Mumbai Politics : गेल्या पाच-सहा वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, हे कोणीच सांगू शकत नाही. गेल्या पाच-सहा वर्षात राज्याच्या राजकारणात अशा काही घटना घडल्या की ज्यांची कल्पनाही कोणी केली नसेल.पण एक म्हण आहे की ‘राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो’. महाराष्ट्रातही असेच काहीसे दिसून आले.
गेल्या काही वर्षांत एकमेकांपासून दुरावलेले दोन ठाकरे बंधु म्हणजेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे २० वर्षांच्या दिर्घ काळानंतर पुन्हा एकाच मंचावर पाहायला मिळाले. अंतर्गत संघर्षांमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे २००५ साली एकमेकांपासून दुरावले होते पण काल दोन्ही बंधु एकाच व्यासपीठावर एकत्र आले.
पण राज्य सरकारने हिंदी सक्तीचा शासन निर्णयाला विरोध करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले. ५ जुलै रोजी घडलेल्या घटनेबद्दल राज्याच्या राजकारणात कोणीही विचारही केला नसेल. २० वर्षांपूर्वी वेगळे झालेले दोन भाऊ एकाच मंचावर एकत्र दिसल्याने महाराष्ट्राच्या राजकारणसाठी हा ऐतिहासिक क्षण मानला गेला. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीने महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होतील, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ व्यक्तव्याने पाटीदार समाज नाराज? गुजरात भाजप म्हणाले, “त्यांनी काँग्रेसची…”
मराठी अस्मितेच्या नावाखाली मुंबईतील वरळी डोम येथे आयोजित ‘आवाज मराठीचा’ या सभेत शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे २० वर्षांनंतर एकाच मंचावर दिसले. महाराष्ट्राच्या राजकारणात ही घटना सामान्य नाही
महाराष्ट्रातील महायुती सरकार राज्यात हिंदी लादत असल्याचा आरोप करत दोन्ही पक्षांनी आघाडी उघडली होती. याविरोधात शिवसेना (UBT) आणि मनसे ५ जुलै रोजी संयुक्त रॅली काढतील अशी घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. परंतु मोठ्या प्रमाणात झालेल्या निषेधानंतर सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला. सरकारने आपला निर्णय मागे घेतल्यानंतर, दोन्ही भाऊ एकत्र आले आणि त्यांनी निषेधाचे रूपांतर विजयी रॅलीत केले. आता राजकीय वर्तुळात एक प्रश्न उपस्थित झाला आहे की, जर सरकारने ‘हिंदी लादण्याचा’ निर्णय मागे घेतला असतानाही राज आणि उद्धव एकत्र का आले?
Gopal Khemka Murder : व्यावसायिक गोपाल खेमका यांची गोळ्या झाडून हत्या; हत्येचं CCTV फुटेज आलं समोर
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे ही राजकीय सक्ती आहे की मराठी अस्मितेसाठी आवश्यक आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संयुक्त बैठकीत दोन्ही भावांची भाषणे मराठी भाषा आणि मराठी माणूस याभोवती फिरत होती.
मराठी माणसांच्या एकजुटीमुळे राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचा निर्णय मागे घेतल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांनी इंग्रजी शाळेत शिक्षण घेतले, इंग्रजी वर्तमानपत्रात काम केले पण मराठीशी कधीही तडजोड केली नाही, असेही त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर, मी आणि राज ठाकरे एकत्र राहण्यासाठी आलो आहोत, असे विधान करत सूचक संकेतही दिले, तसेच उद्धव म्हणाले की, आम्हाला हिंदुत्व शिकवणारे तुम्ही कोण? मुंबईत दंगली होत असताना, आम्ही मराठी लोकांनी महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदूला वाचवले, मग तो कोणीही असो. जर तुम्ही न्याय मागणाऱ्या आणि निषेध करणाऱ्या मराठी लोकांना ‘गुंड’ म्हणत असाल तर? तर हो, आपण ‘गुंड’ आहोत, असा हुंकारही त्यांनी भरला
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाचे राज्याच्या राजकीय भवितव्यावर मोठे परिणाम होऊ शकतात, असे जाणकारांचे मत आहे. गेल्या काही वर्षात दोन्ही ठाकरे बंधुंच्या पक्षांची मोठी पडझड झाली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडून अनेक आमदार –खासदारांनी त्यांची साथ सोडली. तर मनसेला एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे दोघांचीही लोकप्रियता कमी झालीय त्यातच भाजपशी युती तोडून सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर, शिवसेना फुटली आणि दोन गटात विभागली गेली.
मुंबईत काळ्या जादूचा विचित्र प्रकार; पत्नी आणि सासूला केलं निर्वस्त्र; काढले फोटो अन् मग…,
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी निवडणूक चिन्हही मिळाले. यानंतर, २०२४ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. यानिवडणुकीत झालेल्या पराभवातून उद्धव ठाकरे सावरले नसतानाही आता अजून एक निवडणूक जवळ येत आहे. तीच अवस्था राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. दोन्ही पक्ष त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन होणार आहेत. अशा परिस्थितीत, देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ची सत्ता काबीज करणे हे प्रत्येक पक्षाचे स्वप्न असते. गेल्या काही वर्षांत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे बीएमसीवर वर्चस्व आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांना बीएमसीमधील सत्ता गमावण्याची भीती आहे. राजकीय जाणकारांच्या मते, मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातही सत्ता काबीज करू, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. त्यामुळे हेदेखील दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचे कारण असू शकते.