Union Minister Ramdas Athawale targets Raj Thackeray and Rohit Pawar
मुंबई : काल (दि.22) जळगावमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला. आग लागल्याची अफवा पसरवून प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून गंभीर जखमींची संख्या देखील वाढत आहे. ष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांना चिरडले. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. जळगाव रेल्वे अपघातावर आठवले म्हणाले की, रेल्वे अपघाताची चौकशी होणे गरजेचे आहे. जळगावमध्ये झालेली ही घटना मनाला चटका लावणारी आहे. यापुढे रेल्वे अपघात होऊ नये याची रेल्वेमंत्र्यांनी दक्षता घ्यावी. अपघातात मृत्युमुखी आणि जखमींना सरकारी मदत जाहीर केली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दावोस दौरा केला आहे. यामध्ये अनेक कोट्यवधी सामंजस्य करार करण्यात आले. मात्र भारतीय कंपन्यासोबत करार केल्यामुळे आमदार रोहित पवार यांनी टीका केली. तसेच पालकमंत्रिपदाच्या वादावरुन देखील त्यांनी महायुतीवर निशाणा साधला. रामदास आठवले म्हणाले की, “तुमचे सरकार येईल तेव्हा तुम्ही तीन ते चार पालकमंत्री द्या. पालकमंत्री पदासाठी वाद नाही. सर्वांना वाटत पालकमंत्री बनावं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं अशी इच्छा त्यांचे स्वागत आहे. शरद पवार आमच्या NDA सोबत यायला पाहिजे,” असे सूचक विधान रामदास आठवले यांनी केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न देण्याची मागणी केली. वीर सावरकर यांना भारतरत्न दिले नाही आता बाळासाहेब ठाकरे यांना तरी द्यावे, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. यावर रामदास आठवले म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे हे मराठी मनाचे हृदय सम्राट आहेत. शिव शक्ती आणि भीम शक्ती एकत्र यावी ही त्याची भूमिका होती. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळत असेल तर हरकत नाही. मी मागणी करेल पण संजय राऊत पण आहेच. राज ठाकरे नाशिकला आहे. आमच्या भेटी होत असतातच आणि आम्ही दोघे चांगले मित्र आहोत,” असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
मनसेने दादागिरी करणे चुकीचं
शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याबाबत रामदास आठवले म्हणाले की, “शाळेत मराठी भाषा विषय असला पाहिजे. कोणतेही बोर्ड असावे. मनसेकडून काही धोरणं चुकीचे आहे. मराठी बोलले पाहिजे. हे चुकीचं आहे. मराठीच बोलले पाहिजे हा आग्रह चुकीचा आहे. उत्तर भारतीयांनी मराठीवर अन्याय केला हे समजणे चुकीचे आहे. मनसेने दादागिरी करणे चुकीचं आहे. मराठी बोर्ड असावे हे बरोबर पण मुंबई अखंड राहावी ही आमची इच्छा आहे. राज ठाकरे म्हणाले होते रामदास आठवले मंत्री झाले पण त्यांना पक्ष बरखास्त कराव लागेल. पण त्यांच्यावर आता तशी वेळ येऊ नये,” असा खोचक टोला रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.