Thackeray group demands Bharat Ratna for Swatantryaveer Savarkar on his death anniversary
मुंबई : आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करण्यात येत आहे. ठाकरे गटाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच बेळगावच्या मुद्द्यांवर देखील भाष्य केले आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृती दिन आहे. त्यांना गीताबद्दल पुरस्कार दिला जातोय. याचं स्वागत आहे. महाराष्ट्राने दोन हिंदुत्ववादी नेत्यांना भारतरत्न द्यायला हवा. असा ठराव महाराष्ट्राने केंद्राला पाठवायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सोईप्रमाणे प्रेरणस्थान मानतात. सरकार भाजपचं आहे, व्होट गणितासाठी भाजपने अनेक स्थानिक व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराची खिरापती वाटली. पंतप्रधान नेरंद्र मोदी-अमित शाह हे स्वयंभू आहेत. हा विषय त्यांच्या सरकारच्या अख्त्यारितील आहे. आमचीही मागणी आहे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळायला हवा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी सभेत जनतेचा पैसा खाऊ देणार नाही, खात असतील तर नावं द्या असे म्हणाले होते. त्यानुसार आम्ही आता त्यांना 26 नावे देणार आहोत. आजच फ्रान्स कंपनीने कसा पैसा मागितला जातो याचा खुलासा केला आहे. नगरविकास विभागाने अहवाल मागितला आहे. देवेंद्र फडणवीसांना कोणत्या अडथळ्यातून सरकार चालवावं लागत आहे ते दिसतयं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी स्वागत केले आहे. भ्रष्टाचारात मंत्र्यांचे पीए ओसडी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्र्यानी त्यावर रोख लावली. मात्र ज्या मंत्र्यांनी त्यांना ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांचीही नावे जाहीर करा, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, नैतिकता साधन सुचिता संस्कार या शब्दांवर भाजपचं प्रेम आहे. मात्र या मंत्रिमंळात नैतिकता संस्कार याची ऐशीची तैशी झाली आहे. मात्र भ्रष्टाचार, खून ईडी सीबीआयचे आरोप असलेले अनेक जणांसोबत देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. फडणवीस यांनी साफ सफाई खालून न करता वरून करायला हवी. भाजपच्याच लोकांना फंड दिला जातोय बाकीच्यांना नाही. घटनेत तसं आहे का? घटना बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली आहे यांच्या बाप जाद्यांनी नाही. आता आम्ही महाराष्ट्राचे आण्णा यांना जाऊन उठवणार आहे. आण्णा आता उठा भ्रष्टाचारावर बोला. तुम्ही फक्त उठा बाकी आम्ही करतो, असा टोला देखील खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.