

रयत : ‘किंगमेकर’ ठरणार की ‘गेमचेंजर’?

या निवडणुकीतील सर्वात महत्वाचा आणि अनिश्चित घटक म्हणजे रयत पॅनेल, माजी चेअरमन इंद्रजीत मोहिते यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते स्वतंत्रपणे मैदानात उतरणार का? की कोणत्या एका गटाला पाठिबा देणार? किंवा तटस्थ भूमिका घेणार? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. मात्र, त्यांच्या निर्णयावर संपूर्ण निवडणुकीचे चित्र बदलू शकते, हे निश्चित. जर रयत पॅनेल स्वतंत्रपणे उत्तरले, तर निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता अधिक आहे. अन्यथा पारंपरिक दुरंगी लढतच रंगू शकते.

 

 

 

Web Title: Tensions rise in satara over krishna cooperative mill elections will it be a triangular fight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Satara Politics
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

Satara Politics: ठाकरे गटाला साताऱ्यात खिंडार? २० ते २५ नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर; शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
1

Satara Politics: ठाकरे गटाला साताऱ्यात खिंडार? २० ते २५ नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर; शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.