Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी CBI कडून FIR दाखल झाल्याच्या वृत्तानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ‘माझंही नाव आहे, तुमचंही येईल’, असं म्हणत त्यांनी राजकीय हेतूने चारित्र्यहनन होत असल्याचा आरोप केला.

  • By विवेक
Updated On: Sep 17, 2026 | 08:26 PM
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

Follow Us
Follow Us:
  • दिशा सालियन प्रकरणात CBI ने FIR दाखल केल्याचं वृत्त
  • उद्धव ठाकरे म्हणाले, ‘माझेही नाव आहे, तुमचेही येईल’
  • आदित्य ठाकरेंनीही X पोस्टद्वारे चौकशी निःपक्षपातीपणे करण्याची मागणी केली
 

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाला पुन्हा एकदा वेगळं वळण मिळालं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणात FIR दाखल केल्याचं वृत्त समोर आलं आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांच्या जबाबाच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

दिशा सालियन प्रकरणात अनेक व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असल्याचं वृत्त आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, अनिल देशमुख, परमबीर सिंह, सचिन वाझे, सूरज पांचोली, दिनो मोरिया आणि रिया चक्रवर्ती यांच्यासह इतर नावांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

या प्रकरणावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी राजकीय हेतूने चारित्र्यहनन केलं जात असल्याचा आरोप केला. “माझेही नाव आहे. तुमचेही येईल. दुरान्वयेही संबंध नाही. ओळख पाळख नाही. किती काळ सहन करत राहणार,” असं ते म्हणाले.

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात राजकीय हेतू असल्याचा दावा केला. “नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव येईल. का म्हणून नाव घेतले जातंय. राजकीय हेतूने हे प्रेरित आहे. आम्ही गप्प होतो. फालतू चारित्र्यहनन बस्स झाले, अन्यथा आम्हीही कायदेशीर मार्गाने जाऊ. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आदित्य ठाकरेंची ‘X ‘ पोस्ट चर्चेत

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणावर X वरून भूमिका मांडली आहे. दिशा सालियन यांना आपण कधीही भेटलो नसल्याचं किंवा त्यांच्याशी आपली ओळख नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही वर्षांपासून राजकीय हेतूने आणि चारित्र्यहननाच्या उद्देशाने आपलं नाव या प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला.

तसंच, अधिकृत यंत्रणांनी कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय आणि निःपक्षपातीपणे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. या प्रकरणातील पुढील तपास आणि CBI च्या कारवाईकडे आता राजकीय वर्तुळासह सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Aaditya Thackeray : ‘मी दिशा सालियनला… सत्‍य बदलू शकत नाही…’ आदित्‍य ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं

Web Title: Uddhav thackeray first reaction disha salian case cbi fir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 08:26 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Bombay High Court
  • Disha Salian case
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Aaditya Thackeray : ‘मी दिशा सालियनला… सत्‍य बदलू शकत नाही…’ आदित्‍य ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं
1

Aaditya Thackeray : ‘मी दिशा सालियनला… सत्‍य बदलू शकत नाही…’ आदित्‍य ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’
2

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
3

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावर सूरज पंचोलीने सोडलं मौन; लांबलचक पोस्ट करत आदित्य ठाकरेंवरही केलं भाष्य
4

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावर सूरज पंचोलीने सोडलं मौन; लांबलचक पोस्ट करत आदित्य ठाकरेंवरही केलं भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.