राहुल गांधींना काळे फासण्याची ठाकरे गटाच्या नेत्याची थेट धमकीच
नाशिक : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत विधान केले होते. त्यावरून आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उप महानगरप्रमुख बाळा दराडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी राहुल गांधींना काळे फासण्याची थेट धमकीच दिली आहे.
एका प्रकरणाशी संबंधित राहुल गांधी हे नाशिकच्या कोर्टात हजर राहणार आहेत. तेव्हा त्यांना काळे फासण्याची भूमिका ठाकरे गटाच्या नेत्याने घेतली आहे. ‘राहुल गांधी यांच्या विधानाचा आम्ही निषेध करतो. इतकेच नाहीतर राहुल गांधी यांना काळे फासणार आहे. जर त्यांना काळे फासता आले नाहीतर त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू’, असेही बाळा दराडे यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : Nandurbar Politics : नंदुरबारमध्ये राजकारण तापलं; भाजप आमदाराने शिंदेंच्या आमदाराच्या मुलालाच कार्यक्रमातून हाकललं
दरम्यान, बाळा दराडे यांच्या विधानावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही समाचार घेतला. ‘राहुल गांधींनी सावरकरांना शिवीगाळ किंवा अपशब्द वापरले नाहीत. अरूण शौरींनीही जगापुढे इतिहास मांडला आहे. पण, सध्याची परिस्थिती ‘खोटं बोला पण रेटून बोला’ अशी आहे. अपशब्द कोणीही वापरले नाहीत. चुकीचे विधान केले जात आहे’.
हेदेखील वाचा : नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद आणखीन वाढणार; ‘या’ नेत्याने केला प्रवेश
दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्याकडून जर अशाप्रकारे धमकी दिली जात असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही त्याला भीक घालणार नाही. त्याला योग्य उत्तर देऊ, असेही प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी म्हटले आहे.