Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादीत खदखद नेमकी आहे तरी कसली? पक्षाचे नेतेमंडळी झाले सैरभैर

स्वतः सुप्रिया सुळेंनी मणियार यांचे बोलणे ना नाकारले, ना स्वीकारले. त्या इतकेच म्हणाल्या की हे असे संभाषण दोन व्यक्तींमधील खाजगी असते आणि ते तसेच रहावे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 08, 2026 | 02:39 PM
राष्ट्रवादीत खदखद नेमकी आहे तरी कसली? पक्षाचे नेतेमंडळी झाले सैरभैर

राष्ट्रवादीत खदखद नेमकी आहे तरी कसली? पक्षाचे नेतेमंडळी झाले सैरभैर

Follow Us
Follow Us:

थोरल्या पवार साहेबांची थोडी ढासळती प्रकृती आणि म्हणूनच कदाचित सार्वजनिक जीवनातील त्यांचा कमी होणारा वावर याचे सावट कार्यकर्त्यांच्या मनावर आहे. रा.काँ.श.प. पक्षाच्या पुढील वाटचालीवरही त्याची छाया पडणे अपरिहार्यच आहे. कारण हा पक्षच एकखांबी तंबू आहे. पवारसाहेबांच्या उत्साहावर, ताकदीवरच या पक्षाची आजवरची वाटचाल झालेली आहे. तशीच स्थिती अजितदादांच्याही पक्षाची होती व आहे. दादा होते तोवरच राष्ट्रवादी हे अधिकृत नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह, मिरवणारा त्यांचा पक्ष जोमात होता. आता पक्षामध्ये सतत एक गोंधळाचे व चिंतेचे वातावरण दिसते आहे. आता पक्षाचे नेते सैरभैर झालेले दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद्चंद्र पवार हे अलिकडेच थोडे थोडे आजारी असतात. परवाच ते पुण्यात रुबी हॉल क्लीनिकमध्ये आणि नंतर मुंबईतील ब्रीच कँडीमध्ये दाखल होते. साहेबांचे वय आता ८५ आहे. पुढच्या महिन्यात १२ डिसेंबरला ते ८६ व्या वर्षात पदार्पण करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व पवारांचे संबंध नेहमीच मधुर राहिले आहेत. “पवारांचे बोट धरूनच मी राजकारणात आलो”, असेही मोदींनी जाहीर सांगितले होते. या जवळिकीमुळे शरद पवारांच्या बाबतीत काँग्रेस नेते नेहमीच थोडे साशंक असतात. परवा उपचाराधीन पवारांना मोदीसाहेबांचा थेट फोन आला. शरदरावांचे बाळपणीचे मित्र विठ्ठल मणियार यांच्या म्हणण्यानुसार मोदीं म्हणाले की, “पवारसाहेब तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या. विश्रांती घ्या. तुम्ही देशाची चिंता करू नका. सुप्रियाताई आणि आम्ही ते बघून घेऊ…!”

मोदींच्या या उद्गारांचा अर्थ काय काढायचा ?! सुप्रियाताई या खासदार म्हणून भरपूर काम करतात. विरोधकांच्या सर्व आंदोलनातही त्या असतात. परवा रामलीला मैदानावरही चमकल्या. तरीही मोदी म्हणताहेत की, “त्या व आम्ही मिळून देश सांभाळू!” याचा अर्थ असा लावायचा का, की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा पक्ष आणि मोदींच्या नेतृत्वातील भाजपा यांच्यात, “देश चालवण्याविषयी” काही सहकार्याची बोलणी सुरु आहेत? शक्यता अनेक दिसतात!

स्वतः सुप्रिया सुळेंनी मणियार यांचे बोलणे ना नाकारले, ना स्वीकारले. त्या इतकेच म्हणाल्या की हे असे संभाषण दोन व्यक्तींमधील खाजगी असते आणि ते तसेच रहावे.

