Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘निवडून तुम्ही दिलं, जाब विचारण्याचा अधिकार तुमचाच’, फुटीर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना थेट आवाहन

शिवसेनेच्या वर्धापनदिन मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांवर निशाणा साधत शिवसैनिकांना त्यांना जाब विचारण्याचे आवाहन केले. ऑपरेशन टायगरनंतर ठाकरे यांचे हे पहिले मोठे भाषण ठरले.

  • By विवेक
Updated On: Jun 19, 2026 | 10:08 PM
'निवडून तुम्ही दिलं, जाब विचारण्याचा अधिकार तुमचाच', फुटीर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना थेट आवाहन

'निवडून तुम्ही दिलं, जाब विचारण्याचा अधिकार तुमचाच', फुटीर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना थेट आवाहन

Follow Us
Follow Us:
  • फुटीर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना थेट आवाहन
  • निवडून तुम्ही दिलं, मेहनत तुम्ही घेतली, जाब विचारण्याचा अधिकार तुमचाच – उद्धव ठाकरे
  • महाराष्ट्राच्या विश्वासाशी केलेली बेईमानी जनता विसरणार नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल
 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 60 व्या वर्धापनदिन मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘ऑपरेशन टायगर‘ अंतर्गत ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात गेल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेळाव्यात ठाकरे यांनी शिवसैनिकांना थेट आवाहन करत बंडखोर खासदारांना जाब विचारण्याचे आवाहन केले.

“मेहनत तुम्ही केली, मग जाब विचारण्याचा अधिकार का सोडताय?”

षण्मुखानंद सभागृहातील मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “या खासदारांना निवडून आणण्यासाठी मेहनत तुम्ही केली, मतं तुम्ही दिलीत. मग जाब विचारण्याचा अधिकार तुम्ही का सोडताय? तुम्हीच त्यांना जाब विचारा.” ते पुढे म्हणाले, “आदेश काय देऊ? निवडून तुम्ही दिलं, मेहनत तुम्ही घेतली. जाब विचारण्याचा अधिकार तुमचाच आहे. त्यांना विचारा की त्यांनी जनतेचा आणि शिवसैनिकांचा विश्वास का तोडला?”

खासदारांच्या बंडावर टीका

फुटीर खासदारांवर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, मात्र खासदारांचे ‘हमीभाव’ ठरवले जात आहेत. “तुम्ही मरमर मेहनत करायची आणि काही जण खोक्यांच्या राजकारणात रमायचे, हे महाराष्ट्राला मान्य होणार नाही,” अशी टीका त्यांनी केली.

Shivsena : ‘जमलेल्या माझ्या तमाम..,’ उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरे गटाचा शिवसेना वर्धापन दिन मेळावा

“लाडकी बहीण योजनेवरूनही सरकारवर निशाणा”

राज्य सरकारवर हल्लाबोल करताना ठाकरे म्हणाले, “निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना आणली, पण आता लाखो महिलांची नावे यादीतून वगळली जात आहेत. जनतेला आश्वासनं देऊन फसवण्याचं काम सुरू आहे.”

शेतकऱ्यांच्या मदतीची आठवण

भाषणादरम्यान ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील एका शेतकऱ्याचा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, “एक शेतकरी माझ्याकडे छोटा बटवा घेऊन आला आणि म्हणाला, हा पैसा उमेदवारासाठी आहे. त्या प्रेमाने दिलेल्या मदतीमुळे आपण निवडणूक जिंकलो. समोर पैशाचा महापूर होता, पण सामान्य माणूस शिवसेनेसोबत उभा राहिला.”

‘मी भेटत नव्हतो तर गधड्या तू निवडून कसा आला?’; ओमराजे निंबाळकरांवर उद्धव ठाकरेंचा पलटवार

“गद्दारीचा शिक्का सहज पुसला जाणार नाही”

बंडखोर खासदारांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “इतिहासात गद्दारीचा शिक्का सहज पुसला जात नाही. महाराष्ट्राच्या विश्वासाशी केलेली बेईमानी जनता विसरणार नाही.” ऑपरेशन टायगरनंतर झालेल्या या पहिल्याच मोठ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदार, राज्य सरकार आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करत आगामी राजकीय संघर्षाचे संकेत दिले.

Web Title: Uddhav thackeray appeal to shivsainiks against rebel mps shivsena foundation day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 10:08 PM

Topics:  

  • Operation Tiger
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

सुप्रिया सुळेंची पंतप्रधान मोदींशी भेट; राजकीय चर्चांना संजय राऊतांनी दिलं स्पष्टीकरण, ‘कोणीही महाविकास आघाडी…’
1

सुप्रिया सुळेंची पंतप्रधान मोदींशी भेट; राजकीय चर्चांना संजय राऊतांनी दिलं स्पष्टीकरण, ‘कोणीही महाविकास आघाडी…’

‘उद्धव ठाकरेंना जळी स्थळी काष्ठी पाषाणी शिंदेच दिसतात’; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला
2

‘उद्धव ठाकरेंना जळी स्थळी काष्ठी पाषाणी शिंदेच दिसतात’; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला

‘Gen Z शी बोलण्याआधी अमित शाहांचा राजीनामा घ्या’; उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना खोचक टोला
3

‘Gen Z शी बोलण्याआधी अमित शाहांचा राजीनामा घ्या’; उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना खोचक टोला

Uddhav Thackeray PC: आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ! ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती हल्ला
4

Uddhav Thackeray PC: आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ! ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.