
राज्यात वाजले निवडणुकीचे बिगुल
ठाकरे गटातील गळती थांबेना
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी रंगणार सामना
Uddhav Thackeray: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत यांची निवडणूक होणार आहे. २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यातच आता अनेक पक्षातील नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसून येत आहेत. उद्धव ठाकरे यांना निवडणुकीआधीच मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षातील मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते आहे.
उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे गटाचे नेते दीपेश म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे. निवडणुका जवळ आल्यामुळे नेत्याआणि पक्षांतर सुरू केल्याचे पहायला मिळत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दरम्यान महाविकास आघाडीमधील पक्षांमधील गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. ठाकरे गटाला वारंवार मोठे धक्के बसत आहेत. अनेक महत्वाचे नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना दिसून येत आहेत. दीपेश म्हात्रे हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आपल्या पक्षातील गळती कशी रोखणार हे पहावे लागणार आहे.
सोलापुरात ठाकरे गटाला दणका
शिवसेना ठाकरे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी भाजप पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून दीपक साळुंखे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आज या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत दीपक साळुंखे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दीपक साळुंखे आणि जयकुमार गोरे यांच्या काल दुपारी झालेल्या बैठकीनंतर आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
Solapur Politics: सोलापुरात ठाकरे गटाला दणका; बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत दीपक साळुंखे यांनाही ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यावेळी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी पक्षापासून दूर राहणेच पसंत केले होते. या सर्व घडामोडींनंतर अखेर त्यांनी ठाकरे गटाला राम राम करत भाजपचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला.