Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेट्रोल पंपावर लोकांची झुंबड, व्हायरल व्हिडियोवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडियो तुफान व्हायरल होत असून भारतातील इंधन टंचाईचे भीषण वास्तव यातून समोर येताना दिसत आहे. बुलढाण्यात लोणार येथील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल - डिझेल घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाल्याची व्हिडियो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

  • By विवेक
Updated On: May 22, 2026 | 06:30 PM
Viral video of chaos in Lonar Petrol pump, Opposition furious on Government, Lonar Petrol pump viral video,

Viral video of chaos in Lonar Petrol pump, Opposition furious on Government, Lonar Petrol pump viral video,

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडियो तुफान व्हायरल होत असून भारतातील इंधन टंचाईचे भीषण वास्तव यातून समोर येताना दिसत आहे. बुलढाण्यात लोणार येथील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल – डिझेल घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाल्याची व्हिडियो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडियोत शेकडो लोक हातात कॅन घेऊन पेट्रोल पंपच्या दिशेने पळत असल्याचे दिसत आहे. आता या व्हिडियोवरून राज्यातील विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांवर चांगलीच आगपाखड केली आहे.

व्हायरल व्हिडियोवरून यशोमती ठाकूर यांचा सरकारवर निशाणा

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी यावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. आपल्या ‘X’ अकाऊंटवरून हा व्हिडियो शेअर करत त्या म्हणाल्या, “बुलडाण्यातील लोणार मधील प्रेट्रोल पंपावर लोकांची इंधनासाठी झुंबड उडाली. राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर तेलसाठा नाही. इंधन दरवाढ आणि तुटवड्यामुळे राज्यात आणिबाणीची स्थिती उद्भवलेली आहे. परिस्थिती नाजूक झालेली आहे. आज सरकारच्या नाकर्तेपणामुळे खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतीच्या मेहनतीची कामे करण्याचे संकट शेतकरी वर्गावर आहे. सर्वसामान्य लोक, वाहतूकदार सर्वांना सरकारने नाडलेले आहे. सरकारने जबाबदारी घेऊन तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत, आता लोकांची “मन की बात” ऐका!” असे त्या म्हणाल्या.

बुलडाण्यातील लोणार मधील प्रेट्रोल पंपावर लोकांची इंधनासाठी झुंबड उडाली. राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर तेलसाठा नाही. इंधन दरवाढ आणि तुटवड्यामुळे राज्यात आणिबाणीची स्थिती उद्भवलेली आहे. परिस्थिती नाजूक झालेली आहे. आज सरकारच्या नाकर्तेपणामुळे खरीप हंगाम तोंडावर असल्याने… pic.twitter.com/m4CXIfbrNJ — Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) May 22, 2026

हाच का तुमचा मास्टरस्ट्रोक? – अंबादास दानवे

शिवसेना उबाठा नेते अंबादास दानवे यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या. आपल्या ‘X’ अकाऊंटवरून ते म्हणाले, “​खाते उघडणी, केवायसी, योजना आणि आता थेट डिझेल… जनतेला आणि शेतकऱ्याला २४ तास रांगेत सडवून छळण्यात या सरकारला कोणता असुरी आनंद मिळतोय? ‘अतिरिक्त खरेदी होतेय’ असले गुळगुळीत आणि निर्लज्ज बहाणे आता बंद करा. मुबलक इंधन मिळत असतं, तर ऐन हंगामात उन्हाळी खर्डा सोडून रस्त्यावर जीवघेणी पळापळ करायला बळीराजाला वेड लागलेले नाही! ​तुमचे ते विमाने फिरवून केलेले परदेश दौरे, डिजिटल इंडियाचे पोकळ ज्ञान आणि प्रत्यक्ष मैदानात पेट्रोल पंपांची केलेली ही ‘छळछावणी’… हाच का तुमचा मास्टरस्ट्रोक?” असा सवाल त्यांनी यावेळी सरकारला विचारला.

स्थळ: लोणार (जि. बुलढाणा) ​खाते उघडणी, केवायसी, योजना आणि आता थेट डिझेल… जनतेला आणि शेतकऱ्याला २४ तास रांगेत सडवून छळण्यात या सरकारला कोणता असुरी आनंद मिळतोय? ‘अतिरिक्त खरेदी होतेय’ असले गुळगुळीत आणि निर्लज्ज बहाणे आता बंद करा. मुबलक इंधन मिळत असतं, तर ऐन हंगामात उन्हाळी खर्डा… pic.twitter.com/5C968Ckgom — Ambadas Danve (@iambadasdanve) May 21, 2026

एप्सटिन फाईलमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव म्हणून प्रत्येक देश त्यांच्यावर दबाव टाकतोय, प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाने खळबळ

हेच का अच्छे दिन? व्हायरल व्हिडियोवरून रोहित पवारांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यावेळी म्हणाले, “या सरकारने राज्यातील शेतकऱ्याला तडफडून मारायचं ठरवलंय की काय, अशी शंका येते. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आक्रोश करतोय पण सरकारला तिकडं लक्ष द्यायला वेळ नाही. आधीच दुष्काळाचं सावट आहे आणि त्याला कसं तोंड देणार असा प्रश्न असतानाच आता खरीपाच्या तयारीसाठी ट्रॅक्टरला डिझेलही मिळत नाही. पेट्रोल पंपावर शेकडोच्या रांगा लागल्या असून टँकर आल्यावर तर डिझेलसाठी चेंगराचेंगरी होतेय. शेतकऱ्याला काय झुरळासारखं चेंगरून मारण्याचा तर हा डाव नाही ना? हेच का अच्छे दिन?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या सरकारने राज्यातील शेतकऱ्याला तडफडून मारायचं ठरवलंय की काय, अशी शंका येते. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आक्रोश करतोय पण सरकारला तिकडं लक्ष द्यायला वेळ नाही. आधीच दुष्काळाचं सावट आहे आणि त्याला कसं तोंड देणार असा प्रश्न असतानाच आता खरीपाच्या तयारीसाठी ट्रॅक्टरला डिझेलही मिळत… pic.twitter.com/jXQTIrkrSc — Rohit Pawar (@RRPSpeaks) May 22, 2026

शिरसाटांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून हसन मुश्रीफ भडकले, थेट उपमुख्यमंत्री शिंदेंकडे करणार तक्रार; शिरसाटांनीही केला पलटवार

Web Title: Viral video of chaos in lonar petrol pump opposition furious on government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Diesel Petrol Price
  • maharashtra poliotics

संबंधित बातम्या

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण
1

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण

Nagpur News :वैदर्भीवादी मुंबईत देणार धडक ;१८ व १९ ला आझाद मैदानात करणार आंदोलन !
2

Nagpur News :वैदर्भीवादी मुंबईत देणार धडक ;१८ व १९ ला आझाद मैदानात करणार आंदोलन !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.