Thackeray leader Sushma Andhare emotional post about the passes away close relative
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या त्यांच्या आक्रमक पवित्र्यासाठी ओळखल्या जातात. राजकीय टीका करताना सुषमा अंधारे यांची घणाघाती टीका ही अनेकांना घाबरवते. सोशल मीडियावर देखील त्या व्हिडिओ आणि पोस्ट करत असतात. सध्या सुषमा अंधारे यांच्या एका पोस्टची चर्चा आहे. मात्र या पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांचा हळवापणा दिसून येत आहे. त्यांच्या कोणत्यातरी जवळील व्यक्तीचे निधन झाले आहे. सुषमा अंधारे यांनी यावरुन दुःख व्यक्त केले आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या निकटवर्तीय व्यक्तीचे निधन झाले आहे. ती व्यक्ती महेश नामक असून त्या व्यक्तीचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला असल्याचे पोस्टवरुन लक्षात येत आहे. सुषमा अंधारे यांनी या व्यक्तीला मह्या असे म्हटले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या पोस्टमुळे अनेकांनी हळहळ व्यक्त करुन मृत व्यक्तीला श्रद्धांजली वाहिली आहे. सुषमा अंधारे यांनी अपघाती निधन झालेल्या व्यक्तीचा फोटो देखील शेअर केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, प्रिय महेश….. मह्या…. कितीवेळा गाडीची चावी घेऊन तुला थांबवायचा तू घरा बाहेर पडू नये म्हणून अडवण्याचा प्रयत्न केला सगळ्यांनी… पण तू अनंताच्या प्रवासासाठी निघाला आहेस याची कल्पनासुद्धा डोकावली नाही… अपघाताची बातमी ऐकून सुन्न आहे…घरातल्याच ऐकायचं असतं रे बाळा… लहानाचा मोठा होताना तुला बघितलंय… आता असं रक्ताने माखलेलं निष्प्राण कलेवर बघायची हिंमत नाही बाबा…, अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे मुंबई महामार्गावर अपघात झाला आहे. वडगाव मावळ जवळ झालेल्या या अपघातामुळे हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघातामध्ये एकजण जखमी झाला आहे. मातोश्री हॉस्पिटल जवळ आज, गुरुवार (दि.27 मार्च) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. पीएमपी बस (क्र. एमएच 14 एचयू 6293), डंपर (क्र. एमएच 14 एचजी 6677) आणि स्विप्ट कार (क्र. एमएच 12 एसई 9824) या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये डंपर चालक जखमी झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तिन्ही वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर असताना मातोश्री हॉस्पिटल जवळील चौकात हा अपघात झाला. चौकात नेहमीच्या ठिकाणी थांबलेली पीएमपी बस, पाठीमागून येणारी स्विप्ट कार आणि तिच्या पाठीमागून येणारा डंपर यांच्यात हा अपघात झाला. अपघातानंतर स्विप्ट कार बस आणि डंपरच्या मध्ये असल्याने तिचे प्रचंड नुकसान झाले.