मोदी व पवार यांच्या फोनवरील संभाषणाचा एक भाग मात्र नक्की आहे की पवारांनी आता पक्षाची, राजकारणाची फारशी चिंता करू नये. विश्रांती घ्यावी. असे पंतप्रधानांनी सांगितले. खरेतर डॉक्टर पवारसाहेबांना गेली काही वर्षे हेच सांगताहेत. पण ते ऐकत नाहीत! जेंव्हा राजकीय आव्हाने समोर येतात, तेंव्हा पवारसाहेब सर्वात आधी मैदानात असतात. हे व्रत साहेब काही सोडत नाहीत.

पण त्यांच्या चाहत्यांवर, पक्ष कार्यकर्त्यांच्या मनावर, साहेबांची थोडी ढासळती प्रकृती आणि म्हणूनच सार्वजनिक जीवनातील त्यांचा कदाचित कमी होणारा वावर याचे सावट नक्कीच आहे. रा.काँ.श.प. पक्षाच्या पुढील वाटचालीवरही त्यची छाया पडणे अपरिहार्यच आहे. कारण हा पक्षच एकखांबी तंबू आहे. पवारसाहेबांच्या उत्साहावर, ताकदीवरच या पक्षाची आजवरची वाटचाल झालेली आहे.

तशीच स्थिती अजितदादांच्याही पक्षाची होती व आहे. दादा होते तोवरच राष्ट्रवादी हे अधिकृत नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह, मिरवणारा त्यांचा पक्ष जोमात होता. गेल्या जानेवारी अखेरीस झालेल्या दुर्दैवी विमान अपघाता नंतर पक्षामध्ये सतत एक गोंधळाचे व चिंतेचे वातावरण दिसते आहे. तो गोंधळ, चिंता आता भवितव्याच्या काळजीने अधिक गडद झालेली दिसते. पक्षाचे नेते थोडे सैरभैर झालेले दिसत आहेत.

पवारांच्या चढत्या काळाता त्यांचे पुतणे अजितदादा पवारांच्या राजकीय महत्वाकांक्षां दबलेल्या होत्या. विशेषतः 2014 ला देशात जी मोदी लाट उसळली त्या नंतरची एकत्रित राष्ट्रवादीची वाटचाल अडखळत सुरु होती. भाजपा आघाडी सोबत जाण्याचा एनडीएचे घटकत्व घेण्याचा विचार व त्याला असणारा विरोध यात या पक्षाची रस्सीखेच सुरु होती. अजितदादा व त्यांच्या विचारांचे आमदार एकीकडे तर दुसरीकडे स्वतः शरद पवार व त्यांचा घट्ट चाहता वर्ग, असा हा संघर्ष 2019 मध्ये सत्ता स्थापने वेळी पुढे आला होता. पण तेंव्हा दबला. पुन्हा जून २०२३ मध्ये उसळला आणि त्यात पक्षाची शकले उडाली.

तो मोठा धक्का सहन करूनही शरदराव स्वतःच कंबर कसून लढाईत उतरले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरें यांना सोबत घेऊन एनडीए बरोबरची लढाई पवार जोरदार लढले. महाविकास आघाडीने म्हणूनच तेंव्हा चमत्कार दाखवला. त्या वेळी पवार कुटुंबातील कलह टोकाला गेला. विशेषतः सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही खासदारकीची लढाई बारामतीत पेटली, त्याने कुटुंबातील कटुपणाही चव्हाट्यावर आला. अजितदादांचे भाऊ, बहिणी, पुतणे सारे त्यांच्या विरोधात जाहीर भाष्य करत होते. मविआला घेऊन शरद पवारांनी महाराष्ट्रात लोकसभेच्या ३१ जागा जिंकल्या.

पण अजितदादाही पवारांच्याच तालमीत तयार झाले होते. पत्नी हरली बाकी सहकारी पडले म्हणून दादा खचले नाहीत. देवेन्द्र फडणवीस व शिंदेंसोबत महायुती सरकारमध्ये अजितदादा जिद्दीने उभे राहिले. लोकसभेनंतर पाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या नावावार आजवरच्या राजकीय आयुष्यातील सर्वात कमी आमदार निवडून आले. फक्त दहा! या उलट अजितदादांच्या पक्षाला खासदारकीची केवळ एक जागा मिळाली होती, पण आमदारकीच्या जागा थेट ४१ झाल्या.

