
राज्यातील 226 नगर परिषदांसह 38 नगरपंचायतींसाठी आज होणार मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात होणार बंद
मुंबई : राज्यातील 226 नगर परिषदांसह 38 नगरपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. त्यानुसार, प्रशासनाकडूनही तयारी केली गेली आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 13 नगरपालिका, नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. अत्यंत अटीतटीची आणि राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून 13 नगराध्यक्षपदासाठी तब्बल 47 जण रिंगणात उतरले आहेत, तर नगरसेवकपदासाठी 443 जण नशीब अजमावत आहेत.
राज्यातील सर्वच नगरपालिका व नगरपंचायतींसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सोमवारी दुपारनंतर मतदानासाठी लागणारे साहित्य संबंधित तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक केंद्रावर रवाना करण्यात आले. कोल्हापुरात 13 नगराध्यक्षपदासाठी 47 जण रिंगणात उतरले आहेत, तर नगरसेवकपदासाठी 443 जण नशीब अजमावत आहेत. सर्वच ठिकाणी नेत्यांनी प्रतिष्ठा पणास लावल्याने ऐन थंडीत वातावरण तापले आहे. मुख्यमंत्र्यांपासून विविध राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक थेट पालिका निवडणुकीसाठी गाव खेड्यात प्रचारात उतरल्याने यावेळी वेगळीच रंगत पाहावयास मिळाली.
हेदेखील वाचा : Eknath Shinde एकनाथ शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार? राजकीय दाव्यावर ॲक्शनमधून दिलं उत्तर
दरम्यान, अनेक ठिकाणी प्रशासकीय यंत्रणांकडून तयारी पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांसह इतर यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यातच कोल्हापुरात विशेष रंगत पाहिला मिळत आहे. नगराध्यक्षपदासाठी हातकणंगलेत सर्वाधिक सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
अनेक दिग्गजांकडून प्रचारसभांचा धडाका
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे, शिवाजी पाटील, राहुल आवाडे, अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, समरजित घाटगे, आदींनी जिल्ह्यात प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात सभांचा धडाका उडवून दिला. गेले आठ दहा दिवस आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी रंगत वाढली होती.
शेकडो मतदान केंद्रे; यंत्रणा सज्ज
कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी मंगळवारी (दि. २ डिसेंबर) मतदान होत आहे. निवडणूकीसाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ लाख ५५ हजार ७७५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी एकूण ३१८ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. जिल्ह्यातील जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ, हुपरी, कागल, गडहिंग्लज, मुरगूड, पेठ वडगाव, पन्हाळा, मलकापूर या नगरपरिषदांसाठी तर हातकणंगले, आजरा व चंदगड या तीन नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra News : “भावकीतील वाद जवळून पाहिलाय..; राणे बंधूंच्या कडाक्याच्या वादात रोहित पवारांची उडी