Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज घेतले जाणार मतदान; प्रशासकीय यंत्रणा सज्ज

निवडणुकीत महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, कटक मंडळाचे सदस्य मतदान करणार आहेत. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मतदान करण्यासाठी संबंधित राजकीय पक्षाकडून पक्षादेश जारी करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 18, 2026 | 07:14 AM
Maharashtra Assembly, UD Secretary Notice, Mumbai BMC Discussion,

Maharashtra Assembly, UD Secretary Notice, Mumbai BMC Discussion,

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींच्या भेटीगाठी वाढल्याचेही दिसून आले होते. आता बिनविरोध निवडणुकीमुळे चर्चेत असलेल्या विधान परिषदेच्या राज्यातील ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होत आहे. सकाळी आठ ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान होईल. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ मे रोजी निवडणूक जाहीर केली होती. या १७ जागांमध्ये नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ४ जूनला सहा मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ११ जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी २२ जूनला होऊन निकाल घोषित केले जातील.

‘लग्न एकासोबत करायचं अन् पळून दुसऱ्यासोबत…’, फोडाफोडीच्या राजकारणावर रोहित पवार कडाडले; थेट सांगितला खासदारांचा ‘रेट’

मतदान होणाऱ्या मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघात दुरंगी, सात ठिकाणी तिरंगी तर एका मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मतदारांना पक्षादेश (व्हीप) बजावण्यात आला आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर-जालना यांसारख्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने येथे सत्ताधारी महायुतीचे पारडे जड आहे.

निवडणुकीतील मतदार नेमके कोण?

निवडणुकीत महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, कटक मंडळाचे सदस्य मतदान करणार आहेत. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मतदान करण्यासाठी संबंधित राजकीय पक्षाकडून पक्षादेश जारी करण्यात आला आहे. मतदारांना निवडणुकीत पसंती क्रमाने मतदान करायचे आहे. अधिकृत उमेदवाराला पहिल्या पसंतीचे मतदान करण्याची सूचना राजकीय पक्षांनी आपापल्या मतदारांना केली आहे.

फोडाफोडीच्या राजकारणातून लोकशाही धोक्यात ! मोदी सरकारवर पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात; ठाकरे गटातील घडामोडींवरून टीका

निवडणूक होत असलेले मतदारसंघ आणि मतदारांची संख्या

सोलापूर (६१६), सांगली-सातारा (८९५), नांदेड (४४६), भंडारा-गोंदिया (४५७), नाशिक (६१९), जळगाव (६३०), अमरावती (४५३), लातूर धाराशीव-बीड (९८८), परभणी-हिंगोली (४६६), छत्रपती संभाजीनगर जालना (६३७) नागपूर (८३६)

Web Title: Voting for 11 legislative council seats to be held today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 07:07 AM

Topics:  

  • Maharashtra Legislative Council Election
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
3

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
4

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.