आरोपीचा नाव रमेश आहे. तो मूळचा उत्तर प्रदेश येथील देवरियाचा रहिवासी आहे. तो आपली पत्नी आणि सासू सोबत नवी मुंबईमध्ये घर भाड्याने घेऊन राहतो. रमेशचा स्वभाव पहिल्यापासून थोडा विचित्र होता. एप्रिल महिन्यात त्याने आपल्या पत्नी राधा आणि सासू सरिता यांना प्रचंड धक्का बसला आहे.
तर घडलं असं की राधाच्या छोट्या भावाचा लग्न जमत नव्हतं. त्याच लग्न करायसाठी ते ही लवकर तर आपल्याला एक खास उपाय करावा लागेल असं त्याने आपल्या पत्नी आणि सासूला सांगितलं. जर राधाच्या भावाचं म्हणजे त्याच्या मेव्हण्याचं लग्न लवकर जमवायचं असेल तर तुम्हाला तुमचे कपडे काढावे लागतील असं त्याने आपल्या सासूला आणि पत्नीला म्हंटल.
तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या पत्नीला आणि सासूला निर्वस्त्र केलं. हा एक टोटक्याचाच भाग असल्याचं त्याने आपल्या सासूला आणि पत्नीला सांगितलं. भीतीपोटी रमेशची सासू आणि त्याची पत्नी या गोष्टीला तयार झाल्या. कारण त्यांनाही वाटत होत आपल्या मुलाचं आणि भावाचा लग्न लवकर व्हावं, मात्र रमेशच्या मनात वेगळाच काहीतरी होते. जेव्हा त्याची सासू आणि पत्नी निर्वस्त्र झाली तेव्हा त्याने या दोघींचे अश्लील फोटो काढले.
त्यानंतर त्याने आपली पत्नी आणि सासू यांना ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली. त्याने आपल्या पत्नीला सांगितलं की तू जर माझं ऐकलं नाही तर मी हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करेल अशी धमकी दिली. त्यानंतर रमेशने आपल्या बायकोला अजमेरला बोलावलं. त्याची पत्नी अजमेरला आली तरीसुद्धा त्याने तिचे फोटो तिच्या वडिलांना आणि भावाला पाठवले. ही गोष्ट राधाला माहिती पळताच तिने आपल्या पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दखल होता आरोपी फरार झाला. घटनेबाबत तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Cyber Crime: गुन्हा दाखल झाला सांगितलं अन्…; महिलेची सात लाखांची फसवणूक