
Kankavli News: ठाकरे गट सत्ताधारी पक्षातील कुठल्याही पक्षाशी युती करणार नाही; माजी आमदार वैभव नाईकांचे वक्तव्य
Maharashtra Politics: निवडणुकीआधीच ठाकरेंचा पराभव? ‘हा’ बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सत्ताधारी पक्षातील कुठल्याही पक्षाशी युती करणार नाही. परंतु काही स्थानिक लोकांनी एकत्र येऊन शहर विकास आघाडी केल्यास कणकवली नगरपंचायतीमधील भष्टाचार रोखण्यासाठी लढा दिला जाईल, असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला. कणकवली येथील विजय भवन येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शहर विकास आघाडीबाबत उबाठाचे उमेदवार किंवा कार्यकर्ते असतील त्यांच्या भावना जाणून घेऊन त्या वरिष्ठांच्या कानावर घातल्या जातील. त्यानंतर शहर विकास आघाडीमध्ये जायचं की स्वतंत्र महाविकास आघाडीमधूनच निवडणूक लढवायची याचा विचार वरिष्ठ करतील. (फोटो सौजन्य – x)
परंतु महा युतीच्या चर्चेमध्ये खासदार नारायण राणे यांना कोणी घेत नाही, नारायण राणे हे या विभागाचे खासदार असताना त्यांना न विचारता विशाल परब यांना भाजपात घेतले तर शिंदे शिवसेनेमध्ये राजन तेली यांचा प्रवेश झाला. त्यामुळे राणेंच्या शब्दाला राज्याच्या राजकारणामध्ये किंमत राहिलेली नाही, त्यामुळे महायुतीबाबत खासदार राणेंनी विधान न केलेले बरे, असा टोलाही माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला.
Bihar Elections: “… ते बंदूक दाखवून लोकांना घाबरवतील”; PM मोदींचा राहुल गांधी अन् आरजेडीवर घणाघात
उद्धव ठाकरे हे ५ ते ६ दिवस शेतकऱ्यांना दुःख पुसण्यासाठी दौरा करत आहेत. सरकारने जी मदत जाहीर केली ती मदत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहचली नाही. त्यामुळे शेतकरी टाहो फोडत आहेत. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांना कशी मदत मिळेल याकडे खासदार राणेंनी बघितले पाहिजे. सत्ताधारांच्या विरोधात कस लढता येईल यासाठी आम्ही आमचे उमेदवार लवकर जाहिर करणार आहोत. तर या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनता असल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे.
संदेश पारकर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राहीलेले आहेत. त्यामुळे सर्वांचीच भूमिका आहे की, संदेश पारकर यांनी पुन्हा एकदा नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभे रहावे. या शहरामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे, तो दूर व्हावा ही लोकांची धारणा आहे. लोकांनी संदेश पारकर यांचे नाव सुचवले आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे, असे देखील यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.