स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडी फुटणार? शरद पवारांचे सूचक विधान
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात उत्तर नागपुरातून विधानसभा व रामटेकमधून लोकसभा लढलेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गजभिये यांनी सहा महिन्यांपूर्वीच मुंबईत शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन पक्षप्रवेश केला होता. मात्र, आता त्यांना नागपुरात नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
बहुजन समाज पक्ष व नंतर काँग्रेस असा प्रवास करून ते आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. गजभिये म्हणाले, ‘शरद पवार हे बहुजन विचारसरणीचे नेते आहेत. त्यांच्या पक्षाचे मुख्यालय मुंबईत आहे. त्यांना भेटणे सोपे आहे. निर्णयही लवकर घेतला जातो. म्हणून त्या पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस नेत्यांना दिल्लीत भेटायला जावे लागते. भेट घेण्यासाठी दोन-दोन दिवस प्रतीक्षा करावी लागते. पक्षाचे सर्व निर्णय दिल्लीतूनच घेतले जातात. सामोरासमोर बैठकीत ज्या काही चर्चा होतात आणि निर्णय होतात’.
हेदेखील वाचा : Nandurbar Politics:नंदुरबारमध्ये राजकारण तापलं; भाजप आमदाराने शिंदेंच्या आमदाराच्या मुलालाच कार्यक्रमातून हाकललं
उत्तर नागपुरात काँग्रेसला तगडी टक्कर
उत्तर नागपुरात काँग्रेसला तगडी टक्कर गजभिये यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बसपमधून केली. 2014 मध्ये त्यांना बसपने उत्तर नागपुरातून विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचे 55 हजारांवर मतदान घेतले होते. त्यामुळे तेव्हा काँग्रेसचे उमेदवार व माजी मंत्री नितीन राऊत यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
2019 मध्ये निवडणुकीत पराभव
भाजपचे डॉ. मिलींद माने विजयी झाले होते. यानंतर गजभिये यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने रामटेकची उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा पराभव झाला.
2024 मध्ये काँग्रेसने तिकीट नाकारलं
2024 च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली. मात्र, पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत वंचितचा पाठिंबा घेतला. निर्णय नंतर बदलले जातात. गजभिये हे नागपूर विद्यापीठाचे विशेष कार्यकारी अधिकारी, भंडारा येथे जिल्हाधिकारी, नाशिकचे जिल्हाधिकारी व नंतर विभागीय आयुक्त तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिवही राहिले आहेत.