
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबाबत आम्हाला आदर
मुंबई : शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महिलांच्या मनातील मुख्यमंत्री, असे संबोधून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. परंतु, एकनाथ शिंदे हे महिलांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत’, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एका कार्यक्रमात म्हटले.
डॉ. गोऱ्हे यांचे ‘दहा दिशा’ हे पुस्तक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित झाले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील आणि उदय सामंत उपस्थित होते. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, आपण मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदर करतो. परंतु, लाडकी बहीण योजनेमुळे एकनाथ शिंदे महिलांच्या मनातील मुख्यमंत्री बनले आहेत. आज महिलांना राजकारणात स्थान मिळाले आहे. परंतु, त्यांच्या सुरक्षिततेचे आणि सक्षमीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक रंजक प्रतिक्रिया दिली. ‘शिंदे आणि मी मुख्यमंत्रिपदाची देवाणघेवाण करत आहोत. कधी मी मुख्यमंत्री असतो, तर कधी ते. फडणवीस हसून म्हणाले, जरी शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री केले तरी ते सुरक्षित राहतील. कारण ते ते खुर्ची परत करतील आणि मला पुन्हा मुख्यमंत्री करतील. त्यामुळे शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्यात कोणताही धोका नाही’.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर युती
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले की, सत्ताधारी महायुतीचे मित्रपक्ष एकत्र आहेत. निवडणूकपूर्व युती नसली तरी निवडणूकोत्तर युती निश्चित आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहेत. सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा समावेश आहे.
29 महानगरपालिकांच्या निवडणुका अद्याप बाकी
महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होईल. वाघमारे यांनी २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही.
शिंदे महिलांच्या मनातील मुख्यमंत्री : नीलम गोऱ्हे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. परंतु, एकनाथ शिंदे हे महिलांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. आपण मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदर करतो. परंतु लाडकी बहीण योजनेमुळे एकनाथ शिंदे महिलांच्या मनातील मुख्यमंत्री बनले आहेत. आज महिलांना राजकारणात स्थान मिळाले आहे. परंतु, त्यांच्या सुरक्षिततेचे आणि सक्षमीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण आहे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.