
Vijay wadettiwar Bhaskar Jadhav Live Opposition boycotts tea party before winter session 2025
राज्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. मात्र सरकारकडून पूर्णपणे कर्जमाफी न झाल्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढती गुन्हेगारी, महिला अत्याचार, रोजगार अशा मुद्द्यांवरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. राज्यात सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळला आहे, शेतकरी कोलमडला आहे असा आरोप करत अधिवेशनापूर्वीच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकला आहे. आम्ही चहापानाला जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा विरोधी बाकांवरील नेत्यांनी घेतला.
हे देखील वाचा : गोव्यातील अग्नितांडवावर PM मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या वारसांना मिळणार 2 लाखांची मदत
विरोधकांच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यावंर निशाणा साधला. भास्कर जाधव म्हणाले की, भ्रष्टाचार करण्यासाठी सरकारमध्ये चढाओढ आहे. राज्यात सध्या विरोधी पक्षनेता नाही. सरकारकडे पाशवी बहुमत आहे, त्याच जोरावर वाटेल ते करायचे असे चालू आहे,सत्ताधारी आमदारांना हजारो कोटी रुपयांचा निधी दिला जातो. विरोधी बाकावरील आमदारांच्या मतदारसंघांसाठी मात्र निधी दिली जात नाहीये. हे अधिवेशन विदर्भात होत आहे. त्यामुळे यावेळी विदर्भातील प्रश्नांवर प्रामुख्याने चर्चा व्हावी अशी आमची इच्छा आहे. पण सरकार विदर्भाताली प्रश्नांवर चर्चाच करायला तयार नाही, असे भास्कर जाधव म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : फ्लाईटच्या गोंधळाचा नेत्यांनाही फटका; नागपूरच्या अधिवेशनाला पोहचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर
त्याचबरोबर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील महायुतीवर टीकास्त्र डागले. विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि हिंदी शिवसेना हे दोन्ही पक्ष भाजपच्या ताब्यात आहेत. सहयोगी पक्षांची अवस्था “भीगी बिल्ली” सारखी भाजपने करून ठेवली आहे. मुंबईचा महापौर बसवायचा हा वरून आलेला आदेश आहे. आर्थिक राजधानी मुंबई सोडणे त्यांना परवडणार नाही असा आरोप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला