Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्यांच्या धडाकेबाज निर्णयांचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा,’ विजय वडेट्टीवारांचा चंद्रशेखर बावनकुळेंवर कौतुकाचा वर्षाव

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कोल्हापुरातील तेली समाज मेळाव्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे कौतुक केले. शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी तेली समाजाच्या विकासासाठी मोठ्या निधीची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Aug 23, 2026 | 09:44 PM
विजय वडेट्टीवारांचा चंद्रशेखर बावनकुळेंवर कौतुकाचा वर्षाव

विजय वडेट्टीवारांचा चंद्रशेखर बावनकुळेंवर कौतुकाचा वर्षाव

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचा फायदा लाखो शेतकऱ्यांना – वडेट्टीवार
  • ‘2029 ला आमचा नंबर लागला तर माझी तारीफ करायला आपण पाहिजे,’ असे मिश्किल वक्तव्य
  • तेली समाजासाठी निधीची मागणी
 

कोल्हापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जाहीरपणे कौतुक करत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. कोल्हापुरात आयोजित तेली समाजाच्या मेळाव्यात बोलताना वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांच्या कार्यशैलीचे आणि शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचे कौतुक केले.

बावनकुळे यांच्या निर्णयक्षमतेचा आणि कामाच्या वेगाचा उल्लेख करत वडेट्टीवार म्हणाले की, त्यांच्या धडाकेबाज निर्णयांचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. विधानसभेतही त्यांच्या कामाचे अभिनंदन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मिश्किल शैलीत ‘2029 ला आमचा नंबर लागला तर माझी तारीफ करायला सुद्धा आपण पाहिजे’, असेही म्हटले.

सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या भूमिकेत असले तरी समाजाचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली. बावनकुळे यांनी सरकारमध्ये समाजाच्या मागण्या मांडाव्यात, तर आपण विरोधी पक्षाच्या भूमिकेतून हे प्रश्न अधिवेशनात उपस्थित करू, असे त्यांनी सांगितले.

‘फडणवीसांना कॉपी-पेस्टही करता येत नाही’; ‘राहुल गांधींच्या कार्यक्रमाची नक्कल फसली,’ हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

तेली समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणीही वडेट्टीवार यांनी केली. समाजाच्या विकासासाठी मोठ्या निधीची गरज असून संताजी महाराजांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात समाज भवन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

वडेट्टीवार यांनी यापूर्वी समाजासाठी 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचा उल्लेख करत आता त्यात आणखी वाढ करण्याची अपेक्षा व्यक्त केली. ‘मागणारे आम्ही आहोत, देणारे तुम्ही आहात,’ असे म्हणत त्यांनी बावनकुळेंकडून समाजाच्या विकासासाठी पुढाकाराची अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, तेली समाजाच्या पारंपरिक व्यवसायाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. खाद्यतेल विक्रीशी संबंधित बदलांमुळे पारंपरिक छोट्या व्यावसायिकांवर परिणाम होत असल्याचे सांगत गरीब ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

जरांगे पाटलांच्या आंदोलनापूर्वी छगन भुजबळांची समता परिषदेची बैठक; ओबीसी आरक्षणावर म्हणाले, ‘कोण म्हणतं आरक्षण संपलं?’

समाजाच्या प्रश्नांसाठी आठवड्यातून किमान दोन तास देण्याचे आवाहन बावनकुळे यांना करत वडेट्टीवार यांनी सरकार आणि विरोधकांनी एकत्रितपणे समाजहिताचे प्रश्न मार्गी लावण्याची भूमिका मांडली.

Web Title: Vijay wadettiwar praises chandrashekhar bawankule kolhapur teli samaj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 09:44 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

Mumbai Koliwada: कोळीवाड्यांसाठी मोठा निर्णय! १२ वर्षांपासून रखडलेले सीमांकन ३ महिन्यांत पूर्ण होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा
1

Mumbai Koliwada: कोळीवाड्यांसाठी मोठा निर्णय! १२ वर्षांपासून रखडलेले सीमांकन ३ महिन्यांत पूर्ण होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा

‘सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित…’; चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
2

‘सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित…’; चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा
3

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.