Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Gen Z शी बोलण्याआधी अमित शाहांचा राजीनामा घ्या’; उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना खोचक टोला

उद्धव ठाकरे यांनी Gen Z शी संवाद साधण्याच्या मुद्द्यावरून सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका केली. तरुणांशी संवाद साधण्यापूर्वी अमित शाहांचा राजीनामा घ्यायला हवा होता, असे ते म्हणाले.

  • By विवेक
Updated On: Aug 08, 2026 | 03:45 PM
मतदारयादीवरून महाराष्ट्रात रणकंदन; बीडचे 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला

मतदारयादीवरून महाराष्ट्रात रणकंदन; बीडचे 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला

Follow Us
Follow Us:
  • Gen Z शी संवादावरून उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना टोला
  • “आधी अमित शाहांचा राजीनामा घ्यायला हवा होता”
  • शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या निकालाबाबत उद्धव ठाकरे आशावादी
 

राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता Gen Z आणि तरुणाईच्या प्रश्नावरून राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तरुणांमध्ये सरकारविरोधातील नाराजीचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी तरुणांशी संवाद साधला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भागवतांच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित केला.

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मोहन भागवत यांच्या तरुणांशी संवाद साधण्याच्या प्रयत्नावर खोचक टीका केली. “Gen Z शी बोलण्याआधी भागवतांनी अमित शाहांचा राजीनामा घ्यायला हवा होता,” असे ते म्हणाले. सरकारच्या कारभारावर तरुणांकडून प्रश्न उपस्थित होत असताना संघाने त्यावर भूमिका घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सूचित केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आता देशातील लोक सरकारच्या विरोधात बोलू लागले आहेत. फसवणुकीचे दिवस संपले असून ‘अच्छे दिन’ची वाट पाहताना परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तरुणाई सरकारच्या भूमिकेवर प्रश्न विचारत असताना त्यांच्याशी संवाद साधण्याआधी सरकारमधील जबाबदारी निश्चित करायला हवी, असे ठाकरे यांनी म्हटले.

Uddhav Thackeray PC: आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ! ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती हल्ला

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या निकालाची प्रतीक्षा

दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणाच्या निकालाची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाकडे पक्षाची घटना उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असेल, तर ती पक्षाकडून मागवायला हवी होती, असा दावा त्यांनी केला.

या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सुरू असून संविधानाच्या चौकटीत न्याय मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच पक्षाच्या लढाईपेक्षा हा प्रश्न लोकशाहीच्या अस्तित्वाशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केला.

गद्दारीचा व्हायरस देशभर पसरत आहे

“गद्दारीचा व्हायरस देशभर पसरत आहे,” असा आरोप करत ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना राजकीय संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करत त्यांनी या भूमिकेवर स्पष्टीकरणाची मागणी केली. दरम्यान, देशातील तरुणाईमध्ये असंतोष वाढत असून कोणत्याही दबावाला तरुण सहजपणे बळी पडणार नाहीत, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला.

‘काँग्रेसनेही एवढ्या शिव्या खाल्ल्या नसतील, तेवढ्या मोदी-शाहा…’

काँग्रेसनेही एवढ्या शिव्या कधी खाल्ल्या नसतील, तेवढ्या मोदी-शाहांच्या वाट्याला आल्या आहेत. देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. मात्र, गद्दारांना भेटण्यासाठी वेळ काढला जात आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

Parliament Monsoon Session 2026: संसदेचा शेवटचा आठवडा वादळी ठरणार; काँग्रेस आक्रमक, दिल्लीत घडामोडींना वेग

अमित शाह काल मुंबईत होते. त्यावेळी गद्दारांनी त्यांची भेट घेतली असेल. आता याच गद्दार खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली आहे. गद्दारांना भेटण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ आहे; मात्र देशातील विद्यार्थ्यांना आणि तरुणांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

देशातील तरुण आपल्या न्याय आणि हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहेत. मात्र, त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे वेळ नाही. दुसरीकडे, गद्दारांना भेटून त्यांच्या पाठीशी असल्याचा संदेश दिला जात आहे. मात्र, हा विश्वास आणि पाठिंबा देशातील तरुणांना देण्याची तयारी नाही, गद्दारीचा डाग अजूनही धुतला गेलेला नाही. त्यामुळे तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून गद्दार नेत्यांच्या भेटीगाठींना प्राधान्य देण्यावरून सत्ताधाऱ्यांची भूमिका स्पष्ट होत असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title: Uddhav thackeray targets mohan bhagwat over gen z dialogue demands amit shah resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Amit Shah
  • mohan bhagwat
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Amit Shah Health Update: अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने दिल्लीकडे रवाना
1

Amit Shah Health Update: अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने दिल्लीकडे रवाना

‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला
2

‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले
3

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
4

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.