Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांची उपमा देताना सदाभाऊ खोत यांना लाज वाटायला हवी,’ विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

NEET पेपरफुटीविरोधातील विद्यार्थी आंदोलनावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेल्या 'दहशतवादी' वक्तव्यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांनी खोत यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

  • By विवेक
Updated On: Jul 21, 2026 | 08:41 PM
'विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांची उपमा देताना सदाभाऊ खोत यांना लाज वाटायला हवी,' विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

'विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांची उपमा देताना सदाभाऊ खोत यांना लाज वाटायला हवी,' विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Follow Us
Follow Us:

नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थी संतप्त असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. मात्र, या आंदोलनाबाबत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गरज नाही, विद्यार्थीच दहशतवादी आहेत,” असे वक्तव्य केल्याने राज्यभरातून टीकेचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज बाबत देशभरात संतापाचे वातावरण असताना सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. याबाबत आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी संदभाऊ खोत यांना चांगलेच सुनावले आहे.

सदाभाऊ खोत यांनी जंतर मंतर वरील विद्यार्थी आंदोलकांवर टीका करत त्यांना ‘दहशतवादी’ असल्याची टीका केली होती त्यावरून आता विजय वडेट्टीवार यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून टीका करत प्रत्युत्तर दिले आहे.

“जालियनवाला बागची आठवण झाली”; विद्यार्थी लाठीचार्जनंतर संसद परिसरात चंद्रशेखर आझाद यांचे धरणे आंदोलन

काय म्हणाले विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून म्हणाले, “NEET पेपरफुटीने देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त केले, २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. याविरोधात न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांची उपमा देताना सदाभाऊ खोत यांना लाज वाटायला हवी!”

NEET पेपरफुटीने देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त केले, २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. याविरोधात न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांची उपमा देताना सदाभाऊ खोत यांना लाज वाटायला हवी! केवळ भाजपाच्या कृपेने आपल्याला फुकटची आमदारकी मिळाली म्हणून सदाभाऊ खोत… pic.twitter.com/1gAcqbaARg — Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) July 21, 2026


“केवळ भाजपाच्या कृपेने आपल्याला फुकटची आमदारकी मिळाली म्हणून सदाभाऊ खोत भाजपाचे बटिक झाले आहेत. त्यांनी देशातील तरुणाईचा केलेला हा अवमान संतापजनक आहे! शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना तुम्ही आतंकवादी होतात का? भाजपची पाप लपवण्यासाठी तरुणांना आतंकवादी ठरविण्याचा अधिकार कोणी दिला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल’; जंतर-मंतरवरून संजय राऊतांचा इशारा, CJP आंदोलनाला पुन्हा पाठिंबा

सदाभाऊ खोत नेमके काय म्हणाले होते?

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर प्रतिक्रिया देताना सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीवर टीका केली होती. “राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी देशात दहशतवादासारखी परिस्थिती निर्माण करू पाहत आहेत. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र आहेत, त्यामुळे काही बदल होणार नाही. सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नये. या दहशतवाद्यांना लोकशाही मार्गाने जशास तसे उत्तर द्यावे,” असे वक्तव्य त्यांनी केले होते.

Web Title: Vijay wadettiwar slams sadabhau khot over neet student protest terrorist remark

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 08:41 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Sadabhau Khot
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
1

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.