Vinayak Pandey accuses Neelam Gorhe of taking money
मुंबई : राज्यामध्ये सध्या अखिल मराठी साहित्य संमेलनावरुन राजकारण तापले आहे. दिल्लीमधील या संमेलनामध्ये राज्यातील राजकारणावर टीका टिप्पणी केली जात आहे. शिंदे गटाचे नेते आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाबद्दल वादग्रस्त विधान केले. यानंतर राजकारण तापले असून ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये बोलताना ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटामध्ये एका पदासाठी दोन मर्सिडीज घेतल्या जातात अशा आशयाचे वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. यावरुन राजकारण रंगले आहे. ठाकरे गट आक्रमक झाला असून ठाकरे गटातील नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेरील सुरक्षेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर विनायक पांडे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर विनायक पांडे यांनी एका वाहिनीशी संपर्क साधला. यावेळी विनायक पांडे म्हणाले की, “मी शिवसेनेचा सात वर्षे शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख, उपमहापौर, महापौर होतो. पण शिवसेना प्रमुख किंवा उद्धव ठाकरेंनी कधीही पदासाठी माझ्याकडून एक रुपयाही मागितला नाही. फक्त त्यांनी माझं काम पाहून मला पदं दिली. शिवसेनेने मला जे दिलं ते भरभरून दिलं. पण नक्की सांगेन की विधानसभेच्या निवडणुकीत या बाईने माझ्याकडून पैसे घेतले होते. राज्यात अनेक कार्यकर्ते पुढे येऊन सांगतील की या बाईंनी काय काय केलं आहे”, नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर विनायक पांडे म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माजी महापौर विनायक पांडे यांच्या आरोपांमुळे सर्वांनी भुवया उंचावल्या आहेत. विनवायक पांडे यांना विचारा असे खासदार संजय राऊत देखील म्हणाले होते. विधानसभा निवडणुकीसाठी नीलम गोऱ्हे यांनी विनायक पांडे यांच्याकडून पैसे घेतले होते असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. विनायक पांडे म्हणाले की, मुळात त्यांनी जो विषय दिल्लीत मांडला, तो मांडण्याचा व्यासपीठ ते नव्हतं. तिथे मराठी साहित्याविषयी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती. त्यामुळे आम्हाला या बाईची किव येते. मी ४३ वर्षे शिवसेनेत आहे. मला मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत. पण काही नवीन कार्यकर्ते आहेत, ज्यांना पदाची अपेक्षा असते, त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू दिलं जात नाही. ज्या ज्या ठिकाणी नीलम गोऱ्हे संपर्क प्रमुख होत्या, तिथल्या कार्यकर्त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू दिलं गेलं नाही” असा आरोप विनायक पांडे यांनी केला आहे.
तिकीटासाठी इतके द्यावे लागतील
विनायक पांडे पुढे म्हणाले की, “मी मध्य नाशिकमधून इच्छूक होतो. अजय बोरास्ते इच्छूक होते. त्यावेळी नीलम गोऱ्हेंचा कार्यकर्ता माझ्याकडे आला. त्यांनी मला ताईंकडे नेलं. ताईंशी चर्चा करून दिली. माझी पार्श्वभूमी सांगितली. ताईंनी सांगितलं की तिकिटाकरता इतके इतके मला द्यावे लागतील. त्यातील काही पैसे मी त्यांना पोहोचवले. पण तरीही अजय बोरास्ते यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मी माझे पैसे मागितले. पण त्यांनी आज-उद्या देतो करत चालढकल केली. शेवटी मी त्यांना सांगितलं की पत्रकार परिषद घेऊन मी माध्यमांना माहिती देईन. तेव्हा त्यांनी आमदार निवास येथे काही रक्कम दिली. त्यातही कमी रक्कम दिली” असा गंभीर आरोप विनायक पांडे यांनी केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
खासदार संजय राऊत यांनी देखील शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, “ही विश्वासघातकी अन् निर्लज्जबाई. उद्धव ठाकरे यांना काय कमी केलं तिला द्यायला. ला आठवत आहे बाळासाहेब ठाकरे बोलले होते ही बाई कोण आणली तुम्ही पक्षांमध्ये, कुठलं ध्यान आणलं आहे पक्षात आपल्याला शिव्या घालणारं. काही लोकांच्या मर्जी खातिर त्या आल्या गेल्या चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या. नीलम गोऱ्हे यांनी कशाप्रकारे कार्यकर्त्यांची लूटमार केली, याविषयी विनायक पांडे आणि अशोक हरनावळ यांना विचारा,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.