Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजितदादांशिवाय पहिलीच दिवाळी सुनी-सुनी; बालपणीच्या आठवणींना उजाळा देत राजेंद्र पवार भावूक

पुढील पिढ्यांचे आयुष्य वेगवेगळ्या शहरांत आणि परदेशात घडले. त्यामुळे बालपणीच्या त्या एकत्रित दिवाळीतील आपुलकी, नात्यांची घट्ट वीण आणि ऋणानुबंधांचे हळवे धागे त्यांना कसे समजणार, असा भावनिक सवालही राजेंद्र पवार यांनी उपस्थित केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 08, 2026 | 12:25 PM
अजितदादांशिवाय पहिलीच दिवाळी सुनी-सुनी; बालपणीच्या आठवणींना उजाळा देत राजेंद्र पवार भावूक

अजितदादांशिवाय पहिलीच दिवाळी सुनी-सुनी; बालपणीच्या आठवणींना उजाळा देत राजेंद्र पवार भावूक

Follow Us
Follow Us:
  • अजित पवार यांच्याशिवाय कुटुंबीयांची पहिली दिवाळी
  • दिवाळीच्या आनंदावर विरहाची छाया
  • राजेंद्र पवार यांची भावनिक सोशल मीडिया पोस्ट
बारामती / अमोल तोरणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय यंदाची दिवाळी त्यांच्या कुटुंबीयांसाठी पहिल्यांदाच आली असून, या सणाच्या आनंदातही आठवणींची हुरहूर आणि विरहाची वेदना जाणवत आहे. बालपणापासून एकत्र साजऱ्या केलेल्या दिवाळीतील गोड आठवणींना उजाळा देत बारामती ॲग्रोचे अध्यक्ष आणि अजितदादांचे चुलत बंधू राजेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर केलेली भावनिक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अजित पवार यांना उद्देशून लिहिलेल्या या पोस्टमधून एका कुटुंबातील जिव्हाळ्याचे नाते, बालपणीचा निरागसपणा आणि काळाच्या ओघात हरवत गेलेल्या एकत्रित क्षणांचे चित्र उभे राहिले आहे.

राजेंद्र पवार यांनी या पोस्टमध्ये बालपणीच्या दिवाळीतील अनेक प्रसंग अत्यंत हळुवारपणे मांडले आहेत. अनंतराव (तासेब) फटाके आणून सर्वांना समान वाटून देत असत. दिवसभर फटाके पुरावेत म्हणून अंधाऱ्या कोठडीतील घडवंचीवर असलेल्या पोत्याच्या भकश्यात ते लपवून ठेवणे, पॅराशूट उडाल्यानंतर ते पकडण्यासाठी काट्याकुट्यांतून धावणे, अर्धवट उडालेल्या फटाक्यांची दारू गोळा करून दुसऱ्या दिवशी पुन्हा फटाके पेटवणे, अशा आठवणी त्यांनी जागवल्या आहेत.

आजीचा धाक, दिवाळीत घरी येणारे एन. डी. पाटील आणि त्यांच्या गप्पांमधून निर्माण होणारे आनंदी वातावरण यांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे. राजकीय पक्ष आणि वैयक्तिक विचार वेगळे असले तरी नाती जपता आली पाहिजेत, ही शिकवण त्यांच्याकडून मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. घरामागील आडावरून पाणी भरण्यासाठी पहाटेपासून सुरू असलेली कावडीची लगबग, राखेने दात घासण्याचे दिवस, पक्ष्यांची घरट्यातून पडलेली पिल्ले सापडल्यानंतर त्यांना शेळीचे दूध पाजण्याची धडपड, अशा आठवणींमधून त्या काळातील साधेपणा आणि माणुसकीचे दर्शन घडते. अजितदादांच्या राजेश खन्ना स्टाइलच्या कपड्यांच्या आवडीनिवडींची आठवणही त्यांनी काढली आहे.

पुढील पिढ्यांचे आयुष्य वेगवेगळ्या शहरांत आणि परदेशात घडले. त्यामुळे बालपणीच्या त्या एकत्रित दिवाळीतील आपुलकी, नात्यांची घट्ट वीण आणि ऋणानुबंधांचे हळवे धागे त्यांना कसे समजणार, असा भावनिक सवालही राजेंद्र पवार यांनी उपस्थित केला आहे.

‘दिवाळ्या येत-जात राहणार; मात्र लहानपणीच्या आठवणींचे काटे आता एकटेपणाची जाणीव करून देत राहणार,’ या आशयातून अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी प्रकर्षाने जाणवते. शेवटी ‘प्रत्येक प्रसंगात आठवण काढणे एवढेच मागे राहिले आहे,’ असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजित दादांचे मोठे चुलत बंधू असलेले राजेंद्र पवार यांनी या पोस्ट च्या शेवटी ‘राजुदादा’ असा उल्लेख करून या पोस्टला पूर्णविराम दिला आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी एका पिढीच्या हरवलेल्या एकत्रित बालपणाची हळवी कहाणी समाज माध्यमावर शेअर केली आहे.

FAQ

1. अजित पवार यांच्याशिवाय यंदाची दिवाळी का सुनी झाली?
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांसाठी यंदाची दिवाळी पहिल्यांदाच त्यांच्या अनुपस्थितीत आली आहे. त्यामुळे सणाच्या आनंदासोबत त्यांच्या आठवणींची हुरहूरही जाणवत आहे.

2. राजेंद्र पवार यांनी काय केले?
बारामती ॲग्रोचे अध्यक्ष आणि अजित पवार यांचे चुलत बंधू राजेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत बालपणीच्या दिवाळीच्या आठवणींना उजाळा दिला.

3. राजेंद्र पवार यांच्या पोस्टमध्ये काय भावना व्यक्त झाल्या?
बालपणी एकत्र साजरी केलेली दिवाळी, कुटुंबातील जिव्हाळ्याचे नाते आणि काळाच्या ओघात हरवत गेलेले आनंदाचे क्षण यांची आठवण त्यांनी करून दिली.

Web Title: First diwali feels empty without ajitdada for pawar family nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati news

संबंधित बातम्या

‘…तर मग आमचे पक्ष का फोडले?’; खासदार संजय राऊत यांचा सवाल
1

‘…तर मग आमचे पक्ष का फोडले?’; खासदार संजय राऊत यांचा सवाल

NCP Merger : ‘अजितदादांच्या निधनानंतर खोटं का बोललात?’ राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या विधानावरून रोहित पवारांचा तटकरेंना सवाल
2

NCP Merger : ‘अजितदादांच्या निधनानंतर खोटं का बोललात?’ राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या विधानावरून रोहित पवारांचा तटकरेंना सवाल

Baramati: बारामतीत शासकीय रुग्णालयात मोठी दुर्घटना! सहाव्या मजल्यावरून पडून रुग्णाचा मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
3

Baramati: बारामतीत शासकीय रुग्णालयात मोठी दुर्घटना! सहाव्या मजल्यावरून पडून रुग्णाचा मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अजित पवारांचा जनसेवेचा वारसा पुढे चालवणार; जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कार्यरत राहणार, सुनेत्रा पवार यांची ग्वाही
4

अजित पवारांचा जनसेवेचा वारसा पुढे चालवणार; जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कार्यरत राहणार, सुनेत्रा पवार यांची ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.