Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Merger : ‘अजितदादांच्या निधनानंतर खोटं का बोललात?’ राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या विधानावरून रोहित पवारांचा तटकरेंना सवाल

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून पुन्हा राजकीय वातावरण तापलं आहे. सुनील तटकरे यांच्या विधानावर रोहित पवारांनी सवाल उपस्थित करत दादांच्या निधनानंतर भूमिका का बदलली, असा प्रश्न विचारला. भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

  • By विवेक
Updated On: Nov 06, 2026 | 06:22 PM
Rohit Pawar on Sunil Tatkare

Rohit Pawar on Sunil Tatkare

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या राजकीय वर्तुळात चर्चा
  • रोहित पवारांचा तटकरेंना खोचक सवाल
  • अजितदादांच्या निधनानंतर भूमिका बदलल्याचा आरोप
 

महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर थांबलेली विलिनीकरणाची चर्चा आता पुन्हा समोर आली असून, सुनील तटकरे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, त्यांच्या याच विधानावर आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रश्न उपस्थित केले आहेत. (NCP Merger)

सुनील तटकरे यांनी अजित पवार हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असत्या, असं विधान केलं होतं. 12 फेब्रुवारी ही विलिनीकरणासाठी महत्त्वाची तारीख ठरली असती, असंही त्यांनी सांगितलं होतं.

यावर रोहित पवार म्हणाले की, अजितदादा असतानाच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. आम्ही याबाबत आधीपासून सांगत होतो. मात्र, दादांच्या निधनानंतर लगेचच सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं होतं. मग आता अचानक तटकरे वेगळी भूमिका का मांडत आहेत? दादांच्या निधनानंतर ही वस्तुस्थिती का सांगितली नाही? असा थेट सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला.

NCP Merger : अजितदादा असते तर राष्ट्रवादी एकत्र आली असती! सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट, 12 फेब्रुवारीला काय घडणार होतं?

तटकरे आणि प्रफुल पटेल स्वपक्षात अडचणीत?

रोहित पवार यांनी तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या राजकीय भूमिकेवरही भाष्य केलं. ते म्हणाले की, अजितदादांच्या राष्ट्रवादीत हे दोन्ही नेते सध्या अडचणीत असण्याची शक्यता आहे. पक्षात त्यांचं कितपत चालतं, याबाबतही प्रश्न आहेत. त्यामुळेच कदाचित त्यांनी आपली राजकीय भूमिका बदलली असावी, असा दावा रोहित पवारांनी केला.

भाजपसोबत जाणार का? रोहित पवारांचं स्पष्ट उत्तर

दरम्यान, शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवरही रोहित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही पवार साहेबांना जवळून ओळखतो. भाजपच्या धोरणांमुळे युवा, महिला, शेतकरी आणि संविधानासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, असं ते म्हणाले.

आम्ही सातत्याने या धोरणांविरोधात लढत आहोत. त्यामुळे भाजपसोबत जाण्याचा किंवा सत्ताधाऱ्यांशी सहकार्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शरद पवार असाही कोणताही निर्णय घेणार नाहीत, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.

एकंदरीत, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावरून तटकरे आणि रोहित पवार यांच्यातील शाब्दिक संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. आता या आरोपांवर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल काय उत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, डिस्चार्जबाबत दिली मोठी माहिती

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुनील तटकरे यांच्या विधानावर रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी विलिनीकरणाबाबत वेगळी भूमिका का मांडली, असा सवाल रोहित पवारांनी केला. आधी विलिनीकरणाची चर्चा नाकारली आणि आता ती मान्य का केली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

  • Que: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण कधी होणार होतं?

    Ans: सुनील तटकरे यांच्या दाव्यानुसार, अजित पवार हयात असते तर 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असत्या. शरद पवार गटाकडूनही विलिनीकरणाची चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात आलं होतं.

  • Que: रोहित पवार यांनी भाजपसोबत जाण्याबाबत काय म्हटलं?

    Ans: शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत, असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं. भाजपच्या धोरणांविरोधात आमचा लढा सुरू असल्याने सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Web Title: Rohit pawar questions sunil tatkare ncp merger statement vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • ajit pawar
  • NCP Party
  • NCP Sharad Pawar
  • rohit pawar
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, डिस्चार्जबाबत दिली मोठी माहिती
1

Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, डिस्चार्जबाबत दिली मोठी माहिती

NCP Merger : अजितदादा असते तर राष्ट्रवादी एकत्र आली असती! सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट, 12 फेब्रुवारीला काय घडणार होतं?
2

NCP Merger : अजितदादा असते तर राष्ट्रवादी एकत्र आली असती! सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट, 12 फेब्रुवारीला काय घडणार होतं?

Prafull Patel meets Sharad Pawar : ब्रीच कँडीमध्ये शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांची भेट; राजकीय चर्चेत नेमकं काय घडलं?
3

Prafull Patel meets Sharad Pawar : ब्रीच कँडीमध्ये शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांची भेट; राजकीय चर्चेत नेमकं काय घडलं?

Kolhapur Gokul Politics : गोकुळच्या वादात रोहित पवारांची उडी! ‘फडणवीसांचा इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड?’
4

Kolhapur Gokul Politics : गोकुळच्या वादात रोहित पवारांची उडी! ‘फडणवीसांचा इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.