Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidyanand Bapat : विद्यानंद बापट राजकारणात उतरणार? असीम सरोदेंच्या सूचक ट्विटने चर्चांना उधाण

Vidyanand Bapat : अॅड. असीम सरोदे यांनी एक्सवर एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांच्यासोबत विद्यानंद बापट दिसत आहे. या ट्विटमध्ये विद्यानंद बापटांनी पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवावी का? असा प्रश्न सरोदे यांनी विचारला आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 23, 2026 | 06:32 PM
Vidyanand Bapat : विद्यानंद बापट राजकारणात उतरणार? असीम सरोदेंच्या सूचक ट्विटने चर्चांना उधाण

Vidyanand Bapat : विद्यानंद बापट राजकारणात उतरणार? असीम सरोदेंच्या सूचक ट्विटने चर्चांना उधाण

Follow Us
Follow Us:
  • विद्यानंद बापटांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत चर्चा
  • असीम सरोदेंच्या ट्विटने खळबळ
  • एक्स युजर्सचा वाढता पाठिंबा
 

डीजे, डॉल्बीविरोधात प्रकर्षाने आपले मत मांडत, त्यावर बंदी घालण्याची मागणी करणारे विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) हे सध्या वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलेत. आता बापट हे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. कायदेतज्ज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांची सोशल मीडियावरील एक पोस्ट सध्या साऱ्यांचं लक्ष वेधून घेत असून बापट राजकारणात आपलं नशिब आजमावणार का? असा प्रश्न त्या पोस्टमुळे निर्माण झाला आहे.

गणेशोत्सवाच्या तोंडावर विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे पुण्याचे वातावरण ढवळून निघाले होते. काहींनी बापटांना चापट लगावला, तर काही बापटांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. आपल्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतरही बापटांनी कसूभरही आपल्या मुद्दापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे बापट आजही प्रसिद्धीच्या झोतात आहेत.

 

बापटांनी पदवीधर निवडणूक लढवावी का?

असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर एक खणखणीत पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की, माझ्यासोबत उभ्या असलेल्या व्यक्तीचा आता खूप परिचय देण्याची आवश्यकता उरली नाही. ध्वनीप्रदूषणाच्या राक्षसा विरोधात निर्भयपणे उभा असणारा ‘विद्यानंद बापट’. अनेकांच्या मनातील दुःख बोलणारा आणि उत्सवांचे विकृत स्वरूप, त्यातील ओंगळवाणेपणा चव्हाट्यावर आणणारा हिरो ठरला आहे. तर विद्याविभूषित, सुसंकृत, विनम्र, अभ्यासू, प्रत्येक सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारा विद्यानंद बापट आज जणू प्रत्येक घरातील आपुलकीचा सदस्य झालेला आहे.
भाषेचा स्तर बिघडू न देता, विषयाला धरून बोलणारा आणि समाजाला वैश्विक बनविण्याची क्षमता असणाऱ्या विद्यानंद बापटने पदवीधर मतदारांमधून निवडणूक लढवावी का? तुम्हाला काय वाटते?, असा प्रश्न असीम सरोदे यांनी पुणेकरांना विचारला आहे. असीम सरोदे यांच्या या पोस्टवर पुणेकर आणि राज्यभरातील नागरिक भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत.

Uddhav Thakare : निवडणूक आयुक्तांना अटक करा, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

माझ्यासोबत उभ्या असलेल्या व्यक्तीचा आता खूप परिचय देण्याची आवश्यकता उरली नाही. ध्वनिप्रदूषणाच्या राक्षसा विरोधात निर्भयपणे उभा असणारा ‘विद्यानंद बापट’. अनेकांच्या मनातील दुःख बोलणारा आणि उत्सवांचे विकृत स्वरूप, त्यातील ओंगळवाणेपणा चव्हाट्यावर आणणारा हिरो ठरला आहे. तर – – -… pic.twitter.com/HDlXMat1Ks — Asim Sarode (@AsimSarode) September 22, 2026

 

युझर्सचा मोठा पाठींबा

विद्यानंद बापट यांनी खरोखरच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवायला हवी. ते 100 टक्के निवडून येतील. बापट खरंच भारी माणूस, ते जेव्हा बोलतात तेव्हा असं वाटतं आपल्या मनातलं बोलत आहेत. साधा माणूस, भारी माणूस लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात जायला हवं ही जानभावना आहे, अशी कमेंट एका युझरने लिहली आहे.

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

दरम्यान, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली आहे. 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

Web Title: Vidyanand bapat asim sarode graduate election in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • Ad. Asim Sarode
  • DJ
  • Teacher

संबंधित बातम्या

Crime News: शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; सीसीटीव्हीत ओढत नेताना आरोपी कैद
1

Crime News: शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; सीसीटीव्हीत ओढत नेताना आरोपी कैद

Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती
2

Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
3

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.