
'मुंबईत उद्धव ठाकरेंनी महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा द्यावा'; 'या' OBC नेत्याची मागणी
पुणे : मराठी आणि मुंबईच्या अस्तित्वासाठी त्वेषाने मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरून क्रमांक दोनचा पक्ष ठरलेल्या शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपला महापौर निवडीसाठी बाहेरून पाठिंबा द्यावा,असे आवाहन भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी केले.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा महापौर व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. पंरतु, संख्याबळा अभावी त्यांचा महापौर होणे कठिण जरी असले, तरी अशक्य मुळीच नाही. भाजप सोबत ठाकरेंनी जुळवून घेतले आणि मनभेद मागे सोडले, तर भाजप कडून एक पाऊल समोर टाकले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. कदाचित ‘देवा’च्या मनात असेल तर शिवसेनाचा (उबाठा) महापौर नक्कीच होईल.
हेदेखील वाचा : हातकणंगलेत जिल्हा परिषदेसाठी 4 तर पंचायत समितीसाठी एक अर्ज दाखल; आत्तापर्यंत 713 अर्जांची विक्री
महाविकास आघाडीतून कॉंग्रेस बाहेर पडली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा एक होणार आहे. अशात उद्धव यांनी त्यांची नैसर्गिक युतीची कास धरली पाहिजे.अर्थात शिवेसेना आणि भाजपची नैसर्गिक यूती आता पुन्हा महाराष्ट्रवासियांना बघायची असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.
शिवसेना फोडून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांनी २९ नगरसेवकांच्या बळावर मुंबईचे महापौरपद अडीच वर्षांसाठी मिळावे, असा आग्रह केला असल्याचे समोर आले आहे. अशात मोठा भाऊ ठरलेला भाजप यासाठी कितपत अनुकूल आहे, हे सांगता येत नाही. परंतु, गेल्या काळात शिंदे यांच्यासोबत भाजप नेत्यांनी घेतलेली फारकत , निवडणुकीमध्ये शिंदे सेनेविरोधात भाजप पदाधिकार्यांनी केलेला प्रचार लक्षात घेता शिंदेंना साईड ट्रक केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पाटील म्हणाले.
हेदेखील वाचा : BMC Mayor: …असं झाले तर महापौर भाजपचा नाही तर उद्धव ठाकरे गटाचा होणार! वाचा BMC चे रंजक समीकरण