
स्वीकृत नगरसेवकपदासाठी अनेक जण इच्छुक
भाजपा आणि शिवसेनेला कोणती खाती मिळणार याकडे लक्ष
निवडीसाठी भाजपाकडून पाच जणांची नावे चर्चेत
वरवेली: गुहागर नगर पंचायतीवर भाजपा-शिवसेना (शिंदे गट) यांचे एक हाती सत्ता आल्याने उपनगराध्यक्ष व समिती सभापती वाटपासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर भाजपा शिवसेना युतीच्या दोन्ही बाजूने स्वीकृत नगरसेवकपदासाठी अनेक जण इच्छुक असल्याचे समजते. गुहागर नगर पंचायतीवर भाजपा-शिवसेना युतीने आपल्या नगराध्यक्षपदासह १३ नगरसेवक निवडून आणले आहेत. यामुळे उपनगराध्यक्षासह समिती सभापती व स्वीकृत नगरसेवक पदासाठीच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. नगराध्यक्षपदावरून निवडणुकी अगोदर भाजपा व शिवसेनेमध्ये चुरस निर्माण झाली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या नीता विकास मालप यांना जाहीर झाली.
यावेळी युतीने आपल्या एकोप्याचे दर्शन घडवत नीता मालप यांना नगराध्यक्ष म्हणून भरघोस मतांनी निवडून आणले. तसेच भाजपाचे ६ तर शिवसेनेचे ७असे १३ नगरसेवक नगर पंचायतीवर निवडून आले आहेत, त्याचबरोबर उर्वरित ४ जागांवर उबाता शिवसेना २, राष्ट्रवादी १ तर मनसे पुरस्कृत अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. युतीमध्ये नगराध्यक्षपद भाजपाकडे गेल्याने आता उपनगराध्यक्षपद शिवसेनेच्या वाट्याला आले आहे.
उपनगराध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार म्हणून प्रदीप बेडल यांचे नाव निवडणुकीपूर्वीपासून चर्चेत होते. परंतु चार मतांनी विजयी झालेले अमोल गौयचळे यांच्या नावाची चर्चा गुहागर शहसत रंगली आहे. हा विषय पालकमंत्र्यापर्यंत गेला आहे. दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले अमोल गोवथळे यांच्या १६ नंबरप्रभागामध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक ठरली होती, केवळ ४ मतानी गोयथळे निवडून आले.
तर प्रदीप बेडल हे ९१ मताधिक्क्याने निवडून आले. यामध्ये सुजित साटले यांनीही चांगले मताधिक्य घेतले आहे. यामुळे उपनगराध्यक्षपदी
बैडल की गोयथळे की सुजित साटले यांना द्यायचे, यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही. गुहागर नगर पंचायतीवर ६ समिती
सभापतीची निवड केली जाणार आहे.
यामध्ये बांधकाम समिती सभापती, आरोग्य व स्वच्छता समिती सभापती, पाणीपुरवठा व जलः निस्सारण समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती, शिक्षण समिती सभापती व मागासवगीय समिती सभापती ही पदे आहेत. या पदाच्या पाटपात बांधकाम समिती सभापती हे महत्वाचे पद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. उर्वरित ५ समिती सभापतीषदामध्ये मागासवर्गीय समिती सभापतीपद रिक्त राहण्याची शक्यता आहे.