2025 च्या अखेरीकडे जेंव्हा नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुकांचे पर्व सुरु होते तेंव्हा दादा निराळा विचार करू लागले, असे मानायला जागा आहे. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर ज्या घटना घडल्या त्यातून हे दिसून येते. थोरल्या पवारांबरोबर दादांना एकत्र यायचे होते पण ते एनडीएत साहेबांना घेऊन यायचे असा दादांचा विचार असावा! दादांच्या निधना नंतर थोरल्या पवारांनी असा ट्विस्ट दिला की एनडीए सोडून दादा आमच्या सोबत येणार होते. पण कोणताही नेता सत्तेची वहिवाट सोडून राहुल गांधींसारख्या विचित्र नेत्याच्या भरंवशावर विरोधातील अवघड वाट का धरेल ? ती शक्यता नव्हती व नाही.

२८ जानेवारी २०२६ ची दुर्दैवी सकाळ राज्याच्या राजकारणाला एक कलाटणी देणारी भीषण सकाळ ठरली. थोरल्या पावारांचे फासे जणु तयारच होते. दादांच्या चितेची आग थंड होण्याच्या आधीच त्यांनी ते टाकायला सुरुवात केली. “दादा गेले त्यानंतर पंधराच दिवसांनी महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण व्हायची होती. त्या वेळी दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार अशा चर्चा अजितदादांनी एकट्यानेच पवारांच्या सहकार्यांसोबत केल्या होत्या,” असा गौप्यस्फोट केला गेला. एकत्रीत राष्ट्रवादीचे माजी प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी दादांसोबत कसा व किती बैठका विलिनीकरणासाठी झाल्या हे सांगितले.

महायुती लगेचच सावध झाली. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने सूत्रे हलवली. सुनील तटकरेंपासून भुजबळां पर्यंत, कै दादंच्या जवळच्या सहकाऱ्यांनी, विलिनीकरणाच्या कथित चर्चां नाकारल्या. दादा तसे कधीच आमच्याशी बोलले नव्हते, अशी विधाने आल्याने थोरल्या पातीकडून केल्या जाणाऱ्या चर्चा खऱ्या की खोट्या असाच सवाल उभा ठाकला. दादांच्या निधनाच्या तिसऱ्याच दिवशी दादांच्या पक्षाचे नेतृत्व अधिकृतरीत्या सुनेत्राताईंकडे सोपवले गेले. त्याच रात्री जय व पार्थ पवार यांच्यासह सुनेत्राताई मुंबईत दाखल झाल्या. दादा गेल्यानंतर चौथ्या दिवशीच राजभवनावरील साध्या समारंभात सुनेत्राताई राज्याच्या उपमुख्यमंत्री बनल्या.

शरदरावांनी पुढे केलेल्या विलिनीकरणाच्या बाता हवेत विरल्या. पुन्हा दोन्ही बाजूंनी कटुपणा दिसू लागला. पण नंतर काही काळातच दादांच्या पक्षात कुरबुरी दिसू लागल्या. दादांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार यांचा वावर पक्ष कार्यालयात, ताईंच्या मंत्रालयातील दालनात सुरु झाला. एप्रिल 2026 मध्ये म्हणजे दादांच्या निधनानंतर तीनच महिन्यात पार्थ यांना राज्यसभेची जागा बहाल झाली. तसे ते आधी २०१९ ची लोकसभा निवडणूक एकत्रित राष्ट्रवादीकडून लढले. पण पुणे व रायगडमधील मावळ मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी पार्थ पवारांचा, दोन लाखांहून अधिक मतांनी, दणदणित पराभव केला. त्याच निवडणुकीपासून अजितदादा व शरदरावांमधील संबंध ताणले गेले होते.

अलिकडे पार्थ पवारांनी मंत्रीमंडळातील राष्ट्रवादीच्या खात्यांमध्ये हस्तक्षेप सुरु केल्याच्या तक्रारी ऐकू येत होत्या. त्यातच मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी बाबा सिद्धीकींचे पुत्र आमदार झिशान सिद्धीकींची नेमणूक पार्थ यांच्या आग्रहाने झाली. पण छगन भुजबळ वा तटकरेंनाही त्याची आधी माहिती देण्यात आली नव्हती. तोच प्रकार मुख्य प्रवक्ता पदावर उमेश पाटील यांच्या नेमणुकीबाबत घडला. तटकरे, प्रफुल्ल पटेल आदि वरिष्ठ नेत्यांना बाजूला सारून पक्षाची सूत्रे पार्थ यांच्या हाती देण्याचे प्रयत्न जाणवत असल्याने पक्षात नाराजी वाढत होती. या वातावरणातच परवा दिलीप वळसे, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, आदि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी अचानक उत्तररात्री दिल्लीत गृहमंत्री अमीत शहांची भेट घेतली. त्या आधी मुंबईत भुजबळांच्या बंगल्यावर या साऱ्या नेत्यांची खलबते झाली. या दोन्ही प्रसंगी सुनेत्राताईंना बोलावलेले नव्हते हा यातील लक्षणीय भाग. या आधी ऑक्टोबरच्या अखेरीकडे अचानक सुनेत्राताई व पार्थ दिल्लीत मोदी व शहांना भेटून आले होते. दादांकडे पूर्वी असणारे अर्थखाते हे पुन्हा राष्ट्रवादीकडे सोपवावे ही मागणी गेले काही महिने सुर आहे. ते ध्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांनी स्वतःकडेच ठेवले आहे. पण ते जरी राष्ट्रवादीकडे द्यायचे तरी ते सुनेत्राताईं ऐवजी दिलीप वळसेंसारख्या अनुभवी माजी अर्थमंत्र्यांकडेच द्यावे असा भाजपाचा विचार दिसतो. यातून राष्ट्रवादीतील अंतर्गत सुप्त संघर्षही पुढे येतो. सुनेत्राताई वगळून बाकी नेत्यांची मानिसिकताही अर्थखाते अनुभवी नेत्याकडे जावे अशीच असावी असे शहांच्या भेटीचा जो फोटो बाहेर आला त्यावरून दिसते!

या साऱ्या वातावरणात दादांच्या नावावर निवडून आलेले सारे आमदार अस्वस्थ आहेत त्यांची मनस्थिती द्विधा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्ममान अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांच्याच नेतृत्वात पुढे जायचे की पक्ष नेतृत्वात काही बदल संभवतात असा प्रश्न पक्षापुढे पडलेला दिसतो. सुनेत्राताईंनी पक्षाच्या आमदारांची जी तातडीची बैठक दिल्ली दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर घेतली त्याला ४१ पैकी फक्त तीस आमदार हजर होते. एकंदरीत राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांपुढे अस्तित्वाचे सवाल उभे आहेत. एकीकडे नेत्याच्या तब्बेतीची काळजी तर दुसरीकडे आहे सक्षम नेतृत्वाचा प्रश्न. दोन्हीकडे कार्यकर्त्यांना पुढच्या वाटचाली बाबत घोर लागला आहे.

– अनिकेत जोशी

Web Title: What exactly is the underlying unrest within the nationalist congress party nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • ajit pawar

संबंधित बातम्या

अजितदादांशिवाय पहिलीच दिवाळी सुनी-सुनी; बालपणीच्या आठवणींना उजाळा देत राजेंद्र पवार भावूक
1

अजितदादांशिवाय पहिलीच दिवाळी सुनी-सुनी; बालपणीच्या आठवणींना उजाळा देत राजेंद्र पवार भावूक

‘…तर मग आमचे पक्ष का फोडले?’; खासदार संजय राऊत यांचा सवाल
2

‘…तर मग आमचे पक्ष का फोडले?’; खासदार संजय राऊत यांचा सवाल

NCP Merger : ‘अजितदादांच्या निधनानंतर खोटं का बोललात?’ राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या विधानावरून रोहित पवारांचा तटकरेंना सवाल
3

NCP Merger : ‘अजितदादांच्या निधनानंतर खोटं का बोललात?’ राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या विधानावरून रोहित पवारांचा तटकरेंना सवाल

अजित पवारांचा जनसेवेचा वारसा पुढे चालवणार; जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कार्यरत राहणार, सुनेत्रा पवार यांची ग्वाही
4

अजित पवारांचा जनसेवेचा वारसा पुढे चालवणार; जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कार्यरत राहणार, सुनेत्रा पवार यांची ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.